
Ravindra chavan on Garjana morcha
मुंबई : SIR प्रक्रियेवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना मोर्चा’नंतर आता भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी विरोधकांवर जोरदार पलटवार केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत SIR प्रक्रियेबाबत मांडलेल्या भूमिकेचा व्हिडिओ शेअर करत चव्हाण यांनी SIR ला विरोध करणाऱ्या राजकीय पक्ष आणि नेत्यांना थेट सवाल केले आहेत. (Ravindra Chavan on SIR)
रविंद्र चव्हाण यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री कोण असावेत, हे घुसखोरांनी ठरवायचं का? असा सवाल त्यांनी केला. असं झालं तर लोकशाही सुरक्षित राहील का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
मतदार यादीतील दुबार नोंदी आणि मतदानाच्या अधिकारावरूनही रविंद्र चव्हाण यांनी विरोधकांना घेरलं. एका मतदाराला एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदान करण्याची मुभा असावी का? असा थेट सवाल त्यांनी केला.
📌 देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री कोण असावे, हे घुसखोरांनी ठरवायचे का ? तसे झाले तर लोकशाही सुरक्षित राहील का ? 📌 एका मतदाराला एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदान करण्याची मुभा असावी का ? 📌 मृत्यू पावलेल्या नागरिकांना मतदार यादीत स्थान असावे का ? SIR ला विरोध करणाऱ्यांनी या प्रश्नांची उत्तरे द्यावीत ! #SIR #ElectoralRoll #AmitShah #BJP4Maharashtra — Ravindra Chavan (@RaviDadaChavan) October 4, 2026
तसंच मृत्यू पावलेल्या नागरिकांची नावं मतदार यादीत कायम राहावीत का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. SIR प्रक्रियेमुळे मतदार याद्यांची पडताळणी आणि शुद्धीकरण करण्याचा मुद्दा चर्चेत आला असताना चव्हाण यांनी या प्रश्नांच्या माध्यमातून विरोधकांना लक्ष्य केलं.
SIR प्रक्रियेला विरोध करणाऱ्या नेत्यांनी आणि राजकीय पक्षांनी आधी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत आणि त्यानंतरच SIR ला विरोध करावा, असं आवाहन रविंद्र चव्हाण यांनी केलं आहे.
ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना मोर्चा’नंतर भाजपकडून आलेल्या या प्रतिक्रियेमुळे SIRचा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. त्यामुळे आगामी काळात SIR प्रक्रियेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
‘यांच्यामध्ये कोणतीही भिती नाही, एकाच उद्योगपतीला सर्व देऊन टाकायचं’; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात