
MPSC Students Protest in pune
एमपीएससी आंदोलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट
रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू
मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा निश्चय
MPSC /Raj Thackeray: ज्या ज्या मार्गाने सोडवता येईल त्या मार्गाने विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविले पाहिजेत. महाराष्ट्रातील मराठी मुलांना आणि मराठी मुलींना नोकरी लागण्यासाठी राज ठाकरेला कोणाचेही पाय धरावे लागले, तर राज ठाकरे धरायला तयार आहे. फक्त भलत्या तुम्ही गैरसमजामध्ये राहू नका,भलत्या स्वप्नांमध्ये राहू नका अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यात आंदोलन करीत असलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आपला पाठिंबा जाहीर केला.
पुण्यात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाल्याचा दावा केला जात आहे. आंदोलनस्थळी अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. जोपर्यंत विद्यार्थ्यांचा मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नसल्याचे विद्यार्थी आंदोलकांचे म्हणणे आहे. आज या आंदोलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तुमच्या मागण्या मी पाहिल्या, ७० हजार पदभरतीचा मुद्द वाचला. ही पदभरती होणार नाही. हे तुम्ही आत्ताच लक्षात ठेवा. रोहित पवार येथे बसलेले आहेत. दुसरे सरकार आले तरी हे नाही होऊ शकत. परिस्थिती समजून घ्या, वस्तुस्थिती समजून घ्या; मात्र नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत. गेल्या २५ वर्षांपासून सांगतोय, राज्यातील तरुणांनाच नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत.
आपण म्हणतोय आरक्षण पाहिजे, पण आरक्षणासाठी सरकारी नोकऱ्या आहेत कुठे? जे काही चाललय ते खासगी होत चाललय. आणि खासगी क्षेत्रात आरक्षण नाही. हे सगळं सरकारी धोरणांमुळे होतंय. तुमचा विचारच नाही. तुम्हाला गृहित धरल जातंय. निवडणुका आल्या की पैसे वाटा, दारू पाजा आणि निवडून या. या लोकांचा गैरसमज तुम्ही जोपर्यंत दूर करणार नाहीत तोपर्यंत आयुष्यात तुम्हाला कधीही न्याय मिळणार नाही. तुम्ही जोपर्यंत दबाव निर्माण करणार नाहीत. जोपर्यंत तुमचं म्हणणं ऐकल्या शिवाय काही खर नाही ही धास्ती या खासदार आमदारांमध्ये निर्मण झाली की बघा कसे सुता सारखे सरळ येतात.