Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thackeray Brothers Morcha: हुकूमशाहाचा पहिला पराभव महाराष्ट्रातून; ठाकरे बंधूंची ज्ञानेश कुमारांच्या हकालपट्टीची मागणी

Thackeray Brothers Morcha: देशभरातील मतदार याद्यांमधून कोट्यवधी मतदार वगळल्याचा आरोप करत उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या रचनेत करण्यात आलेल्या बदलांवरही आक्षेप घेतला. सरन्यायाधीशांना निवड समितीतून वगळून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा समावेश करण्यात आला

  • By anuradha sagar
Updated On: Oct 05, 2026 | 08:31 AM
Thackeray Brothers Garjana Morcha, Uddhav Thackeray Raj Thackeray

Thackeray Brothers Garjana Morcha, Uddhav Thackeray Raj Thackeray

Follow Us
Follow Us:
  • मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मुंबईत ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’
  • मेट्रो सिनेमा ते मुंबई महापालिका मुख्यालयादरम्यान लाखो आंदोलकांची उपस्थिती
  • ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी आणि एसआयआर (SIR) प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
Thackeray Brothers Mumbai Morcha:  मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली मुंबईत रविवारी ‘गर्जना मोर्चा काढण्यात आला. हुकूमशहाचा पहिला पराभव महाराष्ट्रातूनच होणार, असा निर्धार व्यक्त करत या मोर्चात निवडणूक आयोगाविरोधात एल्गार पुकारण्यात आला. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीसह संपूर्ण एसआयआर प्रक्रिया रद्द करावी आणि आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची एकमुखी मागणी करण्यात आली.

मेट्रो सिनेमा ते मुंबई महापालिका मुख्यालय असा निघालेल्या या मोर्चात महाविकास आघाडीसह विविध विरोधी पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक होते, मग निवडणूक आयुक्तांची का नाही? असा सवाल त्यांनी केला. भारत देश ज्ञानेश कुमारांच्या बापाचा नाही, असा घणाघात करत त्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. हा लढा कोणत्याही जाती-पातीचा किंवा धर्माचा नसून स्वातंत्र्य व लोकशाही वाचवण्याचा असल्याचे ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray : ‘उद्या रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल,’ उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट इशारा, गर्जना मोर्चातून घणाघात

एसआयआर रद्द करा, बॅलेटवर निवडणूक घ्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोर्चातून दोन प्रमुख मागण्या स्पष्ट केल्या. महाराष्ट्रात आतापर्यंत झालेली सपूर्ण एसआयआर प्रक्रिया रद्द करा आणि आगामी निवडणुका बैलेट पेपरवर घ्या, अशी मागणी त्यांनी केली. एसआयआर बेकायदेशीर असल्याचा दावा करताना त्यांनी माजी केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंह यांच्या भूमिकेचाही संदर्भ दिला. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील मतदारसंख्येत ४० ते ६० लाखांची वाढ झाली आणि आता एसआयआरच्या माध्यमातून सुमारे दोन कोटी मतदार वगळण्यात आल्याचा दावा राज यांनी केला. हे दोन कोटी लोक कोण होते? हे आमचे मतदार होते का? असा सवाल त्यानी उपस्थित केला. २०१७-१८ पासून आपण निवडणूक प्रक्रिया आणि मतदार याद्यांमधील घोळाबाबत बोलत असल्याचे सांगत राज यांनी भाजपच्या मतवाढीवरही प्रश्न उपस्थित केला. कोणत्याही परिस्थितीत मतदान यंत्रे बंद झाली पाहिजेत.

देशभरातील मतदार याद्यांमधून कोट्यवधी मतदार वगळल्याचा आरोप करत उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या रचनेत करण्यात आलेल्या बदलांवरही आक्षेप घेतला. सरन्यायाधीशांना निवड समितीतून वगळून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा समावेश करण्यात आला आणि त्यानंतर ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती झाली, असा आरोप त्यांनी केला. मेक इन इंडियाच्या माध्यमातून हुकूमशहा तयार होत असेल, तर त्यांना गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.

‘यांच्यामध्ये कोणतीही भिती नाही, एकाच उद्योगपतीला सर्व देऊन टाकायचं’; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

आयोगावर सत्तेचे नियंत्रण वाढले

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देशात मतांची चोरी होत असल्याचा आरोप केला. निवडणूक आयोगाच्या नियुक्ती प्रक्रियेतून सरन्यायाधीशांना दूर केल्यानंतर आयोगावर सत्तेचे नियंत्रण वाढल्याचे ते म्हणाले, लोकशाही वाचवावी लागेल, असे आवाहन करत त्यानी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आणि निवडणूक प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली.

मत चोरीत भाजप सामील

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर घंट निशाणा साधत भाजप चौरीत सामील आहे, असा आरोप केला, निवडणूक आयोगाच्या कवित गैरप्रकाराचा फायदा सत्ताधाऱ्यांना होत असल्याने भाजप आयोगाच्या बाजूने उभा राहत असल्याचे ते म्हणाले, चोराचे भागीदार बाजूने उभे राहणारच, असा टोला त्यांनी लगावला.

MPSC Protest : आंदोलनात संजय राऊतांची एन्ट्री; ‘जंतर-मंतर जिल्ह्या-जिल्ह्यात उभं राहिलं तर मंत्रालयाबाहेर पडता येणार नाही’

पक्षाचे झेंडे नाहीत, पण हातात तिरंगा

ठाकरे बंधूच्या आदोलनात राजकीय पक्षांचे झेंडे वापरण्यास परवानगी नव्हती. कार्यकर्ते आणि समर्थकाना फक्त राष्ट्रध्वज तिरंगा, सोबता बाळगण्यास सांगण्यात आले होते. शिवाजी पार्कमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात झालेल्या ‘जेल भरो आंदोलना ‘च्या दोन दिवसांनंतर हे प्रदर्शन पार घडले.

जो डाले वोट पे डाका, उसका नाम ग्यानू काका

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल देशमुख यांनी मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ होत असल्याचा आरोप केला. जो डाले वोट पे डाका, उसका नाम ग्यानू काका, अशी घोषणा देत त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर निशाणा साधला. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, त्यांच्यावर एफआयआर दाखल करून कारवाई करावी आणि आगामी निवडणुका बैलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

 

 

Web Title: Thackeray brothers mumbai garjana morcha cec gyanesh kumar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 08:31 AM

Topics:  

  • election commission of india
  • Gyanesh Kumar
  • Mumbai Politics
  • raj thackeray
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Delhi Protest : ‘डिटेन नाही, माझं अपहरण केलंय’ नेहा वोरा यांचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप, आंदोलनस्थळी RAF तैनात
1

Delhi Protest : ‘डिटेन नाही, माझं अपहरण केलंय’ नेहा वोरा यांचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप, आंदोलनस्थळी RAF तैनात

Ravindra Chavan on SIR : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चानंतर आता भाजपचा पलटवार; रविंद्र चव्हाणांनी उपस्थित केले 3 मोठे सवाल
2

Ravindra Chavan on SIR : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चानंतर आता भाजपचा पलटवार; रविंद्र चव्हाणांनी उपस्थित केले 3 मोठे सवाल

Uddhav Thackeray : ‘उद्या रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल,’ उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट इशारा, गर्जना मोर्चातून घणाघात
3

Uddhav Thackeray : ‘उद्या रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल,’ उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट इशारा, गर्जना मोर्चातून घणाघात

‘आज पाऊल उचललं, उद्या हात उचलणार’; मुंबईत महामोर्चातून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
4

‘आज पाऊल उचललं, उद्या हात उचलणार’; मुंबईत महामोर्चातून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.