Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मागील वर्षातल्या बेफाम उधळपट्टीने; मनसे नेते राज ठाकरेंनी ओला दुष्काळामुळे CM फडणवीसांना दिल्या कानपिचक्या

Raj Thackeray On wet Drought : मनसे नेते राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. राज ठाकरे यांनी पोस्ट करुन राज्य सरकारला शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत काही सूचना दिल्या आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 25, 2025 | 11:28 AM
MNS Raj Thackeray social media post on Maharashtra farmer condition wet Drought

MNS Raj Thackeray social media post on Maharashtra farmer condition wet Drought

Follow Us
Close
Follow Us:

Raj Thackeray On wet Drought : मुंबई : राज्यामध्ये ओला दुष्काळ ओढावला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुफान पाऊस झाल्यामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे. सोलापूरमध्ये अशी परिस्थिती आहे की पिकाऊ जमीन पूर्णपणे वाहून गेली. यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी सरकारने मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे. या संदर्भात मनसे नेते राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. राज ठाकरे यांनी पोस्ट करुन राज्य सरकारला काही सूचना दिल्या आहेत.

मनसे नेते राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी महायुती सरकारला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. राज ठाकरे यांनी लिहिले आहे की, महाराष्ट्रात अतिवृष्टीने जो धुमाकूळ घातला आहे, त्याबद्दल तुम्ही पूर्णपणे अवगत असालच. महाराष्ट्राचा असा कुठलाही भाग शिल्लक राहिलेला नसेल जिथे अतिवृष्टीने नुकसान केलं नसेल. आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलल्यावर, लक्षात आलं आहे की, कित्येक ठिकाणी जमीन पूर्णपणे खरवडून वाहून गेलेली आहे. मे महिन्याच्या मध्यात जो पाऊस सुरु झाला आहे, त्याने जवळजवळ उघडीप घेतलीच नाहीये त्यामुळे, शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. त्यामुळे सरकारने खालील सूचनांचा विचार करावा, असे म्हणत राज ठाकरेंनी काही उपाय सूचवले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे त्यांनी लिहिले आहे की, १) कुठल्याही निकषांच्या चौकटीत न लावता, सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा. एकरी ७ आणि ८ हजार रुपये इतक्या तुटपुंजी नुकसान भरपाईने काहीही होणार नाही. त्याऐवजी एकरी किमान ३० हजार रुपये नुकसान भरपाई घोषित करा. कारण आता शेतकऱ्याची घडी बसायला किमान १ वर्ष लागेल.

२) गेल्या काही वर्षातल्या बेफाम उधळपट्टीने, राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झालेली असली तरी, सरकारने हात आखडता घेऊ नये. वेळेस केंद्राकडे पाठपुरावा करावा आणि मदतीचं पॅकेज केंद्राकडून मिळवावं. केंद्र सरकारने बिहारला असं पॅकेज या आधी दिलं आहेच त्यामुळे महाराष्ट्राला द्यायला काही हरकत नसावी. आणि त्यासाठी दिल्लीचा जो काही पाठपुरावा करावा लागेल तो करावा. फक्त स्वतःच्या वैयक्तिक तक्रारींसाठी किंवा घटक पक्षातील संघर्षासाठी आम्ही दिल्लीत जातो असं चित्र न दिसता, सरकारमधले सगळे पक्ष राज्यासाठी पण दिल्लीत धाव घेतात हे पण राज्याला दिसू दे.

३) अशा आपत्तीचा पहिला फटका बसतो तो मुला-मुलींच्या शिक्षणाला. एकाही मुलाचं शिक्षण बंद होणार नाही. त्याला लागणारी वह्या-पुस्तकं मिळतील आणि अशा परिस्थितीत सहामाही परीक्षा देताना मुलांच्या मनाची काय स्थिती असेल याचा सरकारने विचार करून काही कृती तात्काळ करावी. हिंदी भाषा लादताना दाखवलेली चपळाई आणि आग्रहीपणा इथे पण दिसेल अशी अपेक्षा.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

४) या अशा आपत्तीनंतर रोगराई प्रचंड वाढते त्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग सतर्क राहील हे देखील सरकारने पहावं. जिल्हा रुग्णालयांपासून ते आरोग्य केंद्रांपर्यंत, सगळीकडे औषधांचा तुटवडा पडणार नाही हे सरकारने पहावं.

५) अशा संकटानंतर कर्जाच्या हप्त्यासाठी सुरु होणारा बँकांचा तगादा हा फारच तापदायक विषय असतो. एकतर बँकांना योग्य ती समज सरकारने आत्ताच द्यावी, अन्यथा आमचे महाराष्ट्र सैनिक ती देतीलच.

सरकारने बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे हे सरकारचं कामच आहे. पण त्याची जाहिरातबाजी ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. त्यामुळे या सगळ्या मोहापासून दूर राहून सरकारने, प्रशासनाने आता एकरी किमान ३० ते ४० हजाराची मदत घोषित करावी आणि शेतकरी आणि त्याचं कुटुंब पुन्हा उभं राहील हे पहावं.

Web Title: Mns raj thackeray social media post on maharashtra farmer condition wet drought

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 11:28 AM

Topics:  

  • Heavy Rainfall
  • maharashtra news
  • Raj Thackeary

संबंधित बातम्या

Crops Insurance Scheme: दुष्काळात तेरावा महिना! पीकविम्यातील नियम बदलल्याने अतिवृष्टीच्या नुकसानीचे पैसे मिळणार नाहीत
1

Crops Insurance Scheme: दुष्काळात तेरावा महिना! पीकविम्यातील नियम बदलल्याने अतिवृष्टीच्या नुकसानीचे पैसे मिळणार नाहीत

Wet Drought Farmers: हातातोंडाशी आलेला घास हिरावला! राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार?
2

Wet Drought Farmers: हातातोंडाशी आलेला घास हिरावला! राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार?

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे नुकसान; सोलापुरात पालकमंत्री गोरेंनी दिले महत्त्वपूर्ण निर्देश
3

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे नुकसान; सोलापुरात पालकमंत्री गोरेंनी दिले महत्त्वपूर्ण निर्देश

राज्यातील अनेक भागांत परतीच्या पावसाचा मोठा फटका; छत्रपती संभाजीनगरसह विभागात 10 मंडळात अतिवृष्टी
4

राज्यातील अनेक भागांत परतीच्या पावसाचा मोठा फटका; छत्रपती संभाजीनगरसह विभागात 10 मंडळात अतिवृष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.