Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनसेचा केडीएमसी अधिकाऱ्यांना इशारा! शाळेतील विद्यार्थी गणवेश आणि शालेय साहित्यापासून वंचित

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळेंमध्ये अधिकाऱ्यांच्या आळसपणामुळे अजुनपर्यत शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे, त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मनसे पुढील काही दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना साहित्य न मिळाल्यास केडीएमसी अधिकाऱ्यांना शालेय गणवेश घालून शाळेत बसवू असा इशारा दिला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 19, 2024 | 04:38 PM
मनसेचा केडीएमसी अधिकाऱ्यांना इशारा! शाळेतील विद्यार्थी गणवेश आणि शालेय साहित्यापासून वंचित
Follow Us
Follow Us:

कल्याण : जुलै महिना अर्धा संपला तरी कल्याण डोंबिवली महानगरपालिका शाळेतील वि‌द्यार्थ्यांना अजूनही शाळेचा गणवेश आणि इतर साहित्य मिळाले नसल्याने या आठवडाभरात विद्यार्थ्याना शालेय साहित्य न मिळाल्यास केडीएमसी अधिकाऱ्यांना आणि शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांना शालेय गणवेश घालून शाळेत बसवू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला आहे.

केडीएमसी शाळेतील विद्यार्थी गणवेश आणि शालेय साहित्यापासून वंचित असल्याने केडीएमसी प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी मनसेचे विभाग अध्यक्ष कपिल पवार आणि शाखा अध्यक्ष गणेश लांडगे यांनी शालेय गणवेश घालून येत मी लाभार्थी? कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शाळेत शिकणारा मी लाभार्थी? जून महिन्याच्या सुरुवातीला मला सर्व शालेय वस्तु मिळाल्या? असा उपहासात्मक बॅनर घेऊन येत केडीएमसी शिक्षण मंडळाचा निषेध व्यक्त केला. यावेळी मनसैनिकांनी शिक्षण विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांना शाळेचा गणवेश, बॅग, बूट, वह्या पुस्तकं आदी शालेय साहित्य भेट दिले आहे.

यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, विभाग अध्यक्ष कपिल पवार, शाखा अध्यक्ष गणेश लांडगे, रोहन आक्केवार, मनसेच्या महिला सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उर्मिला तांबे, चेतना रामचंद्रन, कल्याण महिला शहर अध्यक्षा तथा माजी नगरसेविका कस्तूरी देसाई आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गोरगरीब कुटुंबातील मुले आणि मुली महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेत असतात. त्यातच या विद्यार्थ्यांना अ‌द्याप गणवेश, रेनकोट, बुट, मोजे, कंपास पेटी आणि इतर साहित्य नियमीत वेळेत मिळालेले नाहीत. दरवर्षी शाळा सुरू झाल्यानंतर दोन ते चार महिन्यानंतर फक्त गणवेश उपलब्ध होतो. मागील वर्षी फक्त गणवेश आणि वह्या उपलब्ध झाल्या पण रेनकोट, कंपास पेटी, बुट मोजे आणि दप्तर हे गेल्या ५ ते ७ वर्ष उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे याविषयी पालकांमध्ये अत्यंत नाराजी व्यक्त होत आहे.

लवकरात लवकर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे. जेणे करून मुलांना अभ्यासाची गोडी निर्माण होऊन अभ्यास करण्यास सुरुवात करता येईल अशी मागणी मनसेचे शाखा अध्यक्ष गणेश लांडगे यांनी पालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. मात्र निवेदन देऊन देखील शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने आज मनसैनीकांनी शाळेचा गणवेश घालून येत, शिक्षण उपायुक्तांना शालेय साहित्य भेट देत निषेध व्यक्त केला. तसेच लवकर शालेय साहित्य उपलब्ध करून न दिल्यास केडीएमसी अधिकाऱ्यांना शालेय गणवेश घालून शाळेत बसवू असा इशारा दिला.

Web Title: Mns warning to kdmc school students are deprived of uniform and school materials

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2024 | 04:38 PM

Topics:  

  • kalyan
  • KDMC School
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

प्लास्टरसाठी रुग्णाकडून 400 रुपयांची लाच; पैसे मागणाऱ्या ‘त्या’ कामगाराला केले निलंबित
1

प्लास्टरसाठी रुग्णाकडून 400 रुपयांची लाच; पैसे मागणाऱ्या ‘त्या’ कामगाराला केले निलंबित

जालन्याची नवी ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’; ‘जालनाई’ ब्रँडचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
2

जालन्याची नवी ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’; ‘जालनाई’ ब्रँडचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात
3

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

Rukminibai Hospital: फ्रॅक्चर झालेल्या वृद्धाच्या पायाला प्लास्टरऐवजी पुठ्ठा, रुक्मिणीबाई रुग्णालयाचा आणखी एक धक्कादायक प्रकार
4

Rukminibai Hospital: फ्रॅक्चर झालेल्या वृद्धाच्या पायाला प्लास्टरऐवजी पुठ्ठा, रुक्मिणीबाई रुग्णालयाचा आणखी एक धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.