Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईकर आणि पुणेकरांना मान्सूनची करावी लागणार प्रतीक्षा, आता ‘या’ तारखेला होणार आगमन, विदर्भात पावसाची हजेरी

मान्सूनसाठी मुंबईकर आणि पुणेकरांना आणखी दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे. विदर्भात मात्र उपराजधानीसह अमरावती, चंद्रपूर आदी जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

  • By साधना
Updated On: Jun 23, 2023 | 07:06 PM
मुंबईकर आणि पुणेकरांना मान्सूनची करावी लागणार प्रतीक्षा, आता ‘या’ तारखेला होणार आगमन, विदर्भात पावसाची हजेरी
Follow Us
Follow Us:

मुंबई: मान्सूनसाठी मुंबईकर आणि पुणेकरांना आणखी दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे. कारण 25 जूननंतर या दोन्ही शहरात मान्सून येणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर विदर्भात आज मान्सूनचं आगमन झालं आहे. मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात हळुहळू पावसाचं प्रमाण वाढेल, असं सांगण्यात आलं आहे.

विदर्भात उपराजधानीसह अमरावती, चंद्रपूर आदी जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. पुणे, कोल्हापूर, सातारा आणि नाशिक घाट परिसरात 25 तारखेपासून यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर 27 जूननंतर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात येऊ शकतो.

सिंधुदुर्गात बरसला
सिंधुदुर्गात आज पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील कणकवली, वैभववाडी, कुडाळ, सावंतवाडी तालुक्यासह काही भागात पाऊस आहे मात्र अर्ध्याहून अधिक जिल्हा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. हवामान विभागाने येत्या काही तासांत तळकोकणात मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवला आहे. आज लागलेल्या या पावसाने बळीराजा आनंदीत झाला असून नियमीत पावसाकडे त्याच्या नजरा लागल्या आहेत.

पेरण्या खोळंबल्या
मान्सून लांबल्याने नांदेड जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. नांदेड शहरातील नवीन मोंढा बाजारात दरवर्षी या दिवसात शेतकऱ्यांची मोठी गर्दी असते. परंतु मान्सून लांबल्याने या बाजारात शुकशुकाट आहे. नवीन मोंढा बाजारात बी बियाणांची दुकाने मोठ्या प्रमाणावर आहेत. अनेक शेतकऱ्यांनी बी बियाणांची अद्याप खरेदी केली नाही. बी बियाणांची विचारपूस करून शेतकरी जात असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

हवामान विभागाचं तारिख पे तारिख
हवामान विभागाने सुरुवातीला 96 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला. मान्सून नेहमीप्रमाणे 1 जूनला केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तवला. मान्सून 7 जूनला कोकणात दाखल होण्याचा अंदाज वर्तवला. त्यानंतर 9 जूनपर्यंत मान्सून पुणे, मुंबईसह महाराष्ट्र व्यापेल असाही अंदाज व्यक्त करण्यात आला. मान्सून तळकोकणात 9 जूनला दाखल झाला खरा, मात्र मान्सून पुढे सरकला नाही. त्यानंतर मुंबई- पुण्यात मान्सून आगमनाची 16 जून ही नवी तारीख वर्तवण्यात आली. नंतर मान्सून आगमनाच्या तारखेत पुन्हा बदल करण्यात आला आणि 23 जून ही नवी तारीख जाहीर करण्यात आली. 23 जूनला काही ठिकाणी पावसाची हजेरी लागली. मात्र आता आणखी दोन दिवस मान्सून सक्रीय होण्याची वाट बघावी लागणार आहे.

Web Title: Monsoon update rain delayed in mumbai and pune raining in vidarbha nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2023 | 07:04 PM

Topics:  

  • Maharashtra Weather
  • Monsoon Update
  • Mumbai Rain
  • Weather Update

संबंधित बातम्या

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू, 11 पुलांना फटका
1

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू, 11 पुलांना फटका

Weather Update : राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाचा कहर; जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातही…
2

Weather Update : राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाचा कहर; जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातही…

Weather Update : दिल्ली, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; IMD ने म्हटले…
3

Weather Update : दिल्ली, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; IMD ने म्हटले…

Weather Update : महाराष्ट्र, आसाम, केरळसह देशातील 21 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागने म्हटले…
4

Weather Update : महाराष्ट्र, आसाम, केरळसह देशातील 21 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागने म्हटले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.