Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील तापमानात होतेय घसरण; पुण्यात नोंदवले यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमान

दिवसभर उन्हाची तीव्रता तुलनेने कमी असल्याने दुपारचे वातावरण मात्र आल्हाददायक राहत आहे. शनिवारी शहरात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 22, 2026 | 08:36 AM
राज्यातील तापमानात होतेय घसरण; पुण्यात नोंदवले यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमान

राज्यातील तापमानात होतेय घसरण; पुण्यात नोंदवले यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमान

Follow Us
Follow Us:
  • पुणे शहराच्या किमान तापमानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घट होत आहे.
  • शनिवारी (२१ नोव्हेंबर) पुण्यात किमान तापमान ११.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.
  • यंदाच्या हंगामातील हे आतापर्यंतचे नीचांकी तापमान ठरले आहे.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहराच्या किमान तापमानात सातत्याने घट होत असून, शनिवारी (ता.२१) पारा थेट ११.२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. यंदाच्या हंगामातील हे आतापर्यंतचे नीचांकी तापमान ठरले आहे. त्यामुळे पहाटे घराबाहेर पडणाऱ्यांना थंडीचा सामना करावा लागत असून, पुढील दोन दिवसही गारठा कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे.

शहरात गेल्या आठवड्यापासून थंडीचा प्रभाव वाढत आहे. विशेषतः मध्यरात्रीनंतर तापमानात घट होत असल्याने पहाटेच्या वेळी गारवा अधिक जाणवत आहे. दरम्यान, दिवसभर उन्हाची तीव्रता तुलनेने कमी असल्याने दुपारचे वातावरण मात्र आल्हाददायक राहत आहे. शनिवारी शहरात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. दिवसभर आकाश निरभ्र आणि वातावरण कोरडे होते. शहराच्या विविध भागांतही तापमानात फरक जाणवत असून, हवेली, पाषाण, एनडीए आणि सिंहगड रस्ता परिसरात थंडीचा प्रभाव अधिक आहे.

दरम्यान, मगरपट्टा आणि चिंचवड परिसरात तुलनेने अधिक तापमानाची नोंद झाली. रविवारी (ता. २२) किमान तापमानात किंचित वाढ होऊन ते १२ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची, तर कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

थंडीचा प्रभाव वाढतोय

शहरात गेल्या आठवड्यापासून थंडीचा प्रभाव वाढत आहे. विशेषतः मध्यरात्रीनंतर तापमानात वेगाने घट होत असल्याने पहाटेच्या सुमारास थंडी अधिक जाणवू लागली आहे. सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडणारे नागरिक, मॉर्निंग वॉकला जाणारे ज्येष्ठ नागरिक आणि व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्यांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे.

FAQ

1. पुण्यात शनिवारी किमान तापमान किती नोंदवण्यात आले?

पुण्यात शनिवारी किमान तापमान ११.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.

2. पुण्यातील ११.२ अंश तापमानाचे विशेष महत्त्व काय आहे?

यंदाच्या हंगामातील पुण्यातील हे आतापर्यंतचे नीचांकी किमान तापमान ठरले आहे.

3. पुण्यात कमाल तापमान किती नोंदवण्यात आले?

शनिवारी पुण्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.

Web Title: Temperatures across maharashtra are dropping pune records lowest temperature of season nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 08:36 AM

Topics:  

  • Climate Change
  • pune news
  • Weather Update

संबंधित बातम्या

Pune Mahavitran: वीजचोरीच्या घटनांमध्ये पुणे आघाडीवर; तीन दिवसांत ७३ प्रकरणे उघड, महावितरणची विशेष मोहीम
1

Pune Mahavitran: वीजचोरीच्या घटनांमध्ये पुणे आघाडीवर; तीन दिवसांत ७३ प्रकरणे उघड, महावितरणची विशेष मोहीम

Cricket News: राज गादियाचे शतक, योगेश पवारची फटकेबाजी! डीव्हीसीएचा १७१ धावांनी दणदणीत विजय
2

Cricket News: राज गादियाचे शतक, योगेश पवारची फटकेबाजी! डीव्हीसीएचा १७१ धावांनी दणदणीत विजय

Pune Weather: हुडहुडी भरणार! पुणेकरांनो दोन दिवस स्वेटर घालूनच फिरा; तापमान थेट…
3

Pune Weather: हुडहुडी भरणार! पुणेकरांनो दोन दिवस स्वेटर घालूनच फिरा; तापमान थेट…

FDAची पुण्यात ५०१ औषध आस्थापनांवर कारवाई; विक्रेत्यांवर सर्वाधिक कारवाई, ३६७ परवाने निलंबित
4

FDAची पुण्यात ५०१ औषध आस्थापनांवर कारवाई; विक्रेत्यांवर सर्वाधिक कारवाई, ३६७ परवाने निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.