Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: संगमनेरमध्ये अवैध्य धंद्यावर धडक कारवाई, 26 लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेरमध्ये अवैध्य धंद्यावर जोरदार कारवाई केली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 09, 2026 | 07:45 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:

संगमनेर (वा.) जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या स्पष्ट आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) संगमनेर उपविभागात एकाच दिवशी जोरदार धडक कारवाया केल्या. या कारवाईत वाळूमाफिया आणि अवैध दारूविक्रेत्यांवर कडक कारवाई करत ५ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, एकूण २६ लाख ४५ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, गणेश लोंढे, संतोष खैरे, योगेश कर्डिले, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, महादेव भांडे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

Mumbai Cyber Crime: मुंबईत हाय-प्रोफाईल फसवणूक; शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ६६ लाख लुटले

वाळूमाफियांवर मोठी कारवाई

संगमनेर तालुक्यातील डिग्रस शिवारात अवैध वाळू उपसा व वाहतूक प्रकरणी एलसीबीने २ डंपर जप्त करत दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे २० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
प्रकाश भाऊसाहेब कोरडकर (वय २०, रा. हजारवाडी) याच्याकडून ५ लाख रुपये किमतीचा टाटा डंपर (MH 12 EQ 6334) व २ ब्रास वाळू (२० हजार रुपये) जप्त करण्यात आली.

तसेच फिरोज सुलतान शेख (वय २५, रा. डिग्रस) याच्यावरही कारवाई करत ४० हजार रुपये किमतीची २ ब्रास वाळू, २ डंपर, कार व मोटारसायकल असा एकूण २६ लाख ४५ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्गातच थरार! लॉ स्टुडंटने आधी विद्यार्थिनीवर झाडली गोळी, नंतर ३ सेकंदात स्वतःलाही संपवलं; अंगावर शहारे आणणारा Video समोर

अवैध दारूविक्रीवर छापा

दुसऱ्या घटनेत संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील ‘गरीब’ नावाच्या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीचा पर्दाफाश एलसीबीच्या छाप्यात झाला. याप्रकरणी साहेबराव भिकाजी राहिज (रा. पिंपरणे) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत ४४ हजार २४० रुपये किमतीची देशी-विदेशी दारू, तसेच ५ लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार (MH 02 BR 9629) असा एकूण ५ लाख ४४ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुचाकीवर दारू वाहतूक करणाऱ्यांवरही कारवाई

देवगाव (ता. संगमनेर) येथे दुचाकीवरून दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या नीलेश शशिकांत मुंतोडे (वय २६) आणि अमोल गुलाब मुंतोडे या दोघांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून ११ हजार ५२० रुपये किमतीची देशी दारू व ५० हजार रुपये किमतीची मोटारसायकल (MH 17 CN 6760) असा एकूण ६१ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Web Title: Action taken against illegal business in sangamner goods worth rs 26 lakh seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 07:45 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Ahmednagar Crime
  • Sangamner

संबंधित बातम्या

Crime News: गणपती विसर्जनाला गालबोट ,मंडळ अध्यक्षाचा मृत्यू; विसर्जन मिरवणुकीत अचानक काय घडलं?
1

Crime News: गणपती विसर्जनाला गालबोट ,मंडळ अध्यक्षाचा मृत्यू; विसर्जन मिरवणुकीत अचानक काय घडलं?

Ahilyanagar News: भीषण दुष्काळामुळे गाव सोडण्याची वेळ! अहिल्यानगरच्या चापडगावात 1972 पेक्षाही भयावह परिस्थिती
2

Ahilyanagar News: भीषण दुष्काळामुळे गाव सोडण्याची वेळ! अहिल्यानगरच्या चापडगावात 1972 पेक्षाही भयावह परिस्थिती

Ahilyanagar News : १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ? चापडगावात पाण्यासाठी गावकऱ्यांवर स्थलांतराची वेळ
3

Ahilyanagar News : १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ? चापडगावात पाण्यासाठी गावकऱ्यांवर स्थलांतराची वेळ

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर यांचं निधन; 50 वर्षांहून अधिक काळ लावणी गाजवल्यानंतर घेतला अखेरचा श्वास
4

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर यांचं निधन; 50 वर्षांहून अधिक काळ लावणी गाजवल्यानंतर घेतला अखेरचा श्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.