Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: सेवेचा हात, आनंदाची साथ! विशेष मुलांसोबत साजरा केला सामाजिक बांधिलकीचा दिवस

Jalgaon News: भडगाव येथील श्री साई समर्थ मतिमंद मुलांच्या निवासी शाळेत माऊली फाउंडेशन आणि अंजली हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मुलांसाठी आरोग्य तपासणीचा उपक्रम राबवण्यात आला.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 12, 2026 | 04:47 PM
Jalgaon News: सेवेचा हात, आनंदाची साथ! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News: सेवेचा हात, आनंदाची साथ! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • मनोहर सूर्यवंशी यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त विशेष मुलांसाठी आरोग्य तपासणी.
  • माऊली फाउंडेशन आणि अंजली हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम.
  • डॉ. तेजस कोटेचा यांच्या टीमकडून तपासणी आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन.
भडगावमध्ये एक वेगळाच वाढदिवस साजरा झाला, लहान मुलांच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि झाडं पण लावली गेली.श्री साई समर्थ मतिमंद मुलांच्या निवासी शाळेत छान कार्यक्रम झाला. तिथल्या विशेष मुलांसाठी हा कार्यक्रम होता. त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं आणि त्यांना आनंद देणं, हाच यामागचा उद्देश होता. सोबत पर्यावरणाचा संदेश पण दिला गेला. Jalgaon News:

विद्यार्थ्यासाठी हेल्थ चेकअप

हा सगळा कार्यक्रम माऊली फाउंडेशन आणि अंजली हॉस्पिटल यांनी मिळून केला होता. माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष मनोहर सूर्यवंशी यांचा 50 वा वाढदिवस होता म्हणून सकाळपासूनच विद्यार्थ्यासाठी हेल्थ चेकअप करण्यात आले होते. अंजली हॉस्पिटलचे डॉक्टर तेजस कोटेचा आणि त्यांची टीम तिथे आली होती. त्यांनी एकेका मुलाची तपासणी केली. कोणाला काही त्रास आहे का, औषध लागतंय का, कशी काळजी घ्यायची हे सगळं समजावून सांगितलं. डॉक्टरांनी खूप प्रेमाने मुलांशी गप्पा मारल्या.

फक्त झाड लावायचं नाही, वाढवायचं पण आहे.

तपासणी झाल्यावर सगळे शाळेच्या आवारात आले. तिथे वृक्षारोपण केलं. वेगवेगळी झाडं लावली गेली. यामागचा विचार एकच होता की झाडं आहेत तर आपण आहोत. फक्त झाड लावून झालं नाही, तर त्याला पाणी घालणं, त्याची काळजी घेणं हे पण आपलंच काम आहे, असं सगळ्यांनी तिथे सांगितलं. मुलांनी पण उत्साहात झाडं लावली.

Jalgaon News: बैलपोळ्याच्या उत्साहाने डॉ. उल्हास पाटील कृषि परिसर …

केक कापला आणि सगळे एकत्र जेवले

त्यानंतर मनोहर सूर्यवंशी यांचा वाढदिवसाचा केक कापण्यात आला. तिथे डॉक्टर, हॉस्पिटलचे कर्मचारी, पेशंट आणि त्यांचे नातेवाईक सगळे होते. पण खरी मजा पुढे होती.त्या विशेष मुलांसाठी खास स्नेहभोजन ठेवलं होतं. मुलांसोबत बसून केक कापला गेला. मुलं खूप खुश झाली. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केलं. कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, सगळे एकाच पंक्तीत. त्या जेवणात जेवढी चव होती त्यापेक्षा जास्त आपुलकी होती.

Jalgaon Ganesh Visarjan 2026: गणेश विसर्जनासाठी मार्ग सज्ज! ९० …

गावातले मान्यवर पण आलेया कार्यक्रमाला गावातले बरेच लोक आले होते. युवराज सूर्यवंशी, संगीता जाधव, निवृत्त शिक्षिका जयश्री पूर्णपात्रे, उर्दू शाळेचे चेअरमन करीम खान, जाकीर कुरेशी, कन्या शाळेचे मुख्याध्यापक सुरेश रोकडे, एस. डी. पाटील आणि माऊली फाउंडेशन व अंजली हॉस्पिटलचे सगळे कार्यकर्ते तिथे हजर होते.खरं तर असा वाढदिवस सगळ्यांनीच साजरा केला पाहिजे. फक्त स्वतःसाठी नाही तर दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी. मनोहर सूर्यवंशी यांनी आपल्या 50 व्या वाढदिवसाला जो आदर्श ठेवला, तो खरंच सगळ्यांसाठी प्रेरणा देणारा आहे.

Web Title: Mouli foundation celebrates chairman manohar suryawanshis 50th birthday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 04:47 PM

Topics:  

  • health care news
  • Jalgaon News
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Jalgaon Ganesh Visarjan 2026: गणेश विसर्जनासाठी मार्ग सज्ज! ९० टक्के काम पूर्ण; खड्डेमुक्त रस्त्यांसह धोकादायक फांद्यांचीही छाटणी
1

Jalgaon Ganesh Visarjan 2026: गणेश विसर्जनासाठी मार्ग सज्ज! ९० टक्के काम पूर्ण; खड्डेमुक्त रस्त्यांसह धोकादायक फांद्यांचीही छाटणी

Namira Khan Mumbra Case:  १९ वर्षीय नमीरा खान ATSच्या रडारवर; वडिलांचे इंडियन मुजाहिदीनशी कनेक्शन
2

Namira Khan Mumbra Case: १९ वर्षीय नमीरा खान ATSच्या रडारवर; वडिलांचे इंडियन मुजाहिदीनशी कनेक्शन

Maharashtra News: महाराष्ट्रावर मोठ्या संकाटाची चाहुल; केंद्राकडून ५० कोटींचा निधी वितरित
3

Maharashtra News: महाराष्ट्रावर मोठ्या संकाटाची चाहुल; केंद्राकडून ५० कोटींचा निधी वितरित

Jalgaon News: बैलपोळ्याच्या उत्साहाने डॉ. उल्हास पाटील कृषि परिसर दुमदुमला!
4

Jalgaon News: बैलपोळ्याच्या उत्साहाने डॉ. उल्हास पाटील कृषि परिसर दुमदुमला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.