Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“पवारसाहेबांना भटकती आत्मा म्हणाले, तेव्हा यांच्या तोंडाला बूच बसली होती का?” संजय राऊतांचा घणाघात

खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर सत्कारावरुन नाराजी व्यक्त का केली याचे कारण सांगितले आहे. तसेच नेत्यांना सुनावले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 14, 2025 | 12:59 PM
'साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी 50 लाख अन् मर्सिडीज कार', संजय राऊतांच्या पत्राने वाद पेटणार?

'साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी 50 लाख अन् मर्सिडीज कार', संजय राऊतांच्या पत्राने वाद पेटणार?

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत शीतयुद्ध सुरु असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष एकमेकांवर टीका करत आहेत. आता जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार आणि कौतुक केल्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला आहे. खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधून आपली नाराजी व्यक्त केली होती. आता ही नाराजी नसल्याचे म्हणत संजय राऊतांनी यू-टर्न घेतला आहे.

संजय राऊत यांनी नाराज असल्याचे सांगितले होते. शरद पवारांच्या नेत्यांनी टीका केल्यानंतर संजय राऊतांनी भूमिका स्पष्ट केली आहे. राऊत म्हणाले की, “शरद पवारांना आम्ही नेहमी मुंबईत भेटतो. शरद पवारांविषयी नाराजी असण्याच कारण काय?. आम्ही एका विशिष्ट घटनेपुरता आमची भूमिका मांडली. नाराजी व्यक्त केली नाही, टीका केली नाही. शरद पवारांबद्दल आमच्या मनात नाराजी नाही. पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याने महाराष्ट्राने ज्याला गद्दार म्हणून संबोधित केलं, ज्याने बेईमानी करुन अमित शाहंशी हातमिळवणी करुन सरकार पाडलं. त्याचा सत्कार पवार साहेबांच्या हातून होणं हा पवार साहेबांचा अपमान आहे” असे मत खासदार राऊतांनी व्यक्त केले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर देखील निशाणा साधला आहे. खासदार राऊत म्हणाले की, “आम्हाला असे प्रश्न केले की, आम्ही पवार साहेबांवर टीका करतोय. माझे आणि पवार साहेबांचे संबंध यांना माहित नाहीत. ते आम्हाला पित्यासमान आहेत. पण मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली. शरद पवारांवर टीका केली नाही” असं संजय राऊत म्हणाले. “शिंदे गटाला आलेला पवार साहेबांचा पुळका खोटा आहे. अमित शाह महाराष्ट्रात येऊन शरद पवारांवर टीका करतात. अमित शाह बोलतात पवार साहेबांनी सहकाराचा बट्टयाबोळ केला, लूट केली, त्यावेळी पवार साहेबांचा अपमान झाला नाही का?. रेंद्र मोदी पवारसाहेबांना भटकती आत्मा म्हणाले, तेव्हा यांच्या तोंडाला बूच बसली होती का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली नसती, तर अजित पवार फुटले नसते, सरकार कोसळलं नसतं. त्यामुळे मी जी भूमिका मांडतोय ती शरद पवारांची भूमिका असायला हवी. एकनाथ शिंदे या माणसाने अमित शाहंशी हातमिळवणी करुन पक्ष फोडले, तुम्ही त्याची भलामण करताय. मी बोललो, माझ्यात हिम्मत आहे, हे ढोंगी, भंपक लोक आहेत. मला अजिबात पोटदुखी नाही. शरद पवारांनी तिथे जाणं महाराष्ट्राला रुचलेलं नाही. त्यांच्या पक्षातील नेत्यांना पटलेलं नाही. त्यांना महादजी शिंदे यांच्या नावाने पुरस्कार देणं, हा शूर योद्धा जो दिल्लीपुढे कधी झुकला नाही, त्या महादजी शिंदे यांचा अपमान आहे, ही आमची भूमिका आहे”, अशी भूमिका खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे.

Web Title: Mp sanjay raut gives clarification about criticizing on eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2025 | 12:59 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • sanjay raut

संबंधित बातम्या

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
1

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

Tukaram Mundhe on Sanjay Raut : ‘पुरावे द्या,’ संजय राऊतांच्या FDA वरील आरोपांवर तुकाराम मुंढेचं उत्तर
2

Tukaram Mundhe on Sanjay Raut : ‘पुरावे द्या,’ संजय राऊतांच्या FDA वरील आरोपांवर तुकाराम मुंढेचं उत्तर

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
3

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

‘त्यादिवशी राऊतांचं तोंड काळं करण्यासाठी..,’ राऊतांच्या आरोपांवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर, सिंधुदुर्गच्या जमिनीवरून राजकारण तापलं
4

‘त्यादिवशी राऊतांचं तोंड काळं करण्यासाठी..,’ राऊतांच्या आरोपांवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर, सिंधुदुर्गच्या जमिनीवरून राजकारण तापलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.