तिसऱ्या आघाडीमुळे 'या' मतदारसंघात वाढणार मविआचे टेन्शन ; विशाल पाटील आबांच्या लेकाविरोधात बंड करणार?
लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये सांगलीतून विशाल पाटील हे अपक्ष खासदार म्हणून निवडून आले आहेत. सांगलीचे खासदार विशाल पाटील हे आज तासगावमधील एका आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यांनुसार येत्या विधानसभा निवडणुकीत तासगाव कवठेमहांकाळ या ठिकाणी तिसऱ्या आघाडीचा प्रयोग होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून शरद पवार गटातील स्वर्गीय मणी गृहमंत्री आर. आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र खासदारांच्या वक्तव्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात आता वेगळीच चर्चा रंगू लागली आहे.
विधानसभा मतदार संघात रोहित पाटील विरुद्ध माजी खासदार संजय काका पाटील यांचा मुलगा यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. मात्र या ठिकाणी हे दोन्ही उमेदवार नको म्हणून तिसऱ्या आघाडीने आपली ताकद निर्माण करण्यास सुरूवात केली आहे. तिसरी आघाडी उभी राहिल्यास दोन्ही पाटील कुटुंबासाठी या मतदारसंघात अवनात्मक स्थिती निर्माण होऊ शकते.
अपक्ष खासदार विशाल पाटील हे तासगावमधील एका कार्यक्रमात बोलत होते. माजी मंत्री अजित घोरपडे यांनी या कार्यक्रमाचे आयोचजन केले होते. या कार्यक्रमात बोलताना रावणाचे दहन करणे सोपे नव्हते पण, रावणाची लंका पेटवून खाक केली असे खासदार विशाल पाटील म्हणाले आहेत. तासगाव-कवठे महाकाल मतदारसंघात अजित घोरपडे यांच्याशिवाय पर्याय नाही असे खासदार विशाल पाटील म्हणाले आहेत.
हेही वाचा: विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी! आर. आर. पाटील यांच्या कुटुंबाविरोधात संजय पाटलांचा निर्धार
लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांच्या विजयासाठी रोहित पाटील यांनी मदत केली होती. तसेच सांगलीची लोकसभेची जागा ठाकरे गटाकडे गेल्याने सांगलीचे काँग्रेस नेते कमालीचे नाराज झाले होते. दिल्लीवाऱ्या करून, चर्चा करून देखील या जागेचा प्रश्न सुटला नव्हता. त्यामुळे विशाल पाटील हे सांगली लोकसभेसाठी अपक्ष म्हणून उभे राहिले. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. तसेच काँग्रेसचा हा पारंपरिक मतदारसंघ असल्याचे म्हटले जाते.
दरम्यान विशाल पाटील हे अपक्ष उभे राहिले. महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील हे अधिकृत उमेदवार होते. मात्र तरीही काँग्रेस पक्ष विशाल पाटील यांच्या चर्चा आहे. दरम्यान विशाल पाटलांनी महायुतीच्या संजय काका पाटील यांचा आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांचा देखील पराभव केला. मात्र आता तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघात अजित घोरपडे यांच्या मागे उभे राहणार असे त्यांच्या वक्तव्यावरून वाटत आहे. रोहित पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना विशाल पाटील हे लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही बंड करायच्या तयारी असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे मविआची चिंता वाढली आहे.