Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC Exams : मोठी बातमी! ‘MPSC च्या सर्व परीक्षा मराठीत होणार’, मुख्यमंत्री फडणवीसांची विधान परिषदेत माहिती

ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीच्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याची राज्य सरकारची योजना असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत एक्सवरही पोस्ट करत माहिती दिली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Mar 12, 2025 | 10:25 PM
मोठी बातमी! ‘MPSC च्या सर्व परीक्षा मराठीत होणार’, मुख्यमंत्री फडणवीसांची विधान परिषदेत माहिती

मोठी बातमी! ‘MPSC च्या सर्व परीक्षा मराठीत होणार’, मुख्यमंत्री फडणवीसांची विधान परिषदेत माहिती

Follow Us
Close
Follow Us:

विधानपरिषदेचे सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी एमपीएससीच्या परीक्षा मराठीत घेण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. आमदार नार्वेकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीच्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याची राज्य सरकारची योजना असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत एक्सवरही पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यामुळे MPSC ची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी आणखी सोपी होण्याची शक्यता आहे.

एमपीएससीच्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीत !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत राज्यात एमपीएससीच्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याची योजना राज्य सरकार करत असल्याची माहिती दिली.

विधानपरिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी एमपीएससीच्या परीक्षा मराठीत घेण्यासंदर्भात…

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 12, 2025

देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एक्सवर पोस्ट करत म्हटले की, “विधानपरिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी एमपीएससीच्या परीक्षा मराठीत घेण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. सध्या अभियांत्रिकी आणि कृषी तांत्रिक पदांच्या परीक्षा इंग्रजीत घेतल्या जातात, कारण संबंधित पुस्तके मराठीत उपलब्ध नाहीत. मात्र, आता अभियांत्रिकी शिक्षण मराठीत घेण्यास परवानगी मिळाल्याने लवकरच या अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीत उपलब्ध होतील. त्यानुसार, सर्व तांत्रिक पदांच्या परीक्षा मराठीत घेण्याचे नियोजन राज्य शासनाने केले आहे.”

याचबरोबर आज विधानपरिषदेचे सदस्य सतेज ऊर्फ बंटी पाटील, अभिजित वंजारी, भाई जगताप, जयंत आसगावकर, राजेश राठोड, धीरज लिंगाडे, डॉ. प्रज्ञा सातव, मिलिंद नार्वेकर, सुनिल शिंदे यांनी एमपीएससी संदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले होते. यावेळी एमपीएससीमार्फत होणारी पदभरती आणि पारदर्शकता व पेपरफुटीवरही प्रश्न विचारण्यात आले होते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे दिली आहेत.

यावेळी, शासनाने रिक्त पदे भरण्यासाठी घोषणा करुनही १५ पेक्षा जास्त विभागात भरती प्रक्रिया राबविण्यात आली नाही, तसेच तलाठी व जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया राबविल्यानंतर उमेदवार पात्र होऊनही त्यांना नियुक्तीचे पत्र दिले नाही, हे ही खरे आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता.

याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “तलाठी तसेच जिल्हा परिषदेतील पदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जात नाहीत. तसेच नियुक्ती पत्र देण्याची कार्यवाही देखिल आयोगामार्फत केली जात नाही. त्यामुळे या विषयाचा आयोगाच्या मनुष्यबळाशी कोणताही संबंध नाही.”

Web Title: Mpsc exams in marathi maharashtra cm devendra fadnavis announces in vidhan parishad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 10:25 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Marathi Literature
  • MPSC Exams

संबंधित बातम्या

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘या’ बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे लोकार्पण
1

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘या’ बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे लोकार्पण

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…
2

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत
3

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ
4

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.