Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC Gratuity: एसटीत ग्राजुटी घोटाळा! महामंडळाला करोडो रुपयांच्या व्याजाचा भुर्दंड, कामगार संघटनेची आक्रमक भूमिका

एसटी महामंडळात ग्रॅज्युइटी संदर्भातील अनियमितता समोर आल्याने कोट्यवधी रुपयांच्या व्याजाचा भुर्दंड बसल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणामुळे आर्थिक व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 17, 2026 | 03:46 PM
एसटीत ग्राजुटी घोटाळा! महामंडळाला करोडो रुपयांच्या व्याजाचा भुर्दंड, कामगार संघटनेची आक्रमक भूमिका

एसटीत ग्राजुटी घोटाळा! महामंडळाला करोडो रुपयांच्या व्याजाचा भुर्दंड, कामगार संघटनेची आक्रमक भूमिका

Follow Us
Follow Us:
  • एसटीत ग्राजुटी घोटाळा
  • महामंडळाला करोडो रुपयांच्या व्याजाचा भुर्दंड
  • कामगार संघटनेची आक्रमक भूमिका
MSRTC Gratuity Interest Scam Update: एसटी महामंडळात निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपदान म्हणजेच ग्रज्युटी वेळेत न दिल्याने त्यावर करोडो रुपयांचे व्याज द्यावे लागले असून या ग्राजुटी घोटाळ्यात सहभागी एसटी मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

एसटी महामंडळात कर्मचाऱ्यांसाठी उपदान विश्वस्त मंडळ असून त्यातून निवृत्ती नंतर ३० दिवसांच्या आत ग्रॅज्युटी रक्कम देण्यात येते. ग्रॅज्युटीची कमाल मर्यादा २० लाख इतकी असली तरी कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या कालावधी प्रमाणे कमी जास्ती ग्रॅज्युटी रक्कम देण्यात येते. नियमाप्रमाणे ३० दिवसाच्या आत ही रक्कम दिली नाहीतर यावरील महिन्याला अंदाजे सरासरी दहा टक्के इतके व्याज निवृत्त कर्मचाऱ्यांना द्यावे लागते. खरेतर ही रक्कम कुठलीही सबब न देता संबंधित कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात ३० दिवसांच्या आत जमा करण्याचा नियम आहे.

Mira Bhayander : भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य; नवघर पोलीस ठाण्यात नगरसेवकांचे आंदोलन

पण बँक, पतपेढी, व इतर देणी रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांकडून थकीत असल्यास ना हरकत प्रमाणपत्र वेळेवर येत नाही.परिणामी कर्मचारी न्यायालयात केस दाखल करतात. तसेच काही प्रकरणात चेकवर सह्या करणारे अधिकारी सुट्टीवर आहेत.संबंधित काम हाताळणारे कर्मचारी सुट्टीवर आहेत असे सांगून सुद्धा ग्रॅज्युटी उशिरा दिली जाते. त्याच प्रमाणे निवृत्त होणारे कर्मचारी व अधिकारी यांनी कर्मचारी निवासस्थान न सोडल्याने त्याच प्रमाणे अपराध प्रकरणी कारवाई अपूर्ण राहिली असल्याचे कारण सांगून सुद्धा ही रक्कम वेळेवर देण्यात येत नाही. काही विभागात तर त्या विभागातील काही अधिकारी व कर्मचारी हे काहीही कारण सांगून सदरची रक्कम देत नाहीत.

संबंधित निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना संपर्क साधून न्यायालयात किंवा अन्य न्यायिक संस्थात जायला सांगतात व अशी प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. परिणामी संबंधित संबंधित विभागाकडून सदरच्या रक्कमेवरील व्याज दहा टक्के दराने देण्यात येते. त्यातील काही रक्कम एसटी मधील संबंधित अधिकारी व वकील यांच्यात वाटून घेतली जाते. असेही प्रकार समोर आले असून काही अधिकाऱ्यांच्या बेपर्वाई मुळे राज्यभरात गेल्या पाच वर्षांत साधारण दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक व्याज देण्यात आले आहे. या प्रकरणी काही निवृत्त कर्मचाऱ्यांना सुद्धा विनाकारण त्रासाला सामोरे जावे लागले असून काही ठिकाणी साटेलोटे सुद्धा झाले आहे.या प्रकारावर एखादी समिती नेमून एसटी मधील संबंधित हित संबंध असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनातून सदरची रक्कम वसूल करण्यात आली पाहिजे असेही बरगे यांनी म्हटले आहे.

मुंबईची दुसरी ‘लाईफलाईन’ संकटात! बेस्टमध्ये 16 हजारांहून अधिक पदे रिक्त; अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे वाहतूक सेवेवर परिणाम

Web Title: Msrtc gratuity scam st mahamandal interest loss news updates news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 03:46 PM

Topics:  

  • msrtc
  • st bus
  • st mahamandal

संबंधित बातम्या

MSRTC Electric Bus: २०३७ पर्यंत एसटीची ‘ई-लालपरी’! संपूर्ण ताफा १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचे लक्ष्य
1

MSRTC Electric Bus: २०३७ पर्यंत एसटीची ‘ई-लालपरी’! संपूर्ण ताफा १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचे लक्ष्य

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद
2

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद

MSRTC NCMC Card: महिला अन् ज्येष्ठ नागरिकांनी लक्ष द्या! 1 ऑक्टोबरपासून NCMC कार्ड असेल तरच मिळणार सवलतीचे तिकीट, अन्यथा…
3

MSRTC NCMC Card: महिला अन् ज्येष्ठ नागरिकांनी लक्ष द्या! 1 ऑक्टोबरपासून NCMC कार्ड असेल तरच मिळणार सवलतीचे तिकीट, अन्यथा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.