
करोडो रुपये खर्च करूनही रस्ते खड्डेमय
हेडलाईट बल्बही नवे नाहीत
प्रवासात हेडलाईटचा प्रकाश कंदिलासारखा
गुहागर: महामार्गावर रातराणी धावणाऱ्या एसटीच्या बसना अंधुक प्रकाशात मार्गक्रमण करावे लागत आहे. बसच्या पुढील हेडलाईटचा प्रकाशच जणू कंदिलासारखा अंधुक दिसत असल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागते. रस्त्यावरील जवळचा खड्डाही दिसत नाही. त्यामुळे बस आदळणे, एखाद्या अवघड वळणावरही हेडलाईटचा प्रकाश पोहचत नसल्याने समोर येणारे वाहन लगेच दिसत नाही.
त्यामुळे एसटी चालक हैराण झाले असून एसटीची प्रकाशवाटही बिकट झाल्याचे त्यांच्याकडून बोलले जात आहे. एसटीच्या बस रातराणी धावतात. विशेष करुन लांब पल्यावर मार्गक्रमण करत आहेत. या बसच्या पुढील हेडलाईटचा प्रकाश अंधुक असल्याने चालकाला वाहनचालकाला मोठी कसरत करावी लागते. एकादा खड्डा समोर आला तरी तो लगेच या प्रकाशात दिसत नाही. बस रस्त्याच्या कडेला घेतानाही अवघड बनते.
हेडलाईट बल्बही नवे नाहीत
पुरेसा प्रकाश हेडलाईटला नसल्याने हे प्रकार घडत आहेत. डिकेटरचा प्रकाशही अंधुक दिसून येतो. बसच्या बॅटऱ्या व हेडलाईटमधील बल्बही बदलले जात नसल्याने अंधुक प्रकाशात वाहनचालकांना चाचपडत बस चालवावी लागत आहे. एखाद्या वळणावरही बस चालकाला पुढील रस्ता चटकन लक्षात येत नाही. त्यामुळे अपघाताचीही शक्यता असते. एसटी प्रशासनाने अशा लांब पल्ल्यावर रातराणी धावणाऱ्या बसमध्ये सुधारणा करून एसटी प्रकाशवाट सुरळीत करावी, अशी मागणी या त्रासाला सामोरे जाणाऱ्या वाहनचालकांनी केली आहे.
ST Bus: शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी एसटीची हेल्पलाईन सुरू, प्रताप सरनाईक यांची माहिती
करोडो रुपये खर्च करूनही रस्ते खड्डेमय
एसटी महामंडळ आपल्या तापयामध्ये नवनवीन म्हणजेच विठाई, शिवनेरी, शिवशाही, एसी स्लीपर कोच अशा वेगवेगळ्या रूपांत गाड्या आणीत आहे. प्रवाशांना आरामदायी व सुखकर प्रवास कसा होईल यासाठी महामंडळ प्रयत्न करीत आहे. चालक वाहकही आपल्या गाडीचे अर्निंग कसे वाढेल यासाठी प्रयत्न करीत असतात. मात्र लांब पल्ल्याच्या गाड्यांना महामार्गातील खड्यांना सलामी देवून जावे लागते. करोडो रुपये खर्च करून बनवण्यात येत असलेले महामार्ग अद्याप खड्डेमय आहेत. सबंधित लोकप्रतिनिधी मात्र या महामार्गाच्या करोडोच्या निधीवरील लोण्याचा गोळा बोक्याप्रमाणे खावून गप्प बसत आहेत, असा नाराजीचा सूर आता उमटतो आहे.
विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी एसटीची हेल्पलाईन सुरू
शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी -विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एसटी बसेस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी यासाठी एसटी महामंडळाची ‘ १८००२२१२५१ या क्रमांकाची हेल्पलाइन ‘ सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.