Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एस.टी.महामंडळाला सुगीचे दिवस! कमावला ‘इतक्या’ कोटींचा नफा

गेली पाच ते सहा वर्ष अनेक आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला भविष्यात सुगीचे दिवस येतील अशी आशा एसटी कर्मचारींच्या मनात होती. आता तीच आशा सत्यात उतरली आहे. एसटीच्या 31 पैकी 18 विभागांनी जुलै महिन्यात नफा कमावला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 14, 2024 | 08:21 PM
फोटो सौजन्य- एसटी महामंडळ

फोटो सौजन्य- एसटी महामंडळ

Follow Us
Follow Us:

 

कोरोनाच्या भीषण महामारीमुळे गेल्या काही वर्षांपासून एसटी महामंडळाला तोट्याचा सामना करावा लागत होता. परंतु आता त्यांना सोन्याचे दिवस आले आहेत असे बोलल्यास काही हरकत नाही. याचे कारण म्हणजे एसटी महामंडळाला जुलै महिन्यात झालेला नफा.

जुलै महिन्यात एसटीच्या 31 विभागांपैकी 18 विभागांनी चांगला नफा कमवला आहे. या महिन्यात एसटी महामंडळाचा तोटा २२ कोटी इतका नाम मात्र झालेला आहे. यंदा एप्रिल ते जुलै, 2024 मध्ये मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत १३१ कोटी रुपयांनी तोटा कमी झाला आहे. जुलै महिन्यात नफा कमावणाऱ्या विभागांचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी अभिनंदन केले असून, उर्वरित विभागांनी देखील ऑगस्ट महिन्यात प्रयत्नांची पराकाष्टा करून संपूर्ण महामंडळ फायद्यात येईल असे प्रयत्न करावे असे आवाहन केले आहे.

दोन वर्ष कोरोना महामारी आणि त्या पाठोपाठ सहा महिने कर्मचाऱ्यांचा चाललेला दीर्घकालीन संप यामुळे एस टी महामंडळ आर्थिक दृष्ट्या डबघाईला आले होते. यामुळे एसटी बंद पडते की काय? अशी अवस्था निर्माण झाली होती.

मे २०२२ पासून एसटीची सुरळीत वाहतूक सेवा सुरू झाली. तथापि, एसटीचा घटलेला प्रवासी पुनश्च एसटीकडे वळविणे हे मोठे आव्हान होते. अशावेळी राज्य शासनाने ७५ वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास व सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात ५० टक्के सवलत या दोन योजना सुरू केल्या, की ज्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत भरघोस वाढ झाली. सध्या 53 लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करीत आहेत.

याबरोबरच एसटी प्रशासनाने गेल्या वर्षभरात ” हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान”, विद्यार्थ्यांना शाळेत थेट पास, प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिन, श्रावणात एसटी संगे तीर्थाटन, असे अनेक अभिनव उपक्रम राबविले. तसेच जे विभाग गेली कित्येक वर्ष तोट्या मध्ये आहेत, त्या विभागांना मार्गदर्शन करण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडून पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेली. स्थानिक पातळीवर आगारनिहाय कर्मचारी व अधिकारी यांच्या बैठका घेण्यात आल्या. तोट्याच्या मार्गावरील बस फेऱ्या बंद करून, त्या ज्या मार्गावर प्रवासी जास्त आहेत तेथे वळविण्यात आल्या.

कुठल्या विभांगांनी मिळवला नफा

जुलै महिन्यामध्ये 31 विभागांपैकी 18 विभाग नफ्यामध्ये आले आहेत. त्यापैकी जालना (3.34 कोटी), अकोला (3.14 कोटी), धुळे (3.7 कोटी), परभणी (2.98 कोटी), जळगाव (2.40 कोटी), बुलढाणा (2.33 कोटी) या ‍विभागांनी 2 कोटी पेक्षा जास्त नफा कमावला आहे.

Web Title: Msrtc made a profit of crores

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2024 | 08:20 PM

Topics:  

  • maharashtra news
  • ST Workers

संबंधित बातम्या

Jalgaon : “जनता दुष्काळात असताना खडसे कुटुंबीय फुगड्या  खेळत होतं – चंद्रकांत पाटील | Navarashtra
1

Jalgaon : “जनता दुष्काळात असताना खडसे कुटुंबीय फुगड्या खेळत होतं – चंद्रकांत पाटील | Navarashtra

Rajapur News: राजापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याच्या दुचाकीला अचानक आग!
2

Rajapur News: राजापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याच्या दुचाकीला अचानक आग!

Jalgaon News: पायांना साखळी, कुलूप अन् तापी नदीत मृतदेह! जोडप्याच्या हत्येने खळबळ; नेमकं काय घडलं?
3

Jalgaon News: पायांना साखळी, कुलूप अन् तापी नदीत मृतदेह! जोडप्याच्या हत्येने खळबळ; नेमकं काय घडलं?

Jalgaon News: ग्रामरोजगार सेवकांचा एल्गार! २४ महिन्यांचे थकीत मानधनासाठी कामबंद आंदोलनाचा इशारा
4

Jalgaon News: ग्रामरोजगार सेवकांचा एल्गार! २४ महिन्यांचे थकीत मानधनासाठी कामबंद आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.