Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: ग्रामरोजगार सेवकांचा एल्गार! २४ महिन्यांचे थकीत मानधनासाठी कामबंद आंदोलनाचा इशारा

Jalgaon News: महाराष्ट्रातील ग्रामरोजगार सेवकांचे २४ महिन्यांपासून प्रलंबित असलेले मानधन आणि प्रवास भत्ता दिवाळीपूर्वी थेट बँक खात्यात जमा करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेने केली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 08, 2026 | 02:10 PM
Jalgaon News: ग्रामरोजगार सेवकांचा एल्गार!(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News: ग्रामरोजगार सेवकांचा एल्गार!(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ग्रामरोजगार सेवकांचे २४ महिन्यांपासून मानधन प्रलंबित असल्याचा संघटनेचा दावा.
  • दरमहा ८ हजार मानधन आणि २ हजार प्रवास भत्ता देण्याची मागणी.
  • दिवाळीपूर्वी मागणी मान्य न झाल्यास रोहयोची कामे ठप्प करण्याचा इशारा.
पारोळा (वा.) महाराष्ट्र शासनाने ३ ऑक्टोबर रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार ग्रामरोजगार सेवकांना दरमहा ठोक मानधन व प्रवास भत्ता गेल्या २४ महिन्यांपासून प्रलंबित आहे. या निर्णयाची जशीच्या तशी अंमलबजावणी करून थकीत मानधन तात्काळ दिवाळी पूर्वी वितरीत करावे, याविषयी ‘महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटने’च्या वतीने कामबंद आंदोलनाचे निवेदन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देऊन तालुका स्तरावर तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना सुद्धा निवेदन दिले आहे, सन २००६-०७ पासून राज्यातील ग्रामरोजगार सेवक तुटपुंज्या मानधनावर सर्व प्रकारे मनरेगाची ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने गावातील जॉबकार्ड धारक रोजगाराची सर्व कामे करत आहेत. Jalgaon News:

वैयक्तिक बँक खात्यावर जमा

शासनाने ३० सप्टेंबर २०२४ च्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन ३ ऑक्टोबर २०२४ रोजी शासन निर्णय निर्गमित केला होता, त्यानुसार ग्रामरोजगार सेवकांना दरमहा ८ हजार ठोक मानधन आणि २ हजार प्रवास भत्ता असे एकूण १० हजार थेट वैयक्तिक बँक खात्यावर जमा करण्याचे घोषित करण्यात आले आहे.

मानधन लवकर देण्याविषयी रोहयो मंत्री न यांनी वेळोवेळी आश्वासित केलेले आहे, ते वेळेवर न मिळाल्यामुळे राज्यातील ग्रामरोजगार सेवकांमध्ये न तीव्र असंतोष पसरला आहे म्हणुन ते दिवाळी पूर्वी चेट – खात्यात द्यावे, हिच संघटनेची मागणी आहे.- सुरेश पाटोळे, राज्य सल्लागार तथा जिल्हाध्यक्ष

रोहयोची सर्व कामे ठप्प करण्याचा इशारा…

३ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार दरमहा १० हजार मानधन दिवाळीच्या अगोदर तात्काळ थेट बैंक खात्यात जमा करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. जळगाव यांच्यासह पारोळा तहसिलदार व गटविकास अधिकाऱ्यांना बेमुदत कामबंद आंदोलनाचे निवेदन देण्यात आलेले आहे. येत्या ८ दिवसात दिवाळीपूर्वी मागणी मान्य न झाल्यास ग्रामीण भागातील रोहयोची सर्व कामे पूर्णपणे ठप्प करण्याचा इशारा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब तायडे, जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे आणि सर्व तालुकाध्यक्ष यांनी दिला आहे.

Solar News : आता वीज बिल येणार झिरो! पाचोऱ्यात हजारो ग्राहकांचा सोलर योजनेला उदंड प्रतिसाद; अवघ्या 8-10 दिवसांत प्रक्रिया पूर्ण

सेवकांना स्वखर्चाने करावी लागतात कामे

मात्र, तब्बल २४ महिने उलटूनही या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. या कामांसाठी विविध जिल्ह्यातील आणि तालुक्यातील प्रवास व अल्पोपहार भत्ता मागणी करून सुद्धा दिलेला जात नाही, यामुळे ग्रामरोजगार सेवकांना वैयक्तिक पदरमोड करून स्वखचनि कामे करावी लागत आहेत. शासनाने सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत ३ ऑक्टोबरच्या जीआर नुसार मानधन वितरीत न केल्यामुळे राज्यव्यापी कामबंद आंदोलन करणेबाबत निवेदन देण्यात आले.

एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवर ड्रोनद्वारे रेकी! पोलिसांकडे तक्रार; घटना कॅमेऱ्यात कैद

आहे, या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील रोहयो व विकासकामांवर होणाऱ्या परिणामास शासन व – प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रसंगी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब तायडे, राज्य संघटक खुशाल पाटील, उमेश तायडे, राज्य सल्लागार तथा – जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे, जिल्हा सचिव अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिका-यांनी वतीने निवेदन देण्यात आले आहे.

Web Title: Gram rojgar sevaks demand pending honorarium before diwali rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • Jalgaon
  • Jalgaon News
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
1

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

Jalgaon Farmers Face Crisis : मक्याच्या उत्पादनात घट; जळगाव येथील चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकटाची परिस्थिती
2

Jalgaon Farmers Face Crisis : मक्याच्या उत्पादनात घट; जळगाव येथील चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकटाची परिस्थिती

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी
3

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी

वडिलांच्या मालकीची परवानाधारक रायफल साफ करताना घडली घटना; लोणावळा शहर पोलिसांकडून तपास सुरू
4

वडिलांच्या मालकीची परवानाधारक रायफल साफ करताना घडली घटना; लोणावळा शहर पोलिसांकडून तपास सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.