Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

५२ भटके-विमुक्त जातींच्या कला-परंपरांचा मुंबईत भव्य महोत्सव आयोजित करणार – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

महाराष्ट्रातील ५२ भटके-विमुक्त जातींच्या कला, संस्कृती आणि परंपरांना व्यापक व्यासपीठ मिळणार आहे. मुंबईत राज्यस्तरीय भव्य महोत्सव आयोजित करण्याची तयारी पर्यटन विभागाने सुरू केली आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंची माहिती.

  • By विवेक
Updated On: Sep 01, 2026 | 09:42 PM
Shambhuraj Desai

Shambhuraj Desai

Follow Us
Follow Us:
  • मुंबईत ५२ भटके-विमुक्त जातींच्या कला-परंपरांचा महोत्सव होणार.
  • देश-विदेशातील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीची ओळख करून देण्याचा प्रयत्न.
  • वासुदेव, बहुरूपी, गोंधळी, बंजारा यांसह विविध समाजांच्या कलांना व्यासपीठ मिळणार.
 

मुंबई, दि. ३१ : भटके-विमुक्त समाजातील ५२ जातींच्या कला, संस्कृती, परंपरा आणि कलागुणांना व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून मुंबईत भव्य राज्यस्तरीय महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील भटके-विमुक्त समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरांची देशांतर्गत तसेच परदेशी पर्यटकांना ओळख करून देण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत दिलेल्या सूचनेनुसार पर्यटन विभागाकडून तातडीने कार्यवाही सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

मुंबईतील सायन येथील श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृहात विमुक्त दिनानिमित्त आयोजित ‘शिवसेना भटके-विमुक्त हक्क, न्याय व विकास परिषदेस’ मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केले. अखिल भारतीय शिव भटके-विमुक्त (DNT) सेनेचे राष्ट्रीय नेते तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. यावेळी भटके-विमुक्त समाजातील विविध जातींची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन तसेच संकेतस्थळाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. शिवसेनेचे मंत्री, खासदार, पदाधिकारी, मान्यवर तसेच हजारो समाजबांधव उपस्थित होते.

Nashik Tribal Students Protest: आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून काँग्रेस आक्रमक; स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठकीची मागणी

“महाराष्ट्रातील ५२ जाती-समाजांना एकत्र आणण्याचे काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्यांच्या दूरदृष्टीची झलक आजच्या कार्यक्रमातून दिसली. या समाजांच्या कला आणि परंपरांना व्यासपीठ मिळवून देऊन देश-विदेशातील पर्यटकांना त्यांची ओळख करून देण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री महोदयांनी पर्यटन विभागावर सोपविली आहे. त्यांच्या सूचनेनुसार, मंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन विभाग या महोत्सवाच्या आयोजनासाठी तातडीने कार्यवाही करेल,” असे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

वासुदेव, पिंगळा, बहुरूपी, नाथजोगी/भराडी, नंदीवाले, पाथरवट, वडार, डोंबारी-कोल्हाटी, छप्परबंद, गारुडी, लोहार-घिसाडी, माकडवाले-कैकाडी, भाट, भोई-कहार, चित्रकथी, बेलदार, बंजारा, मलणजोगी, ओतारी, गोसावी, गोंधळी आदी विविध भटके-विमुक्त समाजांच्या कला व परंपरांना या महोत्सवातून स्थान देण्यात येणार आहे. त्यांच्या लोककला, पारंपरिक व्यवसाय, जीवनशैली आणि सांस्कृतिक वारशाचे सादरीकरण पर्यटकांसमोर करण्याचा पर्यटन विभागाचा प्रयत्न राहणार आहे.

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा उद्या नाशिक दौरा; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार

भटके-विमुक्त समाजाच्या हक्क, न्याय आणि विकासासाठी शासन कटिबद्ध असून, त्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच त्यांच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रभावीपणे काम करण्यात येईल, असेही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.

Web Title: Mumbai 52 bhatke vimukt jati kala parampara mahotsav shambhuraj desai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 09:38 PM

Topics:  

  • Shambhuraj Desai
  • Tribal Community
  • Tribal Department

संबंधित बातम्या

Nashik Tribal Students Protest: आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून काँग्रेस आक्रमक; स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठकीची मागणी
1

Nashik Tribal Students Protest: आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून काँग्रेस आक्रमक; स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठकीची मागणी

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण अखेर मागे, परंतु मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर… विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा
2

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण अखेर मागे, परंतु मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर… विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Pune Tribal Students Protest : मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आंदोलनाची दाखल, फडणवीसांची मोठी घोषणा
3

Pune Tribal Students Protest : मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आंदोलनाची दाखल, फडणवीसांची मोठी घोषणा

आदिवासींचे मुख्यमंत्र्यांना निवेदन! समाजाच्या विविध मागण्या; आदिवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित
4

आदिवासींचे मुख्यमंत्र्यांना निवेदन! समाजाच्या विविध मागण्या; आदिवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.