
मुंबई विमान सेवा १५ डिसेंबरपर्यंत बंद
उड्डाणाच्या वेळेत बदल केल्यानंतर प्रथमच अशी रद्दबातल होत होती. अचानक फ्लाइट रद्द झाल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. २६ ऑक्टोबरपासून विमान कंपनीने अमरावती-मुंबई उड्डाणांच्या वेळेत फेरबदल केला आहे. ही सेवा आठवड्यातून ४ दिवस रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार चालवली जाते. मुंब्यांहून सकाळी ७.३० वाजता. उड्डाण, अमरावतीत सकाळी ८.५० वाजता. आगमन, अमरावतीहून सकाळी ९.१५ वाजता. प्रस्थान व मुंबईत सकाळी १०.३० वाजता, आगमन यापूर्वी ही फ्लाइट सायंकाळी चालत होती. मात्र मुंबईत दिवसभराचे काम आटोपून परतू इच्छिणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन वेळ निश्चित करण्यात आला.
३ नोव्हेंबरच्या सकाळी अमरावती विमानतळावर धुके इतके दाट होते की, विमान उतरवणे शक्यच नव्हते. उशीर झाल्यास पुढील उड्डाणांवरही परिणाम झाला असता. त्यामुळे विमान मुंबईहून अमरावतीकडे पाठवलेच गेले नाही. त्यामुळे अमरावतीत प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना अचानक विमानतळावरून परतावे लागले. आता १५ डिसेंबरपर्यंत विमान सेवा बंद असल्याने प्रवासाची योजना आखणाऱ्या प्रवाशांची चिंता वाढली आहे. ज्यांनी आगाऊ बुकिंग केली होती त्यांना उड्डाण रद्द झाल्याचे संदेश पाठविले जात आहेत. त्यामुळे प्रवासी रेल्वे व रस्तेमार्ग यांसारखे पर्याय शोधत आहेत. सेवेमधील अनियमिततेमुळे नाराजीही वाढली आहे. हवामान पूर्णपणे सामान्य झाल्यानंतरच ही सेवा सुरळीत सुरू करता येईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
एप्रिलमध्ये सेवा सुरू झाल्यापासून पावसाळ्यानंतर सतत विविध कारणांनी उड्डाणांमध्ये अनियमितता दिसून येत आहे. खंडित सेवेबाबत देशाचे नागरी उहाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांना माहिती देण्यात आली आहे, सरकार व विमान प्राधिकरणाने या बाबीकडे गाभीयनि लक्ष देणे गरजेचे आहे. – बळवंत वानखडे, खारसदार