Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News: थातूरमातूर डागडुजी; नांदगाव पेठ आयआरबीचा बोगदा ठरतोय जीवघेणा; उड्डाण पुलाखालील काँक्रिटचा भाग कोसळला

शाळकरी विद्यार्थी, शेतमजूर, कामगार व नोकरदारांची वर्दळ सुरू असतानाच उड्डाण पुलावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे बोगद्यात तीव कंपन जाणवू लागले. काही क्षणांतच बोगद्याच्या स्लॅबचा भाग कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 30, 2026 | 05:23 PM
थातूरमातूर डागडुजी; नांदगाव पेठ आयआरबीचा बोगदा ठरतोय जीवघेणा; उड्डाण पुलाखालील काँक्रिटचा भाग कोसळला

थातूरमातूर डागडुजी; नांदगाव पेठ आयआरबीचा बोगदा ठरतोय जीवघेणा; उड्डाण पुलाखालील काँक्रिटचा भाग कोसळला

Follow Us
Close
Follow Us:
  • नांदगाव पेठ आयआरबीचा बोगदा ठरतोय जीवघेणा
  • उड्डाण पुलाखालील काँक्रिटचा भाग कोसळला
  • २०१३ मधील निकृष्ट बांधकामाची पोलखोल
अमरावती : राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पेठ येथे आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने उभारलेल्या उड्डाण पुलाखालील बोगद्याच्या स्लॅबला तडे जाऊन त्याचा काही भाग कोसळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी (२९ जानेवारी 2026) सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सुदैवाने त्यावेळी बोगद्यातून वाहतूक सुरू नसल्याने मोठी जीवितहानी टळली; मात्र भविष्यातील धोका अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गुरुवारी सकाळी शाळकरी विद्यार्थी, शेतमजूर, कामगार व नोकरदारांची वर्दळ सुरू असतानाच उड्डाण पुलावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे बोगद्यात तीव कंपन जाणवू लागले. काही क्षणांतच बोगद्याच्या स्लॅबचा भाग कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. प्रसंगावधान राखत स्थानिक तरुणांनी तत्काळ बोगद्याचा मार्ग बंद करून काटेरी कुंपण उभारले व पोलिस तसेच ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व आयआरबी प्रशासनाला घटनेची माहिती दिली. घटनेनंतर बराच वेळ परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

१५ दिवसांपासून घंटागाड्या बेपत्ता, महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत शहर घाणीच्या विळख्यात

आयआरबीच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह घटनेनंतर आयआरबी कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, केवळ तात्पुरती डागडुजी करून त्यांनी काढता पाय घेतला, असा आरोप संतप्त नागरिकांकडून केला जात आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही ठोस, कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने संताप अधिकच वाढला आहे. “वेळीच हा प्रकार लक्षात आला नसता, तर मोठी दुर्घटना अटळ होती,” अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. हा बोगदा शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण, शेतकरी, शेतमजूर, कामगार व नोकरदार वर्गासाठी रोजच्या ये-जा करण्याचा मुख्य मार्ग असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

२०१३ मधील निकृष्ट बांधकामाची पोलखोल

राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणावेळी सन २०१३ मध्ये स्थानिक नागरिकांची मागणी नसतानाही आयआरबी कंपनीने मनमानी पद्धतीने येथे बोगदे उभारले होते. त्या काळातच या बोगद्यांच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. आज स्लॅब कोसळल्याने त्या वेळच्या निकृष्ट बांधकामाची पोलखोल झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. उड्डाण पुलावरून सातत्याने मोठ्या वेगाने वाहने धावत असल्याने बोगद्याला कायम धक्के जाणवत आहेत. अशा स्थितीत हा बोगदा तसेच संपूर्ण उड्डाण पूल अत्यंत धोकादायक बनला असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

राजकीय घडामोडींना वेग, कोल्हापुरात भाजपचाच महापौर? शिंदे सेनेच्या हालचालींवर काँग्रेसचे लक्ष

Web Title: Irb workshop in nandgaon peth is turning deadly a concrete section under the flyover collapse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2026 | 05:23 PM

Topics:  

  • amravati
  • maharashtra

संबंधित बातम्या

Nashik News : अबब! वर्षभर सोसावी लागणार वाहतूक कोंडी! पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या सविस्तर बातमी
1

Nashik News : अबब! वर्षभर सोसावी लागणार वाहतूक कोंडी! पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या सविस्तर बातमी

एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयात घुसून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी शाब्दिक हुज्जत, श्रीरंग बरगे यांची चौकशीची मागणी
2

एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयात घुसून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी शाब्दिक हुज्जत, श्रीरंग बरगे यांची चौकशीची मागणी

Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण होणार? या नावांची होतेय चर्चा
3

Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण होणार? या नावांची होतेय चर्चा

Republic Day: दिल्लीच्या कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा डंका! ‘गणेशोत्सव’ चित्ररथाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक
4

Republic Day: दिल्लीच्या कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा डंका! ‘गणेशोत्सव’ चित्ररथाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.