Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई, पुणे रेल्वेचे आरक्षण फुल्ल; विदर्भवासियांना गणेशोत्सवासाठी मिळेना आरक्षण

थेट अमरावतीला येणे जमत नसेल तर बडनेरा येथे उतरून अमरावतीला येणेही फारसे अवघड नाही. त्यामुळे मुंबई, पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या बहुतेक सर्वच सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळेनासे झाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 10, 2025 | 12:13 PM
कोकणसाठी विशेष गाड्या

कोकणसाठी विशेष गाड्या

Follow Us
Close
Follow Us:

अमरावती : गणेशोत्सवासाठी कोकणात लाडक्या बाप्पाच्या भेटीसाठी जाणाऱ्या हजारो भाविकांसाठी मध्य रेल्वेने २५० विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. त्यातच आता या गाड्यांच्या व्यतिरिक्त आणखी ४४ गणपती विशेष रेल्वेगाड्या चालवल्या जाणार आहेत. पण विदर्भवासियांना गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेगाड्यांची अद्यापही प्रतीक्षा आहे.

आतापासूनच गणेशोत्सव तसेच महालक्ष्मी पूजनाच्या कालावधीसाठी अमरावती, बनेराहून मुंबई, पुणे, अहमदाबादकडून येणाऱ्या व जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. गणेशोत्सवाला २७ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. गणेशोत्सवाच्या आधी दोन ते तीन दिवसांचे तसेच गणेशोत्सवादरमान व गणेशोत्सवा नंतरचे तीन ते चार दिवस आरक्षण मिळेनासे झाले आहे. या कालावधीत मुंबई, पुणे, अहमदाबादसह इतर मोठ्या शहरांमध्ये राहणारे चाकरमाने, विद्यार्थी, तसेच संपूर्ण कुटुंबच गृहनगरात येऊन हा उत्सव आप्त, मित्रांसह साजरा करत असतात.

गणेशोत्सव आटोपला की, पुन्हा कर्तव्यस्थळी परत जातात. त्यामुळे आतापासूनच गणेशोत्सव तसेच महालक्ष्मी पूजनाच्या कालावधीत अमरावती सीएसएमटी एक्स्प्रेस, अमरावती-पुणे एक्स्प्रेस, अमरावती-जबलपूर, अमरावती पुणे (रात्री १०.५०), गीतांजली एक्स्प्रेस, गरीबरथ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, विदर्भ एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस या सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल असल्यामुळे प्रवासी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा केव्हा होते, याची वाट बघत आहेत. काहींनी पर्याय म्हणून ट्रॅव्हल्सच्या तिकिटाचे नियोजन केले असून ज्यांच्याकडे स्वतःची वाहने आहेत, त्यांना नाईलाजाने त्यांच्या वाहनातून गृहनगरापर्यंत प्रवास करावा लागणार आहे.

दीड ते दोन महिने आधीच आरक्षण

थेट अमरावतीला येणे जमत नसेल तर बडनेरा येथे उतरून अमरावतीला येणेही फारसे अवघड नाही. त्यामुळे मुंबई, पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या बहुतेक सर्वच सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळेनासे झाले असून, हीच स्थिती परतीच्या आरक्षणाची आहे. कारण, बहुतेकांनी दीड ते दोन महिने आधीच आरक्षण करून ठेवले आहे. त्यामुळे ज्यांनी ऐनवेळी गृहनगरात येण्याचा निर्णय घेतला, त्यांना मात्र, रेल्वेच्या आरक्षणासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

ट्रॅव्हल्सचे तिकीट दर वाढणार

सणासुदीच्या काळात खासगी प्रवासी बसगाड्यांचे भाडेदर वाढवले जाते. ऐनवेळी प्रवास करणाऱ्या गरजू प्रवाशांना कुठलाही पर्याय नसतो, अशा स्थितीत महागडे तिकीट खरेदी करून खासगी बसमधून त्यांना प्रवास करावा लागतो. गणेशोत्सव, महालक्ष्मीपूजन आणि इतर सणांच्या वेळी नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने पुणे, मुंबई येथे स्थलांतरीत झालेले लोकांना आपल्या गावी येण्याचे वेध लागतात. त्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी रेल्वे प्रशासनाने व्यवस्था करावी, अशी मागणी समोर आली आहे.

Web Title: Mumbai and pune railway reservations are full in amravati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2025 | 12:13 PM

Topics:  

  • Amravati News
  • Indian Railway
  • Special Train

संबंधित बातम्या

रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेने वाचला प्रवाशाचा जीव; सुरक्षितपणे बाहेर काढलं अन्…
1

रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेने वाचला प्रवाशाचा जीव; सुरक्षितपणे बाहेर काढलं अन्…

शालेय पोषण आहाराची आता तपासणी होणार; शिक्षण विभागाची धडक मोहीम
2

शालेय पोषण आहाराची आता तपासणी होणार; शिक्षण विभागाची धडक मोहीम

Ganpati Special Train: ‘गण्या धाव रे मला पाव रे’… गणेशोत्सवासाठी रेल्वे तयार, 380 विशेष ट्रेन्स धावणार
3

Ganpati Special Train: ‘गण्या धाव रे मला पाव रे’… गणेशोत्सवासाठी रेल्वे तयार, 380 विशेष ट्रेन्स धावणार

भारतीय रेल्वेचा नवीन नियम, सामान मर्यादेपेक्षा जास्त असेल तर आकारला जाईल मोठा दंड! जाणून घ्या
4

भारतीय रेल्वेचा नवीन नियम, सामान मर्यादेपेक्षा जास्त असेल तर आकारला जाईल मोठा दंड! जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.