Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई गोवा महामार्ग पुन्हा दोन दिवस चार तास बंद राहणार

कोलाड येथील पुई म्हैसदरा पुलाच्या गर्डर बसविण्याकरिता महामार्ग बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस अधीक्षक अरविंद साळवी यांनी ही माहिती दिली आहे. पर्यायी रस्त्याने या वेळेत प्रवास करण्याच्या महामार्ग विभागाने सूचना दिल्या आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 18, 2024 | 10:56 AM
मुंबई गोवा महामार्ग पुन्हा दोन दिवस चार तास बंद राहणार
Follow Us
Follow Us:

मुंबई गोवा महामार्ग आगामी दोन दिवस बंद राहणार आहे. हा महामार्ग दोन दिवसातून चार तास बंद असणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे. मुंबई गोवा महामार्गावर कोलाड हद्दीतील पुई म्हैसदरा पुलाचं सुरु असलेले काम मागील काही दिवसांपासून सुरु आहे. या पुलावरील लोखंडी गर्डर बसविण्याकरिता गुरुवारी १८ जुलै आणि उद्या म्हणजेच शुक्रवारी १९ जुलै रोजी दुपारी १२ ते ४ या दरम्यान मुंबई गोवा महामार्ग बंद असणार आहे अशी माहिती मुख्यालयातील पोलीस अधीक्षक अरविंद साळवी यांनी नुकतीच दिली आहे.

जर प्रवाशांना प्रवास करायचा असेल तर माणगावच्या दिशेने येणाऱ्या वाहनधारकांनी कोलाड रोहा भिसेखिंड मार्गे पेण प्रवास करावा लागणार आहे. पेण नागोठण्याच्या दिशेकडून येणाऱ्यांनी माणगावकडे जायचं असल्यास वाकण-पाली विळेभागाड वरून माणगाव असा प्रवास करावा, अशी माहिती संबंधित परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य आणि कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर ठेकेदार यांनी दिली आहे.

पर्यायी वाहतुकीसाठी या वेळेत कोकणाकडून मुंबईकडे यायचं असल्यास माणगाव निजामपूर पाली खोपोली असा प्रवास करावा लागणार आहे. तर मुंबईकडून गोवाकडे यायचं झाल्यास वाकन पाली निजामपूर माणगाव असा प्रवास करावा लागणार आहे. मुंबई गोवा महामार्ग काही तासांसाठी बंद असणार आहे त्यामुळे नियोजन करुन घराबाहेर पडावं असं आवाहन प्रवाशांना करण्यात आलं आहे.

पुई म्हैसदरा पुलाचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. हे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडलं गेलं होतं. मात्र आता या कामाने वेग घेतला आहे. या पुलावरील लोखंडी गर्डर बसविण्याकरिता महामार्ग गुरुवारी आणि शुक्रवारी दुपारी बारा ते चार या वेळेत एकूण चार तास बंद राहणार आहे.

Web Title: Mumbai goa highway will be closed again for two days and four hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2024 | 10:46 AM

Topics:  

  • Mumbai
  • Mumbai-Goa highway

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत
3

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
4

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.