Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घाटकोपर दुर्घटनेतून महापालिका काय शिकली? पश्चिम द्रुतगती महामार्गावर ‘डिजिटल’ होर्डिंगमुळे अपघात घडण्याची चालकांना भीती

घाटकोपरमध्ये झालेल्या होर्डिंग दुर्घटनेत निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतरही मुंबई महापालिका आणि पोलिस प्रशासनाला अद्याप जाग आली नसल्याचे दिसून आले आहे. पण झुकलेले एक अवाढव्य 'डिजिटल एलईडी होर्डिंग' वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनले आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 22, 2026 | 08:45 AM
घाटकोपर दुर्घटनेतून महापालिका काय शिकली? पश्चिम द्रुतगती महामार्गावर 'डिजिटल' होर्डिंगमुळे अपघात घडण्याची चालकांना भीती

घाटकोपर दुर्घटनेतून महापालिका काय शिकली? पश्चिम द्रुतगती महामार्गावर 'डिजिटल' होर्डिंगमुळे अपघात घडण्याची चालकांना भीती

Follow Us
Follow Us:

घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेत निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतरही मुंबई महापालिका आणि पोलिस प्रशासनाला अद्याप जाग आलेली नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर खार ते विलेपार्लेदरम्यान मुख्य रस्त्यावर अत्यंत धोकादायक पद्धतीने झुकलेले एक अवाढव्य ‘डिजिटल. एलईडी होर्डिंग’ वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनले आहे. हे बेकायदा आणि धोकादायक होर्डिंग तातडीने हटवण्यात यावे, या मागणीसाठी ‘वॉचडॉग फाउंडेशन’ने पालिका आयुक्त आणि वाहतूक पोलिसांना पत्र लिहून इशारा दिला आहे. या डिजिटल होर्डिंगच्या अतिप्रकाशामुळे (ब्राइटनेस) आणि त्यावर सतत बदलणाऱ्या चकचकीत जाहिरातींमुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांचे डोळे दिपून त्यांचे लक्ष विचलित होत आहे.(फोटो सौजन्य – AI)

Mumbai Rain: अखेर मुंबईकरांना दिलासा! ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह मुंईबत पावसाचे आगमन

अधिकृत कागदपत्रे सार्वजनिक करा

पारदर्शकतेसाठी या होर्डिंगशी संबंधित सर्व परवानग्यांची अधिकृत कागदपत्रे सार्वजनिक करण्याची मागणीही संस्थेने केली आहे. लाखो प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पालिका, पोलिस आणि स्ट्रक्चरल तज्ज्ञांनी या जागेची तात्काळ संयुक्त पाहणी करावी आणि तपासणीत नियमभंग आढळल्यास संबंधित जाहिरात एजन्सीवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून, वीज पुरवठा खंडित करावा आणि हे होर्डिंग जमीनदोस्त करावे, अशी मागणी वॉचडॉग फाउंडेशनने केली आहे.

कारवाईची अपेक्षा

अवाढव्य लोखंडी संरचनेचा (स्ट्रक्चर) काही भाग थेट गतिमान महामार्गाच्या दिशेने पुढे झुकलेला असल्याने येथे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, असे ‘वॉचडॉग फाउंडेशन’चे विश्वस्त निकोलस अल्मेडा आणि अॅड. गॉडफ्रे पिमेटा यांनी सांगितले. घाटकोपरच्या भीषण दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी फाउंडेशनने प्रशासनाला थेट सवाल केले असून, या होर्डिंगला पालिका आणि वाहतूक पोलिसांची रीतसर मंजुरी आहे का, आगामी पावसाळा व वादळी वाऱ्याचा विचार करता या संरचनेचे ‘स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट’ घेतले आहे का, असा सवाल केला.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mumbai hoarding safety concerns rise after ghatkopar accident what lessons did the municipal corporation learn from the ghatkopar tragedy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • Monsoon Alert
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
1

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय
2

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत
3

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत

Mumbai News: प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी वास्तुविशारदांवर का? आक्षेप ‘वास्तुकला परिषदे’चा मुंबई पालिकेच्या निर्णयाला आक्षेप
4

Mumbai News: प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी वास्तुविशारदांवर का? आक्षेप ‘वास्तुकला परिषदे’चा मुंबई पालिकेच्या निर्णयाला आक्षेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.