प्रवाशांचे होणार हाल! घरातून बाहेर पडण्यापूर्वी लोकलचं वेळापत्रक चेक करा, इतक्या गाड्या आहे रद्द
मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. उद्या 6 ऑक्टोबर, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रेल्वे प्रशासनाने मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तिन्ही मार्गावर मेगाल्बॉक घेण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर तब्बल 10 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचं रेल्वे प्रशासनाने जाहीर केलं आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. तसेच उद्या प्रवाशांनी रेल्वेचं वेळापत्रक पाहून घराबाहेर पडावं, असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
हेदेखील वाचा- मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा ४० लाख रूग्णांना लाभ, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या प्रमुखांची माहिती
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी हा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. ब्लॉक काळात काही गाड्या करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या उशीराने धावतील. प्रवाशांनी रेल्वेचे वेळापत्रक पाहून त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावं.(फोटो सौजन्य – pinterest)
पश्चिम रेल्वे मार्गावर तब्बल 10 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. गोरेगाव-कांदिवली सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी पाचव्या मार्गिकेवर आज शनिवारी रात्री 11 पासून ते उद्या रविवारी सकाळी 11 पर्यंत हा ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) वरुन पनवेल-बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पनवेल ठाणे दरम्यानच्या ट्रान्सहार्बर मार्गावरील दोन्ही दिशेच्या सेवा या बंद ठेवल्या जाणार आहेत. तर बेलापूर-उरण व नेरूळ-उरण लोकल सेवा ही सुरू राहणार आहे.
ब्लॉक काळात जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. सहाव्या मार्गिकेच्या कामामुळे आज शनिवारी रात्री 10.44 ची विरार-अंधेरी लोकल बोरिवलीपर्यंत चालवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. रात्री 11.55 ची अंधेरी-भाईंदर लोकल बोरिवलीपर्यंत चालवण्यात येणार आहे. उद्या रविवारी पहाटे 4.42 ची बोरिवली-विरार लोकल 5.10 वाजता रवाना होईल. मध्यरात्री 3.50 ची बोरिवली-चर्चगेट पहाटे 04.05 वाजता रवाना होणार आहे, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.
हेदेखील वाचा- सांस्कृतिक शहरात महिला नाहीत सुरक्षित; 7 महिन्यातील आकडा वाचून बसेल धक्का
मध्य रेल्वे मार्गावर सकाळी 10.40ते दुपारी 3.40 पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. ठाणे-कल्याण स्थानकांदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर हा मेगाब्लॉक असेल. मेगाब्लॉक काळात, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) वरुन सुटणाऱ्या डाऊन जलद रेल्वे गाड्या ठाणे व कल्याण स्थानकादरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. याशिवाय काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मेगाब्लॉक काळात मध्य रेल्वे मार्गावरील लोकल गाड्या 10 ते 15 मिनिटे उशीराने धावणार आहेत.
हार्बर रेल्वे मार्गावर सकाळी 11.5 ते संध्याकाळी 04.05 पर्यंत मेगाल्बॉक घेतला जाणार आहे. पनवेल व वाशी स्थानकांदरम्यान अप व डाऊन स्थानकादरम्यान हा मेगाल्बॉक असेल. प्रवाशांच्या सोयीसाठी ब्लॉक काळात सीएसएमटी-वाशी हार्बर मार्गावर काही विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत. तर ठाणे-वाशी-नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर लोकल सेवा सुरू राहणार आहे.