Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC Mayoral Election: मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक लांबणीवर; महायुतीमधील ‘हॉटेल डिप्लोमसी’

BMC Mayoral Election: भाजप आणि शिवसेने शिंदे गटाच्या नगरसेवकांची विभागीय आयुक्तांकडे अधिकृत गटनोंदणी न झालेली नाही. पक्षादेश लागू करण्यासाठी गटनोंदणी ही आवश्यक प्रक्रिया असते.

  • By anuradha sagar
Updated On: Jan 24, 2026 | 09:52 AM
BMC Mayoral Election: मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक लांबणीवर; महायुतीमधील ‘हॉटेल डिप्लोमसी’
Follow Us
Follow Us:
  • मुंबई महापौर पदाची निवडणूक लांबणीवर
  • मुंबई महानगरपालिकेत भाजपचे 89 आणि शिंदे सेनेला २९ जागा
  • भाजप आणि शिवसेनेतील महापौर पदाच्या नावाबाबतही दोन्ही पक्षांमध्ये एकमत झालेले नाही
 

मुंबई महानगरपालिका महापौर निवडणुकीबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबई महापौर पदाची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेसोबत सत्तेच्या समीकरणावर एकमत न झाल्यामुळे मुंबई महापौर पदाची निवडणूक लाबंणीवर पडण्याची चिन्हे आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत ८९ जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी सत्तास्थापनेसाठी लागणारा ११४ चा जादुई आकडा गाठण्यासाठी त्यांना मित्रपक्षांची मदत आवश्यक आहे. पण एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्तावाटपाचे समीकरण न जुळल्यामुळे महापौर पदाची निवडणूक लांबणीवर पडू शकते.

 

मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक लांबणीवर का पडली?

मुंबई महानगरपालिकेत भाजपचे 89 आणि शिंदे सेनेला २९ जागा मिळाल्या. दोन्ही पक्षंकडे ११८ इतके बहुमताचे संख्याबळ आहे. याशिवाय महापौर पदाच्या आरक्षण सोडतीत मुंबईचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. येत्या ३१ जानेवारीला दुपारी १२ वाजता महापौरपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी त्यासंदर्भात सुचनाही दिल्या होत्या. पण भाजप आणि शिंदे सेनेच्या नगरसेवकांची गट नोंदणी झालेली नाही. तसेच, भाजप आणि शिवसेनेतील महापौर पदाच्या नावाबाबतही दोन्ही पक्षांमध्ये एकमत झालेले नाहीत. त्यातच भर म्हणजे भाजप आणि शिंदे गटात स्थायी समिती आणि इतर पदांच्याही वाटाघाटी संपलेल्या नाहीत. शुक्रवारी रात्री दोन्ही पक्षांमधील वरिष्ठ नेत्यांमध्ये पदाबांबत बैठक झाली. पण कोणताही निष्कर्ष न निघाल्यामुळे महापौरपदाची निवडणूक 31 जानेवारीला न घेण्याचा निर्णय झाल्याचे समजते.

दरम्यान, भाजप आणि शिवसेने शिंदे गटाच्या नगरसेवकांची विभागीय आयुक्तांकडे अधिकृत गटनोंदणी न झालेली नाही. पक्षादेश लागू करण्यासाठी गटनोंदणी ही आवश्यक प्रक्रिया असते. त्यातच नगरसेवकांच्या फोडाफोडीची शक्यता असल्याने दोन्ही पक्षांकूडन खबरदारी घेतली जात आहे. मुंबई महापौरपदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गातील आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाकडून या प्रवर्गातील महिला उमेदवाराचा शोध सुरू आहे.

मुंबईचा महापौर पदाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत तोडगा निघण्याची शक्यता

मुंबई महानगरपालिकेत भाजप (८९ जागा) सर्वात मोठा पक्ष असला, तरी सत्तास्थापनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची (२९ जागा) साथ अनिवार्य आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने महापौरपदावर दावा केला असून, यासाठी आमदारांची आणि नगरसेवकांची ‘हॉटेल डिप्लोमसी’ सुरू असल्याची चर्चा आहे. शिंदे गट अडीच-अडीच वर्षांच्या महापौरपदाच्या सूत्रासाठी (Formula) आग्रही असल्याचे समजते.

फेब्रुवारीमध्ये होणार महापौरांची निवड?

आरक्षण सोडतीनंतर यापूर्वी ३१ जानेवारी ही मतदानासाठी संभाव्य तारीख मानली जात होती. मात्र, प्रशासकीय अडचणी आणि राजकीय पेच पाहता आता ही प्रक्रिया फेब्रुवारी २०२६ पर्यंत लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. तोपर्यंत सध्याच्या राजकीय हालचालींवरून मुंबईवर नेमके कोणाचे ‘राज’ असेल, हे स्पष्ट होईल.

Web Title: Mumbai mayoral election postponed hotel diplomacy among the grand alliance partners

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 09:52 AM

Topics:  

  • BMC elections 2026
  • Maharashtra Politics
  • Municipal Election 2026

संबंधित बातम्या

Congress Review Committee : विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये हालचाली वाढल्या! बाळासाहेब थोरातांसह चौघांची समिती नियुक्त
1

Congress Review Committee : विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये हालचाली वाढल्या! बाळासाहेब थोरातांसह चौघांची समिती नियुक्त

Maharashtra Politics: ‘तुझा बाप सरड्यासारखे रंग बदलतो’, थोरवेंच्या आक्रमक वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
2

Maharashtra Politics: ‘तुझा बाप सरड्यासारखे रंग बदलतो’, थोरवेंच्या आक्रमक वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

लोकशाही बचाव, अराजकता हटाव’चा नारा देत अशोक चव्हाणांचा विरोधकांवर हल्लाबोल
3

लोकशाही बचाव, अराजकता हटाव’चा नारा देत अशोक चव्हाणांचा विरोधकांवर हल्लाबोल

Satara Politics:पदवीधरांच्या प्रश्नांसाठी विधान परिषदेत आक्रमक भूमिका घेणार : हर्षदा देशमुख
4

Satara Politics:पदवीधरांच्या प्रश्नांसाठी विधान परिषदेत आक्रमक भूमिका घेणार : हर्षदा देशमुख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.