Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Congress Review Committee : विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये हालचाली वाढल्या! बाळासाहेब थोरातांसह चौघांची समिती नियुक्त

Congress Review Committee : नागपूर, पुणे पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकांच्या निकालांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसने चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. तीन आठवड्यांत समिती आपला अहवाल सादर करणार आहे.

  • By विवेक
Updated On: Nov 03, 2026 | 08:27 PM
Congress

Congress

Follow Us
Follow Us:
  • विधान परिषद निवडणुकांच्या निकालानंतर काँग्रेसची समिती
  • बाळासाहेब थोरातांसह चार नेत्यांवर जबाबदारी
  • तीन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश
 

मुंबई : राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. पाच जागांवर झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसला फक्त नागपूर पदवीधर मतदारसंघात विजय मिळवता आला. महाविकास आघाडीला या निवडणुकीत चांगलं यश मिळालं असलं तरीही काँग्रेसला वैयक्तिकरित्या साजेसे यश न मिळाल्याचं चित्र आहे.

त्याच अनुषंगाने, महाराष्ट्र काँग्रेसने आता आत्मपरीक्षणाची तयारी सुरू केली आहे. नागपूर पदवीधर, पुणे पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघातील निवडणूक निकालांचा सखोल अभ्यास करण्यासाठी प्रदेश काँग्रेसकडून चार सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे.

या समितीमध्ये ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह चार महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश करण्यात आला असून या समितीला विधानपरिषद निवडणुकीतील चुका आणि पराभवाची कारणं शोधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. (Congress Review Committee)

‘तुझा बाप सरड्यासारखे रंग बदलतो’, थोरवेंच्या आक्रमक वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

काँग्रेसकडून चार सदस्यीय समिती नियुक्त

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेवरून ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीमध्ये काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य बाळासाहेब थोरात, खासदार चंद्रकांत हंडोरे, आरिफ नसीम खान आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणुकीतील चुका आणि पराभवाची कारणं शोधणार

या समितीवर केवळ निकालांचा आढावा घेण्याची जबाबदारी नसून, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. संबंधित मतदारसंघांमध्ये पक्षाची प्रचार रणनीती कशी होती, स्थानिक पातळीवर समन्वय कसा होता आणि विजय अथवा पराभवामागची नेमकी कारणं काय होती, याचा शोध समिती घेणार आहे.

निवडणुकीदरम्यान पक्षाकडून काही त्रुटी राहिल्या होत्या का, प्रचारात अपेक्षित ताकद लावली गेली होती का आणि स्थानिक नेत्यांमध्ये योग्य समन्वय होता का, याचीही तपासणी केली जाणार आहे. याशिवाय मागील निवडणुकांमधील घडामोडींचा सध्याच्या निकालांवर काही परिणाम झाला का, याचाही अभ्यास केला जाणार आहे.

तीन आठवड्यांत अहवाल सादर करणार

समितीला आपला सविस्तर अहवाल तीन आठवड्यांच्या आत महाराष्ट्राचे प्रभारी डॉ. सिरीवेल्ला प्रसाद यांच्याकडे सादर करायचा आहे. या अहवालाची प्रत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनाही दिली जाणार आहे.

या अहवालातून निवडणुकीतील त्रुटी, संघटनात्मक कमतरता आणि भविष्यात करावयाच्या बदलांबाबत शिफारसी केल्या जाणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस या अहवालातून कोणते धडे घेते आणि आपल्या रणनीतीत काय बदल करते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून भाजप नेत्यांना हायकोर्टाचा दणका! मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

💡

Frequently Asked Questions

  • Que: विधान परिषद निवडणुकांच्या आढाव्यासाठी काँग्रेसने किती सदस्यांची समिती स्थापन केली?

    Ans: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने चार सदस्यीय समिती नियुक्त केली आहे.

  • Que: काँग्रेसच्या आढावा समितीत कोणत्या नेत्यांचा समावेश आहे?

    Ans: बाळासाहेब थोरात, खासदार चंद्रकांत हंडोरे, आरिफ नसीम खान आणि बी. एम. संदीप यांचा समावेश आहे.

  • Que: काँग्रेसची समिती किती दिवसांत अहवाल सादर करणार आहे?

    Ans: समिती तीन आठवड्यांच्या आत आपला सविस्तर अहवाल डॉ. सिरीवेल्ला प्रसाद यांच्याकडे सादर करणार आहे. त्याची प्रत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनाही दिली जाणार आहे.

Web Title: Congress review committee vidhan parishad election vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 08:27 PM

Topics:  

  • Balasaheb Thorat
  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • Maharashtra Politics
  • MLC Election

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘तुझा बाप सरड्यासारखे रंग बदलतो’, थोरवेंच्या आक्रमक वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
1

Maharashtra Politics: ‘तुझा बाप सरड्यासारखे रंग बदलतो’, थोरवेंच्या आक्रमक वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

‘भाजपाच्या तोंडात संविधान, मनात मनुस्मृती’, Harshvardhan Sapkal यांचा फडणवीसांवर घणाघात! PM मोदी, अमित शाहांनासुद्धा घेरलं
2

‘भाजपाच्या तोंडात संविधान, मनात मनुस्मृती’, Harshvardhan Sapkal यांचा फडणवीसांवर घणाघात! PM मोदी, अमित शाहांनासुद्धा घेरलं

Amit Shah : खऱ्या संसदेत राहुल गांधींचा नंबर कधीच लागणार नाही; अमित शाहांचा घणाघात
3

Amit Shah : खऱ्या संसदेत राहुल गांधींचा नंबर कधीच लागणार नाही; अमित शाहांचा घणाघात

Rahul Gandhi : ‘भाजपने दुकाने सक्तीने बंद पाडली,’ राहुल गांधींचा गंभीर आरोप, दिल्लीत नेमकं काय घडलं?
4

Rahul Gandhi : ‘भाजपने दुकाने सक्तीने बंद पाडली,’ राहुल गांधींचा गंभीर आरोप, दिल्लीत नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.