Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई महानगरपालिका प्रभाग संख्या वाद: सत्तांतरण झाले तरीही निर्णय तेच राहतात, प्रभागसंख्या पूर्ववत करण्याच्या निर्णयाबाबत शिवसेनेचा उच्च न्यायालयात दावा

गेल्या वर्षी तत्कालीन मविआ सरकारने बृहन्मुंबई महापालिकेची प्रभागाची पुनर्रचना करून प्रभाग संख्या २२७ वरुन २३६ पर्यंत वाढवली. शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडून भाजपाशी हात मिळवणी करून नवे सरकार स्थापन केले. त्यानंतर मविआ सरकारचा निर्णय बदलून प्रभाग संख्या पूर्ववत २२७ केली. या निर्णयामुळे बृहन्मुंबई महापालिकेची आधीच रखडलेली निवडणूक आणखी लांबणीवर पडणार आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Jan 16, 2023 | 09:27 PM
मुंबई महानगरपालिका प्रभाग संख्या वाद: सत्तांतरण झाले तरीही निर्णय तेच राहतात, प्रभागसंख्या पूर्ववत करण्याच्या निर्णयाबाबत शिवसेनेचा उच्च न्यायालयात दावा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – बृहन्मुंबई महापालिकेची प्रभाग संख्या वाढवण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय रद्द करून पूर्ववत करण्याचा निर्णय विद्यमान राज्य सरकारने घेतला. त्यावर बोट ठेऊन सत्तांतरण झाले तरीही आधीच्या सरकारने घेतलेला निर्णय बदलत नाहीत, निर्णय तेच राहतात, असा दावा ठाकरे गटाकडून सोमवारी उच्च न्यायालयात करण्यात आला. तसेच सरकार बदलल्यानंतर तयार करणारे कायदे हे कायदा केल्याशिवाय बदलले जाऊ शकत नाहीत. कायद्यात अडचण असल्यास निर्णय बदलू शकता. परंतु आधीच्या सरकारचा निर्णय नाकारण्यासाठी कायदा बदलला जाऊ शकत नाही, असेही युक्तिवाद करताना सांगितले.

गेल्या वर्षी तत्कालीन मविआ सरकारने बृहन्मुंबई महापालिकेची प्रभागाची पुनर्रचना करून प्रभाग संख्या २२७ वरुन २३६ पर्यंत वाढवली. शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडून भाजपाशी हात मिळवणी करून नवे सरकार स्थापन केले. त्यानंतर मविआ सरकारचा निर्णय बदलून प्रभाग संख्या पूर्ववत २२७ केली. या निर्णयामुळे बृहन्मुंबई महापालिकेची आधीच रखडलेली निवडणूक आणखी लांबणीवर पडणार आहे. तसेच या सर्वाचा सरकारी तिजोरीलाही मोठा फटका बसणार आहे, असा दावा करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांच्यावतीने अ‍ॅड. देवदत्त पालोदकर यांच्यामार्फत याचिका केली आहे. न्या. सुनील शुक्रे आणि न्या. एम. डब्ल्यू. चांदवानी यांच्या खंडपीठासमोर सोमवारपासून याचिकेवर अंतिम सुनावणीला सुरूवात झाली.

विद्यमान शिंदे सरकारचा निर्णय अयोग्य, मनमानी आहे प्रभागसंख्येचा वाद सर्वोच्च न्यायालयात असताना न्यायालयाने आधीच पूर्ण केलेल्या प्रभागांच्या सीमांकनासह पुढील प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. सत्तांतरण झाल्याने कायदा केल्याशिवाय आधी अस्तित्वात असलेले कायदे बदलता येत नाहीत. कायद्यात अडचण असल्यास निर्णय बदलू शकता. परंतु आधीच्या सरकारचा निर्णय नाकारण्यासाठी कायदा बदल करणे अयोग्य असल्याचेही चिनॉय यांनी सांगितले.

प्रभागसंख्या कमी करण्याच्या प्रक्रियेवर पुढील सुनावणीपर्यंत कार्यवाही करणार नाही, अशी राज्य सरकारने याआधी दिलेली हमी पुढील आदेशापर्यंत कायम ठेवण्याचे सरकारतर्फे सोमवारी न्यायालयाला सांगितले.

Web Title: Mumbai municipal corporation ward number controversy even after the transfer of power the decision remains the same shiv senas claim in the high court regarding the decision to undo the ward numb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2023 | 09:27 PM

Topics:  

  • High court
  • Marathi News
  • Mumbai Municipal Corporation
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

यंदा गणेशोत्सवासाठी ३६६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय! श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी मानले रेल्वे मंत्र्यांचे आभार
1

यंदा गणेशोत्सवासाठी ३६६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय! श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी मानले रेल्वे मंत्र्यांचे आभार

आता तरी जागे व्हा! HSRP Number Plate बसवण्याची मुदत पुन्हा वाढली, ‘ही’ असेल अंतिम तारीख
2

आता तरी जागे व्हा! HSRP Number Plate बसवण्याची मुदत पुन्हा वाढली, ‘ही’ असेल अंतिम तारीख

Thane News : “भीक नको न्याय हवा !” राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलनाचा चौथा दिवस
3

Thane News : “भीक नको न्याय हवा !” राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलनाचा चौथा दिवस

Kalyan News :  कृषी उत्पन्न बाजार समिती वादाच्या भोवऱ्यात ; परिसरात अनधिकृत बांधकाम असल्याचा आरोप
4

Kalyan News : कृषी उत्पन्न बाजार समिती वादाच्या भोवऱ्यात ; परिसरात अनधिकृत बांधकाम असल्याचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.