Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: मध्य रेल्वेच्या १५ स्थानकांवर किराणा स्टोअर! चहा, कॉफीच्या विक्रीला बंदी, दैनंदिन गरजेच्या वस्तू स्टोअरवर मिळणार

Mumbai News: मध्य रेल्वेने या स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या वस्तूंची यादी निश्चित केली आहे. त्यानुसार तांदूळ, गहू, डाळी, खाद्यतेल, साखर, मीठ, मसाले आणि सुकामेवा यांसारख्या किराणा वस्तू विकता येतील. याशिवाय बिस्किटे, लोणची, सॉस, पॅकेज्ड पिण्याचे पाणी, फळांचे रस आणि शीतपेयांचाही समावेश आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 20, 2026 | 10:30 AM
Mumbai News: मध्य रेल्वेच्या १५ स्थानकांवर किराणा स्टोअर! चहा, कॉफीच्या विक्रीला बंदी, दैनंदिन गरजेच्या वस्तू स्टोअरवर मिळणार

Mumbai News: मध्य रेल्वेच्या १५ स्थानकांवर किराणा स्टोअर! चहा, कॉफीच्या विक्रीला बंदी, दैनंदिन गरजेच्या वस्तू स्टोअरवर मिळणार

Follow Us
Follow Us:

Mumbai News: लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता स्थानकांवरच किराणा सामानासह दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करता येणार आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील ११ स्थानकांवर सध्या किराणा स्टोअर सुरू असून, आणखी चार स्थानकांवर लवकरच ही सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मुंबई विभागातील एकूण १५ स्थानकांवर किराणा स्टोअर सुरू होतील. कुर्ला स्थानकावर सर्वाधिक चार स्टोअर असून, या सुविधेच्या विस्तारामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान आवश्यक वस्तू खरेदी करणे अधिक सोयीचे होणार आहे. सध्या कुर्ला स्थानकावर चार, कल्याण येथे दोन, तर दादर, भायखळा, कांजूरमार्ग, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि वाशिंद येथे प्रत्येकी एक किराणा स्टोअर सुरू आहे. लवकरच विद्याविहार, कसारा, बदलापूर आणि दिवा या स्थानकांवर प्रत्येकी एक स्टोअर सुरू करण्यात येणार आहे.(फोटो सौजन्य – AI)

Navaratri 2026: मुंबईतील झोपडपट्टीवासीयांसाठी गुड न्यूज? मंत्री पीयूष गोयल नेमके काय म्हणाले?

मुंबई विभागातील रेल्वे स्थानकांवर उभारली जाणार किराणा स्टोअर

मध्य रेल्वेने या स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या वस्तूंची यादी निश्चित केली आहे. त्यानुसार तांदूळ, गहू, डाळी, खाद्यतेल, साखर, मीठ, मसाले आणि सुकामेवा यांसारख्या किराणा वस्तू विकता येतील. याशिवाय बिस्किटे, चिप्स, पॉपकॉर्न, इन्स्टंट नूडल्स, जॅम, लोणची, सॉस, पॅकेज्ड पिण्याचे पाणी, फळांचे रस आणि शीतपेयांचाही समावेश आहे. दुग्धजन्य पदार्थ, बेकरी उत्पादने, पराठे, कटलेट, नगेट्स यांसारखे शिजवण्यापूर्वी तयार ठेवलेले पदार्थ आणि आइस्क्रीमही विकता येणार आहे. साबण, शाम्पू, टूथपेस्ट, कपडे धुण्याचे डिटर्जेंट, टिश्यू पेपर, सॅनिटरी नॅपकिन्स, बाळांचे डायपर, बेबी फूड, स्टेशनरी आणि इतर दैनंदिन उपयोगाच्या वस्तूही प्रवाशांना उपलब्ध होतील.

नियम बंधनकारक

विशेष स्वच्छता मोहीम ६.० अंतर्गत मध्य रेल्वेने किराणा स्टोअरमध्ये विक्रीयोग्य आणि प्रतिबंधित वस्तूंची यादी निश्चित केली आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) नियमांचे पालन करणे, स्टोअरच्या आतील आणि सभोवतालच्या परिसरात स्वच्छता राखणे तसेच स्टोअरपासून सुमारे एक मीटरच्या परिसरात कचरापेट्या ठेवणे बंधनकारक असेल. या किराणा स्टोअरमध्ये शिजवलेले खाद्यपदार्थ, चहा आणि कॉफी विकण्यास परवानगी नाही. वस्तूंच्या विक्रीत एकसमानता राखणे, अनधिकृत विक्रीला आळा घालणे आणि प्रवाशांना वाजवी दरात दैनंदिन गरजेच्या वस्तू उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

Maharashtra Rain Alert: अखेर पावसाची एन्ट्री! कोकणात मुसळधार तर पुढील काही दिवस…; अंदाज काय?

मध्य रेल्वेची किराणा स्टोअर

सध्या सुरू : ११ स्टोअर
कुर्ला स्थानक : ४
कल्याण स्थानक : २
दादर स्थानक : १
भायखळा स्थानक : १
कांजूरमार्ग स्थानक : १
लोकमान्य टिळक टर्मिनस : १
वाशिंद स्थानक : १
लवकरच सुरू होणार : ४
विद्याविहार स्थानक : १
कसारा स्थानक: १
बदलापूर स्थानक : १
दिवा स्थानक : १

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mumbai news grocery stores to open at 15 central railway stations sale of tea and coffee prohibited stores will offer daily essential items sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • centrail railway
  • Indian Railway
  • Mumbai News

संबंधित बातम्या

गिरणी कामगारांसाठी मोठी बातमी! १५ लाखांत मिळणार तयार घरं; सरकारचा नवा निर्णय, कुठे मिळणार फ्लॅट?
1

गिरणी कामगारांसाठी मोठी बातमी! १५ लाखांत मिळणार तयार घरं; सरकारचा नवा निर्णय, कुठे मिळणार फ्लॅट?

Navaratri 2026: मुंबईतील झोपडपट्टीवासीयांसाठी गुड न्यूज? मंत्री पीयूष गोयल नेमके काय म्हणाले?
2

Navaratri 2026: मुंबईतील झोपडपट्टीवासीयांसाठी गुड न्यूज? मंत्री पीयूष गोयल नेमके काय म्हणाले?

Tiger Shroff Firing : मुंबई हादरली! जुहूमध्ये बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार
3

Tiger Shroff Firing : मुंबई हादरली! जुहूमध्ये बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार

दुसऱ्या लग्नाचा राग अन् टोकाचा डाव! जावयाच्या दुसऱ्या पत्नीची हत्या करून मृतदेह खाडीत फेकला
4

दुसऱ्या लग्नाचा राग अन् टोकाचा डाव! जावयाच्या दुसऱ्या पत्नीची हत्या करून मृतदेह खाडीत फेकला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.