Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: गणपती उत्सवासाठी मुंबई पोलिस दल झाले सज्ज! २५ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तासाठी राहणार तैनात

Mumbai News: मुंबईसह संपूर्ण राज्यभरात गणपती उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस दल सज्ज झाले आहेत. मनपा, वाहतूक पोलिस, सुरक्षा रक्षक दल, केंद्रीय राखीव सुरक्षा दल यांच्याशी समन्वय साधत दहा दिवसांच्या बंदोबस्तात २५ हजारपेक्षा जास्त पोलिस उपस्थित असणार आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 12, 2026 | 11:19 AM
गणपती उत्सवासाठी मुंबई पोलिस दल झाले सज्ज! २५ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तासाठी राहणार तैनात

गणपती उत्सवासाठी मुंबई पोलिस दल झाले सज्ज! २५ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तासाठी राहणार तैनात

Follow Us
Follow Us:

Mumbai News: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस दल सज्ज झाले असून गेले दोन-तीन दिवस उच्च अधिकाऱ्यांपासून कर्मचारी तयारीला लागले आहे. कुठेही काही उणीव राहू नये याची काळजी घेतली जात आहे. मनपा, वाहतूक पोलिस, सुरक्षा रक्षक दल, केंद्रीय राखीव सुरक्षा दल यांच्याशी समन्वय साधण्यात येत आहे. तसेच परिमंडळ पातळीवर त्या त्या परिसरातील सार्वजनिक मंडळांशी समन्वय साधला जात आहे. दरम्यान, दहा दिवसांच्या बंदोबस्तात २५ हजारपेक्षा जास्त पोलिस उपस्थित असणार आहेत. विसर्जनाच्या दिवशी सुमारे ३० ते ३२ हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तात तैनात असणार आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सणांपैकी गणपती उत्सव एक असून मुंबईत सार्वजनिक गणपती दर्शन आणि आरास पाहण्यासाठी भक्तीचा सागर उसळत असतो. यावेळी खरी कसोटी मुंबई पोलिसांची लागते.(फोटो सौजन्य – AI)

टिटवाळा ब्लॉकचा आज अखेरचा टप्पा; कसारा मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द

कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखताना धार्मिक तेढ होऊ न देणे, दंगल रोखणे अशा घटनांसोबतच दहशतवादी आणि देश विघातक घटकांवर करडी नजर ठेवण्याचे काम पोलिसांना करावे लागते. मुंबईत कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांचे सर्व विभाग खासकरून कायदा सुव्यवस्था प्रशासन, दहशतवादविरोधी पथक, गुन्हे अन्वेषण विभाग या सर्वांना अलर्ट राहावे लागते. यात थेट नागरिकांशी संबंध असणाऱ्या वाहतूक पोलिसांना वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जीवाचे रान करावे लागते. गणपती उत्सव सुरू झाल्यापासून ते विसर्जन होईपर्यंत २४ तास ऑन ड्युटी राहावे लागते.

विसर्जनाच्या दिवशी कडेकोट बंदोबस्त

सुरक्षा लक्षात घेता दोनच दिवसांपूर्वी ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर अशा उपकरणांवर १३ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबरदरम्यान पूर्णतः बंदी घातली आहे. दहा दिवसांच्या बंदोबस्तात २५ हजारपेक्षा जास्त पोलिस उपस्थित असणार आहेत.विसर्जनाच्या दिवशी सुमारे ३० ते ३२ हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी, सोबत तटरक्षक दल, १६ प्लाटून राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तसेच पाच केंद्रीय राखीव तुकड्या सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत.शिवाय दंगलरोधी दल वाहन, महिला पोलिस विशेष पथक तैनात असणार आहे. ही प्राथमिक माहिती असून गरजेनुसार यात बदल केला जाऊ शकतो, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात फुलांना मोठी मागणी; पाऊस पडल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता

शहरात जागोजागी सीसीटीव्हीचे जाळे:

शहरात यंदा साडेसहा हजाराच्या आसपास छोटी-मोठी सार्वजनिक गणेश मंडळे, तर पावणेदोन लाख घरगुती गणपती असणार आहेत. भुलेश्वर आणि शीतल तलाव कुर्ला या ठिकाणी उंच मूर्ती आगमन मिरवणुकीत अपघात घडले होते. याला कारण खराब रस्ते असल्याचे संगितले जात आहे. सुदैवाने सर्वांनी शांतता राखत प्रसंगाला सामोरे गेले, मात्र अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून उंच मूर्तीशी संबंधित मंडळे आणि मनपाशी समन्वय साधण्यात आला आहे. शहरात जागोजागी सीसीटीव्हीचे जाळे असले तरी संशयास्पद ठिकाणी संवेदनशील ठिकाणी अत्याधुनिक एआय टेक्नॉलॉजीचे कॅमेरे बसवण्यात आले आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mumbai news mumbai police force geared up for the ganpati festival over 25 000 officers and personnel will be deployed for security arrangements

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 11:19 AM

Topics:  

  • Ganeshotsav 2026
  • Mumbai News
  • Mumbai Police

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi 2026: गणपती स्थापनेत कलश का असतो महत्त्वाचा? कलशात ठेवतात या वस्तू
1

Ganesh Chaturthi 2026: गणपती स्थापनेत कलश का असतो महत्त्वाचा? कलशात ठेवतात या वस्तू

लालबागच्या राजाच्या प्रसादाने उजळणार BMC हॉस्पिटल्स; काय आहे नेमकी योजना? जाणून घ्या संकल्पना
2

लालबागच्या राजाच्या प्रसादाने उजळणार BMC हॉस्पिटल्स; काय आहे नेमकी योजना? जाणून घ्या संकल्पना

Ganeshotsav 2026: ७५७ गावांत रंगणार ‘एक गाव, एक गणपती’; सामाजिक एकोप्यासाठी जिल्हा पोलिसांचा विशेष उपक्रम
3

Ganeshotsav 2026: ७५७ गावांत रंगणार ‘एक गाव, एक गणपती’; सामाजिक एकोप्यासाठी जिल्हा पोलिसांचा विशेष उपक्रम

शिवडीच्या राजाच्या अमृतमहोत्सवी वर्षात अनोखा देखावा; मुंबईत साकारली ‘पाण्याखालची द्वारका’
4

शिवडीच्या राजाच्या अमृतमहोत्सवी वर्षात अनोखा देखावा; मुंबईत साकारली ‘पाण्याखालची द्वारका’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.