Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लालबागच्या राजाच्या प्रसादाने उजळणार BMC हॉस्पिटल्स; काय आहे नेमकी योजना? जाणून घ्या संकल्पना

लालबागच्या राजाच्या गणेशोत्सवात निर्माण होणाऱ्या सेंद्रिय कचऱ्याचा आता चांगल्या कामासाठी उपयोग केला जाणार आहे. BMC आणि मंडळाच्या ‘प्रसाद टू पॉवर’ उपक्रमातून कचऱ्यापासून ऊर्जा तयार करून तिचा वापर रुग्णालयांसाठी केला जाणार आ

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 12, 2026 | 11:41 AM
लालबागच्या राजाच्या प्रसादाने उजळणार BMC हॉस्पिटल्स; काय आहे नेमकी योजना? जाणून घ्या संकल्पना

लालबागच्या राजाच्या प्रसादाने उजळणार BMC हॉस्पिटल्स; काय आहे नेमकी योजना? जाणून घ्या संकल्पना

Follow Us
Follow Us:
  • गणेशोत्सवात दररोज निर्माण होणाऱ्या ८ ते १० टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार.
  • ११ दिवसांत ८० मेट्रिक टन कचऱ्यापासून सुमारे ७,७४४ युनिट्स ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य.
  • तयार झालेल्या ऊर्जेचा वापर रुग्ण कक्ष, कॉरिडॉर आणि सार्वजनिक जागांवरील दिव्यांसाठी केला जाणार.
सणासुदीत कचऱ्याचे व्यावस्थापन योग्य प्रकारे करण्यासाठी आणि याचा वापर चांगल्या कामात करण्याच्या उद्देशाने बीएमसी आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने हातमिळवणी केली आहे. नव्या संकल्पनेद्वारे अन्न आणि सेंद्रिय पदार्थांवर प्रक्रिया करुन त्यापासून उर्जा तयार केली जाणार असून या उर्जेचा वापर रुग्णालयात वीजपुरवठा करण्यासाठी केला जाणार आहे. या प्रकल्पाला ‘प्रसाद टू पॉवर’ (Prasad to Power) असे नाव देण्यात आले आहे. चला या नव्या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Mumbai News: गणपती उत्सवासाठी मुंबई पोलिस दल झाले सज्ज! २५ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तासाठी राहणार तैनात

१० टन कचऱ्यावर केली जाणार प्रक्रिया

गणेशोत्सवाच्या उत्सवादरम्यान मंदिर आवारातून दररोज सुमारे ८ ते १० टन कचरा निर्माण होण्याची शक्यता आहे. हा ओला कचरा पारंपारिक विल्हेवाटीसाठी पाठवण्याऐवजी विशेष वाहनांमार्फत त्याला गोळा केले जाऊन मग बीएमसीच्या नायर रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय, जीटीबी रुग्णालय व सायन रुग्णालय येथील बायोमिथेनेशन प्रकल्पांमध्ये त्याला नेले जाणार आहे.

माहितीनुसार, या प्रकल्पाची प्रोसेस कॅपेसिटी २ मेट्रिक टन इतकी आहे. याअंतर्गत ११ दिवसांत ८० मेट्रिक टन सेंद्रिक कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार असून अंदाजे ७,७४४ युनिट्स उर्जा यातून तायर करण्याचे लक्ष्य आहे. तथापि, या प्रकल्पाला किती यश येणार हे आपल्याला येत्या काळात स्पष्ट होईल. कचऱ्यापासून तयार करण्यात आलेल्या या उर्जेचा वापर रुग्ण कक्ष, कॉरिडॉर आणि सार्वजनिक जागांवर दिवे लावण्यासाठी केला जाईल. या प्रकल्पाचे संचालन आणि देखभाल बीएमसीने नियुक्त केलेली एजन्सी, मे. एरोकेअर एव्हिएशन प्रा. लि. यांच्यामार्फत केला जाणार आहे.

शिवडीच्या राजाच्या अमृतमहोत्सवी वर्षात अनोखा देखावा; मुंबईत साकारली ‘पाण्याखालची द्वारका’

प्रसाद टू पाॅवर

मोठ्या सार्वजनिक गणेश उत्सवादरम्यान निर्माण होणाऱ्या सेंद्रिय कचऱ्याचा वापर चांगल्या आणि उपयुक्त कामासाठी कसा केला जाऊ शकते ते आपल्याला या प्रकल्पातून पाहता येते. ‘प्रसाद टू पॉवर’ द्वारे गणेश मंडपात तयार होणाऱ्या कचऱ्याचा उपयोग रुग्णालयातील संसाधने वापरण्यात केला जाणार आहे. श्रद्धेचा प्रसाद आणि पर्यावरण संवर्धनाची सांगड घालणारा हा उपक्रम भविष्यात कचरा व्यवस्थापनासाठी एक चांगला आदर्श ठरू शकतो.

 

Web Title: Lalbaugcha raja prasad to power bmc hospitals organic waste energy project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • electricity
  • lalbagcha raja
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News: गणपती उत्सवासाठी मुंबई पोलिस दल झाले सज्ज! २५ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तासाठी राहणार तैनात
1

Mumbai News: गणपती उत्सवासाठी मुंबई पोलिस दल झाले सज्ज! २५ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तासाठी राहणार तैनात

Mumbai News: रुग्णभाराशी मेळ घालण्याचे आव्हान! राज्यातील रुग्णालयांत ओपीडी तिप्पट; डॉक्टर, मनुष्यबळही तिप्पट झाल्याबाबत सवाल
2

Mumbai News: रुग्णभाराशी मेळ घालण्याचे आव्हान! राज्यातील रुग्णालयांत ओपीडी तिप्पट; डॉक्टर, मनुष्यबळही तिप्पट झाल्याबाबत सवाल

Maharashtra Breaking News Today 2026: वर्षभराच्या लढाईनंतर माधुरी हत्तीण कोल्हापुरात दाखल
3

Maharashtra Breaking News Today 2026: वर्षभराच्या लढाईनंतर माधुरी हत्तीण कोल्हापुरात दाखल

Mumbai News : परीक्षेतील गोंधळाला आळा बसणार? अभाविपच्या परिषदेत प्रश्नपत्रिका, AI आणि निकालावर मोठं मंथन
4

Mumbai News : परीक्षेतील गोंधळाला आळा बसणार? अभाविपच्या परिषदेत प्रश्नपत्रिका, AI आणि निकालावर मोठं मंथन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.