(फोटो सौजन्य: Pinterest)
Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात फुलांना मोठी मागणी; पाऊस पडल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता
लोकल सेवांमध्ये बदल
सीएसएमटीहून रात्री १०, ११.१६ आणि ११.४२ वाजता सुटणाऱ्या टिटवाळा लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. रात्री १२.०८ वाजताची कसारा लोकल आणि रात्री ८.५६ वाजताची आसनगाव लोकलही रद्द राहणार आहे. याशिवाय ठाणे, कुर्ला आणि इतन स्थानकांहून सुटणाऱ्या काही फेन्यांवरही परिणाम होणार आहे, अप मार्गावर टिटवाळ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या पहाटे ४.३२ सकाळी ६.१३ आणि रात्री १०.०६ व्या लोकल रद्द केल्या आहेत.
Health Update: एमआरआयच्या प्रतीक्षेला ऑक्टोबरमध्ये पूर्णविराम! नायर, सायन आणि कूपरमध्ये यंत्रे दाखल
प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष लोकलची व्यवस्था
प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटीहून मध्यरात्री १२.०८ वाजता ठाण्यासाठी विशेष लोकल चालविण्यात येणार आहे. तसेच आसनगावहून सकाळी ८.०२ वाजता परळसाठी विशेष लोकल सोडण्यात येणार आहे. बलिया-दादर एक्स्प्रेस, ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी मेल, गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस आणि साईनगर शिर्डी-दादर एक्स्प्रेससह काही गाड्यांचे वासिद, आटगाव, खड़ीं, कसारा आणि इगतपुरी येथे नियमन करण्यात येणार आहे, विदर्भ एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस, पंजाब मेल आणि दुरंतो एक्स्प्रेससह सहा गाड्या गंतव्यस्थानी ३० ते ४० मिनिटे उशिराने पोहोचण्याची शक्यता आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)






