Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवडीच्या राजाच्या अमृतमहोत्सवी वर्षात अनोखा देखावा; मुंबईत साकारली ‘पाण्याखालची द्वारका’

शिवडीच्या राजाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त यंदा गणेशोत्सवात अनोखा आणि भव्य देखावा साकारण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मुंबईकरांना पौराणिक द्वारकेचा अनुभव घेता येणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 12, 2026 | 10:37 AM
शिवडीच्या राजाच्या अमृतमहोत्सवी वर्षात अनोखा देखावा; मुंबईत साकारली 'पाण्याखालची द्वारका'

शिवडीच्या राजाच्या अमृतमहोत्सवी वर्षात अनोखा देखावा; मुंबईत साकारली 'पाण्याखालची द्वारका'

Follow Us
Follow Us:
  • शिवडीत साकारली तब्बल १३० फूट लांब ‘पाण्याखालची द्वारका’.
  • एलईडी स्क्रीन, होलोग्राम आणि लेझर लाईट्सचा देखाव्यात वापर.
  • ७० ते ८० कारागिरांनी दीड महिन्यापासून घेतली अहोरात्र मेहनत.
दिनेश मराठे : आबालवृद्धाच्या लाडक्या बाप्पाच्या गणरायाच्या घरोघरी आगमनाला आणि प्राणप्रतिष्ठेला आता अवघे दोन दिवस उरले आहेत. मुंबईत सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण पसरले असून, गणेश मंडळे आपल्या देखाव्यांच्या अंतिम तयारीत व्यस्त आहेत. दरम्यान, यंदा शिवडीच्या राजाने आशियातील अनोख्या संकल्पनेतून ‘पाण्याखालची द्वारका’ साकारत गणेशोत्सवाच्या देखाव्याला एक वेगळे, ऐतिहासिक आणि भव्य रूप दिले आहे. शिवडीच्या राजाच्या ७५व्या म्हणजेच अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त साकारण्यात आलेल्या या भव्य देखाव्याचे आणि श्री गणरायाच्या मूर्तीचे आज तुतारी, ढोल, शंखनाद आणि घंटानादाच्या गजरात पारंपरिक पद्धतीने भव्य अनावरण करण्यात आले.

Mumbai News: रुग्णभाराशी मेळ घालण्याचे आव्हान! राज्यातील रुग्णालयांत ओपीडी तिप्पट; डॉक्टर, मनुष्यबळही तिप्पट झाल्याबाबत सवाल

७०-८० कारागीरांनी घेतली अहोरात्र मेहनत

तब्बल १३० फूट लांब, ६५ फूट रुंद आणि ४५ फूट उंच असलेल्या या भव्य देखाव्यात सुमारे १,००० चौरस फूट एलईडी स्क्रीन, अत्याधुनिक होलोग्राम तंत्रज्ञान, लेझार लाईट इफेक्ट्स आणि वातानुकूलित सेट यांचा वापर करण्यात आला आहे. गेल्या दीड महिन्यापासून ७० ते ८० कारागीर अहोरात्र मेहनत घेतली.

पौराणिक द्वारका यंदा शिवडीत अनुभवता येणार

प्रबोधनकार ठाकरे उद्यान, शिवडी बस डेपोसमोर, शिवडी, मुंबई येथे हा भव्य देखावा साकारण्यात आला आहे. गुजरातमधील गोमती नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर वसलेली पौराणिक द्वारका यंदा शिवडीत अनुभवता येणार आहे. प्रसिद्ध कला संचालक अमन विधाते यांच्या संकल्पनेतून हा भव्य देखावा साकारण्यात आला आहे. गुजरातला जाऊन पाण्याखालची द्वारका पाहणे सामान्य नागरिकांना सहज शक्य होत नाही. त्यामुळे शिवडीच्या राजाने ही बुडालेली द्वारका मुंबईकरांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जवळ आणण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे.

Mumbai News : परीक्षेतील गोंधळाला आळा बसणार? अभाविपच्या परिषदेत प्रश्नपत्रिका, AI आणि निकालावर मोठं मंथन

समृद्ध परंपरेची साक्ष; सांस्कृतिक उपक्रमांना प्राधान्य

मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत जाधव म्हणाले, शिवडीच्या राजाची ७५ वर्षांची वाटचाल ही श्रद्धा, संस्कृती, सामाजिक बांधिलकी आणि समाजातील एकोपा जपणाऱ्या समृद्ध परंपरेची साक्ष आहे. अमृतमहोत्सवी वर्षात ही परंपरा अधिक व्यापक करत सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना विशेष प्राधान्य देण्यात येत आहे. यंदाच्या उत्सवातील हा आगळावेगळा सोहळा भाविकांनी अनुभवावा, ‘पाण्याखालची द्वारका’ पाहावी आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन मी सर्व भाविकांना करतो. मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक विजय इंदुलकर म्हणाले, शिवडीच्या राजाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून यंदा काहीतरी आगळेवेगळे अनुभवता यावे, या हेतूने ‘पाण्याखालची द्वारका’ ही संकल्पना साकारण्यात आली आहे. पौराणिक कथांमधील श्रीकृष्णाची नगरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्यक्ष उभारण्याचा हा प्रयत्न आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Shivdi cha raja amrit mahotsav underwater dwarka ganeshotsav mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 10:37 AM

Topics:  

  • ganesh charuthi
  • Ganeshotsav 2026
  • Shivdi

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi 2026: गणपती स्थापनेत कलश का असतो महत्त्वाचा? कलशात ठेवतात या वस्तू
1

Ganesh Chaturthi 2026: गणपती स्थापनेत कलश का असतो महत्त्वाचा? कलशात ठेवतात या वस्तू

Ganeshotsav 2026: ७५७ गावांत रंगणार ‘एक गाव, एक गणपती’; सामाजिक एकोप्यासाठी जिल्हा पोलिसांचा विशेष उपक्रम
2

Ganeshotsav 2026: ७५७ गावांत रंगणार ‘एक गाव, एक गणपती’; सामाजिक एकोप्यासाठी जिल्हा पोलिसांचा विशेष उपक्रम

Mumbai News: गणपती उत्सवासाठी मुंबई पोलिस दल झाले सज्ज! २५ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तासाठी राहणार तैनात
3

Mumbai News: गणपती उत्सवासाठी मुंबई पोलिस दल झाले सज्ज! २५ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तासाठी राहणार तैनात

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा रस-शिरवळे, नोट करून घ्या रेसिपी
4

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा रस-शिरवळे, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.