Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026: ७५७ गावांत रंगणार ‘एक गाव, एक गणपती’; सामाजिक एकोप्यासाठी जिल्हा पोलिसांचा विशेष उपक्रम

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि गावातील एकोपा अधिक दृढ करण्यासाठी जिल्हा पोलिसांनी राबवलेल्या ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यंदा जिल्ह्यातील तब्बल ७५७ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पनेनुसार गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 12, 2026 | 11:38 AM
७५७ गावांत रंगणार ‘एक गाव, एक गणपती’; सामाजिक एकोप्यासाठी जिल्हा पोलिसांचा विशेष उपक्रम (फोटो सौजन्य-ChatGPT)

७५७ गावांत रंगणार ‘एक गाव, एक गणपती’; सामाजिक एकोप्यासाठी जिल्हा पोलिसांचा विशेष उपक्रम (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • ‘एक गाव, एक गणपती’ला उत्स्फूर्त प्रतिसाद!
  • जिल्ह्यातील ७५७ गावांचा सहभाग
  • पोलिसांच्या प्रबोधनाला यश
नाशिक: शहरी भागात शेकडो गणेश मंडळांकडून धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी धडपड सुरू असताना, नाशिकच्या ग्रामीण भागात मात्र उत्सव आणि परंपरेचे मूळ स्वरूप जपण्याचा स्तुत्य उपक्रम पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील सामाजिक एकोपा आणि सलोखा अधिक दृढ करण्यासाठी ग्रामीण पोलिसांच्या प्रबोधनातून यंदा तब्बल निम्म्या जिल्ह्यात म्हणजे १ हजार ९३५ पैकी ७५७गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबवण्यात येत आहे. (Ganeshotsav 2026)

जिल्ह्यात २ हजारांहून अधिक मंडळांनी दाखल केले अर्ज

ग्रामीण भागात एकीकडे ‘एक गाव, एक गणपती’चे चित्र असताना, दुसरीकडे मोठ्या गावांमध्ये आणि तालुक्यांच्या ठिकाणी उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील ४० पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुमारे २ हजारांपेक्षा जास्त सार्वजनिक गणेश मंडळांनी परवानग्यांसाठी अर्ज दाखल केले आहेत.

Mumbai News: गणपती उत्सवासाठी मुंबई पोलिस दल झाले सज्ज! २५ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तासाठी राहणार तैनात

सामाजिक सलोखा आणि संभाव्य वादांना मिळाला पूर्णविराम

जिल्ह्यात गेल्या पाच-सहा वर्षांपासून ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना यशस्वीरीत्या राबवली जात आहे. त्यामुळे गावागावांतील लहान-मोठे तंटे, स्पर्धा आणि गटबाजी दूर होऊन सर्व धर्मीय व सर्व धडे एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात, सन २०१७ मध्ये जिल्ह्यातील तब्बल १,०२६ गावांनी हा उपक्रम राबवला होता, कोरोना काळानंतर काही ठिकाणी बदल झाले. असले तरी, २०२३ मध्ये ७३४ तर २०२५ मध्ये ८०४ गावांत ही परंपरा जपली गेली. यंदा २०२६ मध्ये ७५७ गावांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर अधीक्षक विमला एम. आणि सूरज गुंजाळ यांनी गावपातळीवर प्रत्यक्ष बैठका घेऊन या उपक्रमाला विशेष प्रोत्साहन दिले आहे.

संवेदनशील भागात कडेकोट बंदोबस्त

गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी ग्रामीण पोलिसांनी कंबर कसली आहे. सर्व ४० पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या, मालेगाव, मनमाड, येवला शहर आणि सटाणा या संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलीस बल तैनात केले आहे. तसेच बॉम्बशोधक व नाशक पथक, दहशतवादविरोधी पथक आणि जलद प्रतिसाद पथक सतर्क ठेवण्यात आले आहे. गुडमॉर्निंग पथके, गस्ती पथके आणि बीट मार्शलच्या माध्यमातून प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाणार असून, विसर्जन मिरवणुकीच्या वेळी दर दोन तासांनी पोलीस नियंत्रण कक्षात प्रत्येक घडामोडीची नोंद घेतली जाईल. पोलिसांच्या या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे यंदाचा गणेशोत्सव ग्रामीण भागात पुन्हा एकदा सौहार्द आणि उत्साहाचे प्रतीक ठरणार आहे.

शिवडीच्या राजाच्या अमृतमहोत्सवी वर्षात अनोखा देखावा; मुंबईत साकारली ‘पाण्याखालची द्वारका’

Web Title: 757 villages to celebrate ek gaon ek ganpati district police special planning for social unity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganeshotsav 2026
  • Nashik

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi 2026: गणपती स्थापनेत कलश का असतो महत्त्वाचा? कलशात ठेवतात या वस्तू
1

Ganesh Chaturthi 2026: गणपती स्थापनेत कलश का असतो महत्त्वाचा? कलशात ठेवतात या वस्तू

Mumbai News: गणपती उत्सवासाठी मुंबई पोलिस दल झाले सज्ज! २५ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तासाठी राहणार तैनात
2

Mumbai News: गणपती उत्सवासाठी मुंबई पोलिस दल झाले सज्ज! २५ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तासाठी राहणार तैनात

शिवडीच्या राजाच्या अमृतमहोत्सवी वर्षात अनोखा देखावा; मुंबईत साकारली ‘पाण्याखालची द्वारका’
3

शिवडीच्या राजाच्या अमृतमहोत्सवी वर्षात अनोखा देखावा; मुंबईत साकारली ‘पाण्याखालची द्वारका’

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा रस-शिरवळे, नोट करून घ्या रेसिपी
4

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा रस-शिरवळे, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.