तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था बळकटीकरणावर गोलमेज! विद्यार्थ्यांचे आरोग्य नियोजनाचा भाग बनणे आवश्यक
Mumbai News: तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था बळकटीकरण’ या विषयावर राज्यस्तरीय बहुक्षेत्रीय गोलमेज परिषदेचे आयोजन नुकतेच मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले होते. या परिषदेचे आयोजन सलाम बॉम्बे फाऊंडेशन, नॅशनल सर्व्हिस फाउंडेशन आणि नशामुक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. दरम्यान, विद्यार्थ्यांचे आरोग्य नियोजनाचा भाग बनणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.(फोटो सौजन्य – AI)
या परिषदेत शिक्षण, आरोग्य, अन्न व औषध प्रशासन, सामाजिक कल्याण व न्याय, पालिका सार्वजनिक आरोग्य विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, शाळा आणि नागरी समाज संस्था यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. किशोरवयीन व तरुणांमधील तंबाखू व निकोटीनचा वापर, टीओएफईआयची प्रभावी अमलबजावणी, आंतरविभागीय समन्वय, संस्थात्मक जबाबदारी व देखरेख, क्षमता बांधणी यावर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रमुख अध्यक्ष आंचल सूद गोयल, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, मुंबई शहर, अतिरिक्त जिल्हाधिकारी, मुंबई शहर बाप्पासाहेब थोरात होते. प्रमुख वक्ते / पॅनेलिस्ट: डॉ. मंगेश पेडणेकर संचालक, हीलिस सार्वजनिक आरोग्य संस्था, सुजाता खरे शिक्षण अधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, डॉ. हिमांशू गुप्ते उपाध्यक्ष आरोग्य, (एनएसएफ), डॉ. नाझनीन शेख – सहाय्यक आरोग्य अधिकारी (शाळा), महानगरपालिका, दीपक पाटील सहाय्यक महाव्यवस्थापक, एसबीएफ, नारायण लाड सहाय्यक महाव्यवस्थापक, एसबीएफ, वर्षा विद्या विलास महासचिव, नशामुक्ती महामंडळ हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अभिराम मेहेंदळे यांनी केले.
परिषदेतील महत्त्वाचा विषय म्हणजे टीओएफईआय अंमलबजावणीमध्ये शिक्षण विभागाची भूमिका याबाबत बृहन्मुंबई पालिका शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांनी सांगितले की, शाळांच्या दैनंदिन घडामोडी, शैक्षणिक व्यवस्था आणि देखरेख याबाबत महत्त्वपूर्ण मुद्यावर चर्चा करण्यात आली. चर्चेत हे अधोरेखित करण्यात आले की, तंबाखूमुक्त शाळा निर्माण करणे हे केवळ जनजागृती उपक्रमापुरते मर्यादित न राहता शाळेच्या नियमित प्रशासन, देखरेख आणि विद्याथ्यांचे आरोग्य नियोजनाचा भाग बनणे आवश्यक आहे.
मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर करणे, तंबाखू-संबंधित समस्या नोंदविण्यासाठी कर्मचाऱ्यांना टीओएफईआय मार्गदर्शकतत्व व त्यांची भूमिका व जबाबदारी बाबत स्पष्ट माहिती देणे, नियमित शाळा देखरेखीखाली टीओएफईआयचे सूचक मार्गदर्शन समाविष्ट करणे. तंबाखू प्रतिबंधाचा आरोग्य शिक्षण, जीवन कौशल्ये आणि किशोरवयीन आरोग्य उपक्रमामध्ये समावेश करणे. विद्यार्थ्यांमधील तंबाखू/निकोटीन वापराचे संभाव्य संकेत ओळखण्यासाठी शिक्षकांची क्षमता बांधणी करणे, तंबाखू-संबंधित समस्या नोंदविण्यासाठी कर्मचाऱ्यांना टीओएफईआय मार्गदर्शकतत्व व त्यांची भूमिका व जबाबदारी बाबत स्पष्ट माहिती देणे, नियमित शाळा देखरेखीखाली टीओएफईआयचे सूचक मार्गदर्शन समाविष्ट करणे. तंबाखू प्रतिबंधाचा आरोग्य शिक्षण, जीवन कौशल्ये आणि किशोरवयीन आरोग्य उपक्रमामध्ये समावेश करणे.
महाराष्ट्राच्या जलसुरक्षेवर उष्णसंकट! कोकण-गोव्यात उष्ण मान्सून हवामान पट्टा वाढला
विद्यार्थ्यांमधील तंबाखू/निकोटीन वापराचे संभाव्य संकेत ओळखण्यासाठी शिक्षकांची क्षमता बांधणी अहवाल आणि संबंधित यंत्रणा तयार करणे. शाळांना आवश्यक आयईसी साहित्य, तपासणी सूची आणि अहवाल उपलब्ध करून देणे, अडचणी असलेल्या शाळांना तांत्रिक साहाय्य, आणि मदत उपलब्ध करून देणे, प्रभावी काम करणाऱ्या शाळांच्या सर्वोत्तम पद्धती इतर शाळांमध्ये प्रसारित करणे, आरोग्य, एफडीए, पालिका आणि इतर संबंधित विभागांमध्ये नियमित समन्वय यंत्रणा विकसित करणे.






