डोंबिवली एमआयडीसीत उभारणार इलेक्ट्रिक एसटी बस चार्जिंग स्टेशन
पर्यावरणस्नेही नावरणाचा विचार करून शासनाने वंजनिक प्रवासी बस वाहतूक सेवेत विद्युत बना सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. स्थानिक वहन सेवांच्या बस, राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बस यापुढील काळात झिलऐवजी विद्युतभारीत पद्धतीने लावण्यात येणार आहेत. हाच विचार करून आणि येणाऱ्या काळातील विद्युत बसची इणारी संख्या लक्षात घेता परिवहन भागाने डोंबिवली एमआयडीसीतील गारात सहा कोटी १७ लाख २८ हजार बये खचून विद्युत चार्जिंग केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
डोंबिवलीतील एमआयडीसीतील एसटी बस विद्युत चार्जिंग केंद्र उभारण्यासाठीच्या प्रस्तावाला शासनाच्या परिवहन विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे डोंबिवलीत विद्युत चार्जिंग केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाच्या अंतर्गत डोंबिवली विभाग येतो.
परिवहन महामंडळाचे कल्याण, डोंबिवली एमआयडीसी आणि विठ्ठलवाडी येथे एसटी बस आगार आहेत. या आगारांमधून स्थानिक प्रवासी वाहतुकीबरोबर राज्याच्या विविध भागात धावणाऱ्या बस प्रवासी वाहतुकीसाठी धावतात. सुरक्षित प्रवास म्हणून नागरिक एसटी बसला सर्वाधिक प्राधान्य देतात.
डोंबिवली एमआयडीसीत जीमखान्याच्या पुढील भागात एस. टी. महामंडळाचा मागील अनेक वर्षांपासूनचा भूखंड आहे. याठिकाणाहून ठाणे, पालघरसह इतर जिल्ह्यांमध्ये बस धावतात. हा भूखंड सुमारे चार ते पाच एकरचा आहे. एमआयडीसी सारख्या मोक्याच्या जागी हा भूखंड आहे. आता या भूखंडावर परिवहन विभागाचे विद्युत चार्जिंग केंद्र उभे राहणार असल्यामुळे आणि या केंद्रात एस. टी. बस चार्जिंग करण्यासाठी सतत येणार असल्यामुळे प्रवासी वाहतुकी बरोबर एस. टी. महामंडळाच्या कर्मचा-यांची या आगारातील वर्दळ वाढणार आहे. या विद्युत बस चार्जिंग केंद्र उभारणीसाठी शासनाने ६ कोटी १७ लाखाचा खर्च करण्याचे नियोजन केले आहे.
एकीकडे एसटी महामंडळ विद्युत बस चार्जिंग केंद्र उभारण्याच्या दिशेने पाऊल टाकत असताना दुसरीकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमानेही विद्युत बससाठी वाजिंग केंद्र उभारणी सुरू केली आहे. मात्र, चार्जिंग केंद्रांची अपुरी उपलब्धता आणि काही प्रस्तावित केंद्राची कामे प्रलंबित असल्याने केडीएमटीला आपल्या विद्युत बस पूर्ण क्षमतेने प्रवासी सेवेत उतरविण्यात अडचणी येत आहेत.
त्यामुळे सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचे संपूर्ण विद्युतीकरण करायचे असेल, तर बसच्या उपलब्धतेबरोबरच पुरेशी चार्जिंग केंद्रे, सक्षम वीजपुरवठा आणि देखभाल यंत्रणा उभारणेही तितकेच आवश्यक आहे. दरम्यान, कल्याण-डोंबिवली एसटी आगाराचे अधिकारी वेतन देवधर यांनी डोंबिवली एमआयडीसीतील आगारात विद्युत बस चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली.
या केंद्रात कल्याण, डोंबिवल विठ्ठलवाडीसह ठाणे बस आगाराती बससह राज्याच्या विविध भागातून प्रवान वाहतूक करणाऱ्या विद्युत एसटी बसव चार्जिंगची सुविधा उपलब्ध होणार आ पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम विभागाच आवश्यक परवानग्या घेऊन ठेकेदाराने केंद्र उभारायचे आहे. या संदर्भात शासक अध्यादेश परिवहन विभागाचे कक्ष अधिक सुधीर कोळेकर यांच्या स्वाक्षरीने प्रसि करण्यात आला आहे. कल्याण डोंबिवत पालिका हद्दीत पालिका परिवहन उपक्रमाच विद्युत बस धावणार असल्याने केडीएम उपक्रमाने पालिकाहद्दीत विद्युत चार्जिंग के उभारणीचे काम सुरू केले आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: डोंबिवली एमआयडीसीतील एसटी महामंडळाच्या आगारात हे चार्जिंग केंद्र उभारण्यात येणार आहे.
Ans: कल्याण, डोंबिवली आणि विठ्ठलवाडी आगारांतील इलेक्ट्रिक एसटी बसना या केंद्राचा लाभ मिळणार आहे.
Ans: पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देणे आणि भविष्यातील इलेक्ट्रिक बस सेवेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.






