कुर्ला मारहाण प्रकरणात मोठी अपडेट! (Photo - X)
मिळालेल्या माहितीनुसार, एक तरुण आणि तरुणी कुर्ल्यातील महापालिकेच्या उद्यानात फोटो काढण्यासाठी गेले होते. दोघेही फोटो काढत असताना अचानक काही मुलांनी त्यांना अडवले. त्यानंतर आठ ते दहा अल्पवयीन मुलांचे टोळके तिथे जमा झाले.
सुरुवातीला दोघांशी वाद घालण्यात आला. तरुणाने विरोध करण्याचा प्रयत्न केला; मात्र टोळक्यातील मुलांची संख्या जास्त असल्याने त्याला प्रतिकार करणे कठीण झाले. त्यानंतर या मुलांनी दोघांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढेच नाही, तर लाकडाचाही वापर करण्यात आला. या हल्ल्यात तरुण आणि तरुणी दोघेही जखमी झाले.
या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर प्रकरण चर्चेत आले. सार्वजनिक ठिकाणी फोटो काढण्यासाठी गेलेल्या तरुण-तरुणीला अशा प्रकारे लक्ष्य केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, पोलिसांनी घटनेची दखल घेत तपास सुरू केला. मारहाणीत सहभागी असल्याचा आरोप असलेल्या सहा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हे सर्व मुलं १२ ते १५ वर्षे वयोगटातील असल्याची माहिती समोर आली आहे.
ताब्यात घेतलेल्या सहाही अल्पवयीन मुलांना नियमानुसार बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना ४ डिसेंबरपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे प्रकरणाला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे.
या घटनेनंतर सार्वजनिक उद्यानांमधील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. उद्यानात फिरायला जाणारे नागरिक, कुटुंबे आणि तरुण-तरुणींच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उद्यानांमध्ये सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवावी, नियमित गस्त ठेवावी आणि सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Ans: मुंबईतील कुर्ला परिसरात फिनिक्स मॉलजवळ असलेल्या महापालिकेच्या उद्यानात ही घटना घडली.
Ans: पोलिसांनी या प्रकरणात सहा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. ही मुले १२ ते १५ वर्षे वयोगटातील आहेत.
Ans: बाल न्यायालयाने सहाही अल्पवयीन मुलांना ४ डिसेंबरपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत.






