
प्रसूतीनंतर महिलेला चादरीतून रुग्णालयात नेण्याची वेळ! आरोग्य व्यवस्थेचे धक्कादायक वास्तव
मुंबई: कुर्ल्यात प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर एका महिलेची प्रसूती रुग्णालयाबाहेरच झाल्याचा आणि त्यानंतर तिला चादरीतून उचलून पालिकेच्या डॉ. आनंदीबाई जोशी प्रसूतिगृहात नेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ कुटुंबीयांनी रेकॉर्ड केला असून, मदतीसाठी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडे वारंवार विनंती करूनही तातडीची मदत मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात येत आहे.(फोटो सौजन्य – AI)
Pune Metro Line 3: हिंजवडीकरांची प्रतीक्षा संपणार! पुणे मेट्रो लाईन ३ ची तारीख लवकरच जाहीर होणार
मयंक सोलंकी यांच्या माहिती नुसार, पहाटे साडेचारच्या सुमारास संबंधित महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या. त्या वेळी ते जवळच गणेशमूर्तीच्या सजावटीचे काम करत होते. महिलेची अवस्था पाहून त्यांनी सुमारे दोन मिनिटाच्या अंतरावरील डॉ. आनंदीबाई जोशी प्रसूतिगृह गाठले. महिलेच्या पोटातून अर्भकाचा काही भाग बाहेर आला असून, तिच्या मदतीला कोणीही नसल्याचे सांगत त्यांनी रुग्णालयातील परिचारिकांकडे तातडीच्या मदतीची मागणी केली. ‘महिलेची स्थिती अत्यंत नाजूक असून, तुम्ही तातडीने घटनास्थळी या, प्रसूती पूर्ण करून नाळ कापा,’ अशी विनंती केल्याचा दावा सोलंकी यांनी केला.
Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात फुलांना मोठी मागणी; पाऊस पडल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता
मात्र, रुग्णालयाच्या आवाराबाहेर जाऊन मदत करता येणार नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांकडूनही आपल्याविरोधात तक्रार करण्याची भाषा करण्यात आल्याचे सोलंकी यांनी सांगितले. अखेर चार-पाच जणांनी महिलेला चादरीत ठेवून रुग्णालयात आणले. ‘नाळ पोटात आणि बाळ बाहेर’ अशा गंभीर अवस्थेत महिलेला रुग्णालयात आणावे लागले, असा दावा सोलंकी यांनी केला. या संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत. सहानुभूती नको, तर घटनेची निष्पक्ष चौकशी करून नेमकी चूक कुणाची आणि जबाबदारी कुणाची, हे निश्चित करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, या आरोपांबाबत रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांची अधिकृत भूमिका उपलब्ध झाल्यानंतर तीही स्पष्ट होणे आवश्यक आहे. याबाबत बोलण्यासाठी पालिकेच्या आरोग्य प्रशासनाशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.