
आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अमित ठाकरे आज शिवसेना भवनात
काही पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांच्या याद्या आधीच जाहीर केल्या असून, तर काही पक्षांनी यादी जाहीर न करता थेट सर्व महत्त्वाच्या नेत्यांच्या प्रचार सभांचे नियोजन सुरू केले आहे. ज्या-ज्या भागात संबंधित पक्षाची ताकद आहे, त्या ठिकाणी त्या पक्षाचे प्रमुख नेते प्रचारसभा घेतील, अशा पद्धतीने नियोजन करण्यात येत आहे. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा प्रचार उद्या औपचारिकरित्या सुरू होणार आहे. वरळी डोम येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
दुसरीकडे, ठाकरे बंधू — राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे — यांच्याही संयुक्त प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले असून, ५ जानेवारी रोजी पहिली सभा होणार आहे. याशिवाय, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट तसेच काँग्रेस पक्षही आपल्या स्टार प्रचारकांच्या प्रचार सभांसाठी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे असून, येत्या काळात प्रचाराचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अमित ठाकरे आज दादर येथील शिवसेना भवनात दाखल होणार आहेत. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेही उपस्थित असणार आहेत.
शिवसेना ठाकरे गट–मनसे–राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या युतीच्या मुंबई महानगरपालिकेतील २२७ उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आज दुपारी २ वाजता शिवसेना भवन, दादर येथे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे संयुक्तपणे उमेदवारांशी संवाद साधणार आहेत. या भेटीमुळे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला आणखी गती मिळण्याची शक्यता असून, युतीतील समन्वय आणि रणनीतीवर विशेष भर दिला जाणार असल्याचे संकेत आहेत.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. २४ डिसेंबर रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे भावांनी ऐतिहासिक युतीची घोषणा केल्यानंतर मुंबईच्या राजकारणात नवी समीकरणे आकाराला आली आहेत.
Secret Meeting : भारत-जमात ‘सिक्रेट’ खलबतं! शफीकुर रहमान यांचा खळबळजनक खुलासा; ढाकामध्ये नेमकं काय
या युतीमुळे आगामी महापालिका निवडणुकीत आता ‘ठाकरे बंधू विरुद्ध महायुती’ असा थेट सामना रंगणार आहे. मुंबई महापालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी ११४ हा बहुमताचा आकडा गाठणे अत्यावश्यक ठरणार आहे. एकूण २२७ जागांसाठी ही निवडणूक होणार असून, बहुमतासाठी आवश्यक असलेला हा ‘जादुई आकडा’ कोण गाठणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे ही लढत अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता असून, मुंबईच्या सत्तेसाठी राजकीय पक्षांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळणार आहे. आगामी काळात प्रचार, उमेदवारांची मांडणी आणि युतीतील समन्वय यावरच निवडणुकीचा निकाल मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.