Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai-Pune Missing Link:  पहिल्याच पावसात ‘मिसिंग लिंक’ला फटका; बोगद्याच्या प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळल्याने वाहतूक ठप्प

हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या काही तासांत लोणावळा आणि तळेगाव परिसरात सरासरीपेक्षा अनेक पटींनी अधिक पाऊस झाला आहे. या अतिवृष्टीमुळे डोंगरकड्यांवरून माती वाहून येण्याच्या घटना वाढल्या असून, प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 06, 2026 | 10:38 AM
Mumbai Pune Expressway Missing Link, Missing Link Slab Collapse,

Mumbai Pune Expressway Missing Link, Missing Link Slab Collapse,

Follow Us
Follow Us:

Mumbai-Pune Missing Link :  मोठ्या गाजावाजात उभारण्यात आलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाला पहिल्याच जोरदार पावसाचा फटका बसल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वीच या मार्गावर खड्डे पडल्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर आज (6 जुलै) पहाटे मिसिंग लिंकच्या प्रवेशद्वाराजवळील स्लॅबचा काही भाग कोसळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मिसिंग लिंकच्या प्रवेशद्वाराजवळील स्लॅब कोसळून डोंगरावरील माती आणि पाण्याचा मोठा लोंढा बोगद्याच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरला. पाणी आणि मातीचा छतावरून माती आणि पाणी थेट रस्त्यावर कोसळू लागला. अशा परिस्थितीत सुरक्षिततेच्या कारणास्तव मिसिंग लिंकवरील वाहतूक तातडीने बंद करण्याच्या निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाचा हाहाकार! सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात; लोकल ट्रेनची

दरम्यान, मुसळधार पावसामुळे प्रशासनाने नागरिकांना नव्या तसेच जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. वाहतूक बंद झाल्याने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, लोणावळा घाट परिसरात गेल्या चार तासांपासून तीव्र वाहतूक कोंडी झाली आहे. अनेक वाहनचालक महामार्गावर अडकून पडल्याचेही बोलले जात आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या काही तासांत लोणावळा आणि तळेगाव परिसरात सरासरीपेक्षा अनेक पटींनी अधिक पाऊस झाला आहे. या अतिवृष्टीमुळे डोंगरकड्यांवरून माती वाहून येण्याच्या घटना वाढल्या असून, प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. संबंधित यंत्रणांकडून घटनास्थळी पाहणी सुरू असून, मलबा हटवून मार्ग सुरक्षित झाल्यानंतरच वाहतूक पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

Rain Updates: मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; कुठे दरड कोसळली, कुठे पाणी साचलं? एका क्लिकवर जा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मिसिंगवरील दरड कोसळ्याप्रकरणी थेट राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ” मिसिंग लिंकवर durability चेक करण्यासाठी खड्डे पडले होते, मग आज durability चेक करण्यासाठी दरड कोसळली आहे का?

मिसिंग लिंकच्या कामात केवळ दलाली आणि भ्रष्टाचाराची लिंक झाल्याने सुरक्षाच मिसिंग झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसात पुण्यापासून मुंबईपर्यंत पावसाने या नतभ्रष्ट सरकारच्या पोकळ दाव्यांची पोलखोल करत या भ्रष्ट सरकारचे काळे कारनामे उघड केले आहेत. या नतभ्रष्ट सरकारला जनता माफ नाही करणार! ” अशा शब्दांत रोहित पवारांनी राज्य सरकारच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहे.

 

 

 

Web Title: Mumbai pune expressway missing link slab collapse tunnel blocked traffic jam lonavala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 10:38 AM

Topics:  

  • Maharashtra Rain Update
  • Mumbai Pune Missing Link
  • slab collapsed

संबंधित बातम्या

‘दोन महिन्यांत मिसिंग लिंकवर खड्डे… आणि मुख्यमंत्री म्हणतात, ही तर टेस्टिंग’ वर्षा गायकवाड यांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघात
1

‘दोन महिन्यांत मिसिंग लिंकवर खड्डे… आणि मुख्यमंत्री म्हणतात, ही तर टेस्टिंग’ वर्षा गायकवाड यांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघात

‘मिसिंग लिंकवर फक्त दोनच खड्डे..,’ मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण; पहिल्याच पावसात खड्डे पडल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
2

‘मिसिंग लिंकवर फक्त दोनच खड्डे..,’ मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण; पहिल्याच पावसात खड्डे पडल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.