Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘दोन महिन्यांत मिसिंग लिंकवर खड्डे… आणि मुख्यमंत्री म्हणतात, ही तर टेस्टिंग’ वर्षा गायकवाड यांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघात

मुंबई-पुणे मार्गावरील महत्त्वाकांक्षी 'मिसिंग लिंक' प्रकल्प पहिल्याच पावसानंतर काही भागात खड्डे पडल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावरून आता काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी जोरदार हल्ला चढवला आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 04, 2026 | 09:38 PM
'दोन महिन्यांत मिसिंग लिंकवर खड्डे... आणि मुख्यमंत्री म्हणतात, ही तर टेस्टिंग' वर्षा गायकवाड यांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघात

'दोन महिन्यांत मिसिंग लिंकवर खड्डे... आणि मुख्यमंत्री म्हणतात, ही तर टेस्टिंग' वर्षा गायकवाड यांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघात

Follow Us
Follow Us:

मुंबई-पुणे मार्गावरील महत्त्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प सुरू होऊन अवघे दोन महिने होत असतानाच पहिल्याच पावसात काही ठिकाणी खड्डे पडल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सरकारवर टीका होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टीकरण देत प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेचे समर्थन केले आहे.

१ मे रोजी मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आलेल्या या प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, पहिल्याच पावसानंतर काही भागात खड्डे पडल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावरून आता काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी जोरदार हल्ला चढवला आहे.

‘एक दिवस उद्धव ठाकरेंना आमच्याकडे यावंच लागेल’; रामदास आठवलेंचा दावा, आदित्य ठाकरेंनाही लगावला टोला

काय म्हणाल्या वर्षा गायकवाड ?

वर्षा गायकवाड आपल्या अधिकृत ‘X ‘ पोस्टवरून म्हणाल्या, “दोन महिन्यांत महामार्गावर खड्डे… आणि मुख्यमंत्री म्हणतात, ही तर टेस्टिंग! कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या मिसिंग लिंकवर अवघ्या दोन महिन्यांत खड्डे पडतात… पण त्याची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी मुख्यमंत्री म्हणतात पहिल्या पावसानंतर रस्त्याची टेस्ट होते. म्हणजे आता प्रवाश्यांचा जीव आणि प्रवास हा टेस्टिंग लॅब झाला आहे का? आणि पहिल्या पावसात महामार्गावर टेस्टिंग होते तर या काळात टोल वसुली थांबली का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दोन महिन्यांत महामार्गावर खड्डे… आणि मुख्यमंत्री म्हणतात, ही तर टेस्टिंग! कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या मिसिंग लिंकवर अवघ्या दोन महिन्यांत खड्डे पडतात… पण त्याची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी मुख्यमंत्री म्हणतात पहिल्या पावसानंतर रस्त्याची टेस्ट होते.
म्हणजे आता प्रवाश्यांचा… pic.twitter.com/x2prVQjjan
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) July 4, 2026

त्या पुढे म्हणाला, “खड्डे पडले तर ती टीका नाही, तर वास्तव आहे. करदात्यांच्या पैशातून उभारलेल्या महामार्गावर दोन महिन्यांत खड्डे पडत असतील, तर प्रश्न विचारणे हा नागरिकांचा अधिकार आहे. दुर्दैव म्हणजे, अपयश मान्य करण्याऐवजी सरकार टीका करणाऱ्यांनाच दोष देत आहे. असो..रस्ते मजबूत नाहीत, पण सरकारचे स्पष्टीकरण मात्र मजबूत आहे!”

काय म्हणाले होते. देवेंद्र फडणवीस ?

मिसिंग लिंकवरील पडलेल्या खड्ड्यांवरून स्पष्टीकरण देताना फडणवीस म्हणाले, “मिसिंग लिंकवर सर्वत्र खड्डे पडलेले नाहीत. कनेक्टरजवळ फक्त दोन खड्डे पडले आहेत. मात्र काही लोकांना कुठल्याही गोष्टीचा बाऊ करून ती मोठी करून दाखवण्यात आनंद मिळतो.”

ते पुढे म्हणाले, “कोणतेही मोठे काम पूर्ण झाल्यानंतर आणि पहिला पाऊस पडल्यानंतर रस्त्याची टिकाऊ क्षमता तपासली जाते. त्या काळात काही तांत्रिक बाबी समोर येतात आणि त्यानुसार आवश्यक दुरुस्ती केली जाते.”

‘मिसिंग लिंकवर फक्त दोनच खड्डे..,’ मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण; पहिल्याच पावसात खड्डे पडल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

‘निंदकाचे घर असावे शेजारी’

फडणवीस यांनी या प्रकरणावर बोलताना प्रसिद्ध म्हणीचाही उल्लेख केला. “निंदकाचे घर असावे शेजारी. त्यामुळे टीका होत असेल तर हरकत नाही. एमएसआरडीसी योग्य ती काळजी घेईल आणि आवश्यक त्या सुधारणा करेल,” असे त्यांनी सांगितले.

‘हे इंजिनिअरिंगचा भाग आहे’

रस्त्यावर वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानाबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, “नवीन उड्डाणपूल किंवा रस्ता तयार झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात मॅस्टिक ॲस्फाल्ट काही प्रमाणात स्थिरावतो. त्यानंतरच तो पूर्ण क्षमतेने कार्य करतो. या सर्व प्रक्रिया इंजिनिअरिंगचा भाग आहेत. कुठे काही कमतरता आढळल्यास त्या निश्चितपणे दूर केल्या जातील.”

Web Title: Varsha gaikwad slams devenfra fadnavis over missing link potholes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 09:38 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Mumbai Pune Missing Link
  • Varsha Gaikwad

संबंधित बातम्या

राज्यात 50 हजार इलेक्ट्रिक बसेस आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
1

राज्यात 50 हजार इलेक्ट्रिक बसेस आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Devendra Fadnavis: ॲपआधारित टॅक्सी सेवांमध्ये समान संधीवर भर; समुच्चय वाहन धोरणासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचना
2

Devendra Fadnavis: ॲपआधारित टॅक्सी सेवांमध्ये समान संधीवर भर; समुच्चय वाहन धोरणासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचना

Nagpur MLC Election 2026: हा पराभव लपवता येणार नाही…: नागपूर निकालावरून नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचले
3

Nagpur MLC Election 2026: हा पराभव लपवता येणार नाही…: नागपूर निकालावरून नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचले

Nagpur Graduate Constituency Election 2026: संघ अन् मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या पराभवाची काय आहेत कारणे?
4

Nagpur Graduate Constituency Election 2026: संघ अन् मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या पराभवाची काय आहेत कारणे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.