क्षमता १० जणांची, लिफ्टमध्ये चढले १७ जण; भाजप नेते प्रविण दरेकरही अडकले, दरवाजा तोडून केली सुटका, पाहा VIDEO
वसई पश्चिमेतील एका कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र विधान परिषदेतील भाजपचे गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर तब्बल १० मिनिटे लिफ्टमध्ये अडकले. ही घटना वसईतील कौल हेरिटेज सिटी येथील अपुलँड ग्रँड बॅन्क्वेट हॉलमध्ये घडली. जुन्या आणि जीर्ण इमारतींच्या स्वयंपुनर्विकासासाठी आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिरात सहभागी होण्यासाठी दरेकर आले होते.
‘उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भविष्यात एकत्र येतील’; शिवसेनेच्या मंत्र्याचं मोठं विधान
या लिफ्टमध्ये वसईच्या आमदार स्नेहा दुबे-पंडीत आणि नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक यांच्यासह एकूण १७ जण होते. लिफ्टची क्षमता केवळ १० जणांची असतानाही अधिक लोक लिफ्टमध्ये चढल्याने तांत्रिक बिघाड होऊन ती अचानक बंद पडली. जवळपास १० मिनिटं अडकून पडल्यामुळे लिफ्टमध्ये अडकलेल्या सर्व चिंताग्रस्त झाले होते.
पालघर के वसई में MLA प्रवीण दरेकर लिफ्ट में फंसे!
करीब 20 मिनट तक बंद लिफ्ट में रहे अटके।
दरवाज़ा तोड़कर बाहर निकाला गया।@MBVVPOLICE#Palghar #Vasai #PravinDarekar #LiftIncident pic.twitter.com/WRnt6OGdAu— Visshal Singh (@VishooSingh) July 20, 2025
घटनेची माहिती मिळताच भाजप कार्यकर्ते आणि सुरक्षारक्षकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. लोंखंडी रॉडच्या साहाय्याने लिफ्टचा दरवाजा फोडण्यात आला आणि आत अडकलेल्या सर्व मान्यवरांची सुखरूप सुटका करण्यात आली. दरेकर आणि इतर उपस्थित जण सुटकेनंतर काही वेळ विश्रांतीसाठी थांबले. दरेकर आणि आमदार राजन नाईक यांनी पाणी पिऊन सावरल्यावर पुन्हा कार्यक्रमात सहभागी झाले.
या घटनेमुळे कार्यक्रमात काही काळासाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर शिबिर सुरळीत पार पडले. लिफ्टमध्ये अडकण्याचा प्रसंग थोडक्यात टळल्याने मोठा अनर्थ टाळल्याचे उपस्थितांनी सांगितले.
ठाकरे ब्रँड त्याच दिवशी संपला, ज्या दिवशी…; मंत्री गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
या प्रकारानंतर कार्यक्रमस्थळी सुरक्षेच्या आणि व्यवस्थापनाच्या बाबतीत गंभीर चर्चा होऊ लागली. लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त व्यक्तींची उपस्थिती ही तांत्रिक बिघाडास कारणीभूत ठरल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आयोजक आणि संबंधित बांधकाम व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या देखील अधोरेखित झाल्या.