maharashtra dcm eknath shinde gives reaction on india pakistan war live update
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात शिवसेना पक्षफुटीनंतर शिंदे गट आणि ठाकरे गट हे दोन गट पाहिला मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना सध्या सत्तेत आहे. असे असताना आत्तापर्यंत अनेक नेतेमंडळींनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पण, आता शिंदेंच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेतील कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या भारतीय कामगार सेनेत प्रवेश केला आहे.
सहा महिन्यांपूर्वीच या 250 कर्मचाऱ्यांनी भारतीय कामगार सेनेचा त्याग करून एकनाथ शिंदे यांच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेत प्रवेश केला होता. हा प्रवेश मुंबईतील पंचतारांकित कोर्टयार्ड मेरीट हॉटेलमध्ये झाला होता. पण, राष्ट्रीय कर्मचारी सेनेत असताना कर्मचाऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे कामगारांवर अन्याय होत असल्याच्या कारणाने त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या भारतीय कामगार सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, भारतीय कामगार सेनेत प्रवेशाच्या कार्यक्रमाला शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विनायक राऊत, शैलेश परब आणि युनिट प्रमुख रुपेश कदम यांच्यासह ठाकरे गटातील अनेक नेेतेमंडळी उपस्थित होती.
राजन साळवी यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
महायुतीचे मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी ‘ऑपरेशन टायगर’ सुरु झाल्याचे काही दिवसांपूर्वी सांगितले होते. त्यात लवकरच शिवसेना शिंदे गटात माजी आमदार व खासदारांचे प्रवेश होणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार, ठाकरेंना धक्का देत शिवसेना शिंदे गटात अनेकजण पक्षप्रवेश करत आहेत. कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेचा एक निष्ठावंत चेहरा असलेले राजन साळवी यांनी ठाकरेंची साथ सोडत धनुष्यबाण हाती घेतला. तर आमदार भास्कर जाधव हे त्याच पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कोकणातून ठाकरेंची शिवसेना धोक्यात असल्याचे पाहायला मिळत आहे. पण, असे असताना आता तब्बल 250 कर्मचाऱ्यांची ठाकरेंच्या भारतीय कामगार सेनेत ‘घरवापसी’ केली आहे.