उन्हाच्या झळांचा पक्ष्यांनाही फटका, १६ दिवसांमध्ये ५८ पक्षी तर तीन श्वान जखमी (फोटो सौजन्य-X)
Mumbai Heat News in Marathi: दरवर्षी उन्हाचा तडाखा हा वाढत असताना पाहायला मिळतो. यंदाही तापमान उच्चांकी स्तरावर पोहोचत आहे. दिवसभराच्या उन्हात वावरताना प्रत्येकालाच उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. कित्येक जण उष्माघाताचे शिकार देखील होत आहेत. यातच माणसांबरोबरच पशुपक्षांमध्ये ही उष्माघाताचे प्रमाण पाहायला मिळत आहे. कित्येक पक्षी उन्हामुळे मरून पडलेले आहेत.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) आकडेवारीनुसार, सांताक्रूझ वेधशाळेत शनिवारी कमाल तापमान ३४.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर कुलाबा येथे कमाल तापमान ३३.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हे तापमान मंगळवारपेक्षा खूपच कमी आहे, जेव्हा मुंबईत पारा ४० अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचला होता. याचदरम्यान गेल्या १६ दिवसांमध्ये उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईत ५७ पक्षी आणि तीन श्वान जखमी झाले आहेत. या जखमी पक्ष्यांवर परळ येथील दी बाई साकरबाई दिनशॉ पेटीट हॉस्पिटल फॉर ॲनिमल रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
हवामानशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, मार्च हा मुंबईसाठी सहसा संक्रमणाचा महिना असतो, येथे उत्तरेकडून कोरडे वारे आणि समुद्रातील ओलसर वारे वाहतात ज्यामुळे तापमानात चढ-उतार होतात. ऐतिहासिकदृष्ट्या मुंबईतील सर्वात उष्ण मार्च महिना १९५६ मध्ये नोंदवला गेला होता, जेव्हा तापमान ४१.७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. “मुंबई अंशतः ढगाळ राहील आणि पुढील आठ दिवस किमान ३४ अंश सेल्सिअसच्या आसपास दिवसाचे तापमान स्थिर राहील. हे मार्च महिन्याच्या सरासरी ३३ अंश सेल्सिअसच्या जवळपास आहे,” असे खाजगी हवामान ब्लॉग व्हेगरीज ऑफ वेदरचे हवामानशास्त्रज्ञ राजेश कपाडिया म्हणाले. तसेच समुद्री वारे परत येताच, आर्द्रता वाढेल, ज्यामुळे काही अस्वस्थता निर्माण होईल. रात्री देखील उष्ण असतील, ज्यामुळे मुंबईचा ‘हिवाळा’ आणि उन्हाळा यांच्यातील संक्रमण होईल.”
मार्चमध्ये तापमान वाढत असून ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने उष्णघाताचे प्रमाण रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. वाढत्या तापमानाचा फटका नागरिकांबरोबरच पक्षी व प्राण्यांनाही बसत आहेत. गेल्या १६ दिवसांत मुंबईत वाढत्या उष्णतेमुळे ५८ पक्षी जखमी झाले आहेत. डिहायड्रेशनमुळे पक्षी बेशुद्ध पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यापैकी अनेक पक्षी आकाशात उडताना अचानक खाली कोसळले, तर काही पक्षी झाडांवरून खाली पडल्याचे निदर्शनास आले. या सर्व बाबींवर पशु रुग्णालयासाठी दीबाई साकरबाई दिनशॉ पेटीट हॉस्पिटलमध्ये कॉरक अॅनिमल रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. जखमी झालेल्या पक्ष्यांमध्ये सर्वाधिक संख्या घारींची आहे. या सर्व पक्ष्यांवर परळ येथील दी बाई साकरबाई दिनशॉ पेटीट हॉस्पिटल फॉर ॲनिमल रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. पक्ष्यांप्रमाणे प्राण्यांनाही वाढत्या उन्हाचा फटका बसत आहे.