Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्ड कॉफीमध्ये आढळलं झुरळ, मालाडच्या प्रतिष्ठित हॉटेलमधील घटना; हॉटेल मालकाविरोधात गुन्हा दाखल

मालाड येथील एका बड्या लाऊंजमध्ये कोल्ड कॉफीत झुरळ आढळल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ग्राहकाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मालाड पोलिसांनी याप्रकरणी हॉटेल व्यवस्थापक, वेटर व संबंधित कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 01, 2024 | 02:00 PM
कोल्ड कॉफीमध्ये आढळलं झुरळ, मालाडच्या प्रतिष्ठित हॉटेलमधील घटना; हॉटेल मालकाविरोधात गुन्हा दाखल (फोटौ सौजन्य - X)

कोल्ड कॉफीमध्ये आढळलं झुरळ, मालाडच्या प्रतिष्ठित हॉटेलमधील घटना; हॉटेल मालकाविरोधात गुन्हा दाखल (फोटौ सौजन्य - X)

Follow Us
Follow Us:

मालाडमध्ये पुन्हा एकदा हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या हलर्गजीपणामुळे ग्राहकांना मनस्तापाला सामोर जावं लागलं आहे. काही महिन्यांपूर्वी मालाडमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. ज्यामध्ये एका ग्राहकाला आईस्क्रीममध्ये मानवी बोट आढळलं होतं. या घटनेचा तपास करण्यात आल्यानंतर समजलं की हे बोट कंपनीतील कर्मचाऱ्याचं होतं. या घटनेनंतर आता मालाडमध्ये पुन्हा एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मालाडमधील एका प्रतिष्ठित हॉटेलमध्ये ग्राहकाला त्याने ऑर्डर केलेल्या कोल्ड कॉफीमध्ये मृत झुरळ आढळलं आहे. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत हॉटेल व्यवस्थापक, वेटर व संबंधित कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेदेखील वाचा- दलित समाज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरां विरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट; नवी मुंबईतील युट्युबर विरोधात गुन्हा दाखल

ही घटना 30 ऑगस्ट रोजी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास घडली आहे. 25 वर्षीय प्रतिक रावत त्याच्या मित्रांसोबत मालाड पश्चिमच्या इन्फिनिटी मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या लाउंजमध्ये गेला होता. त्यांनी तिथे दोन कोल्ड कॉफी ऑर्डर केल्या. वेटरने त्यांना कॉफी आणून दिल्या. मात्र कॉफी पिल्यानंतर त्याची चव नेहमीप्रमाणे नव्हते. त्यामुळे प्रतिकने वेटरला कॉफीमध्ये स्वीट टाकून आणायला सांगितलं. वेटरने त्यांच्या कॉफीमध्ये स्वीट टाकून त्यांना कॉफी परत आणून दिली. मात्र कॉफी पीत असतानाच प्रतिकला त्या कॉफीमध्ये मृत झूरळ असल्याचं आढळलं. प्रतिकने त्याचा फोटो आणि व्हीडिओ काढला. त्यानंतर त्याने तात्काळ वेटरला आवाज देऊन ही घटना सांगितली. मात्र हॉटेल व्यवस्थापक आणि वेटरने ही बाब मान्य केली नाही.

यानंतर प्रतिकने पोलीस स्टेशन गाठत हॉटेल व्यवस्थापक आणि वेटरविरोधात तक्रार दाखल केली. प्रतिककडे असणाऱ्या फोटो आणि व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी व्यवस्थापक, वेटर व संबंधित कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकारानंतर मालाड पोलिस अ‍ॅक्शन मोडवर गेले. त्यांनी हॉटेल मॅनेजर, वेटर आणि अन्य संबंधितांवर कलम 125,274,275 आणि 3 (5) अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती देण्यात आली आहे.

हेदेखील वाचा- इमारतीत जाण्यास नकार दिल्याने सुरक्षा रक्षकाला मारहाण; जिम ट्रेनरला अटक, मुंबईतील घटना

आईस्क्रीममध्ये सापडलं मानवी बोट

मालाड येथील ऑर्लेम ब्रेडन सेराओ या 27 वर्षीय डॉक्टरने 12 जून रोजी एका फूड डिलव्हरी अ‍ॅपवरुन आईस्क्रीम कोन ऑर्डर केला होता. मात्र जेव्हा सेराओ यांनी तो कोन उघडला त्यामध्ये त्यांना मानवी बोट आढळलं. हे बोट दोन सेंटीमीटर लांब होतं. त्यांनी याबाबत सोशल मिडीयावर पोस्ट केली. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर आईस्क्रीममध्ये सापडलेलं बोट कोणाचं आहे याचा तपास पोलिसांनी सुरु केला.

आईस्क्रीम कंपनीचा ब्रॅण्ड, या आईस्क्रीम कुठे बनवल्या जातात याचा माग काढत पोलीस थेट पुण्याला पोहचले. यानंतर आईस्क्रीममध्ये सापडेलं बोट आईस्क्रिम कारखानातल्या असिस्टंट मॅनेजरचंअसल्याचं समोर आलं . पॅकेजिंग करताना हा अपघात झाला होता. कारखान्यात काम करणाऱ्या 24 वर्षीय अस्टिटंट मॅनेजरचं हे बोट आहे. मशीन सुरु होती आणि त्यावेळी तो मशीनचं झाकण उघडण्याचा प्रयत्न करत असताना त्याचं बोट तुटलं गेलं.

Web Title: A customer found a dead cockroach in his cold coffee incident in malad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2024 | 02:00 PM

Topics:  

  • Mumbai News

संबंधित बातम्या

BMC News : मुंबई महापालिकेत नेमकं चाललंय काय? किशोरी पेडणेकरांनी मंडपेश्वर भूखंडापासून टँकरपर्यंत सगळेच मुद्दे काढले!
1

BMC News : मुंबई महापालिकेत नेमकं चाललंय काय? किशोरी पेडणेकरांनी मंडपेश्वर भूखंडापासून टँकरपर्यंत सगळेच मुद्दे काढले!

Mumbai CNG Price: CNG दरवाढीने मुंबईकरांच्या खिशाला कात्री! आता रिक्षाने प्रवास करणंही महागणार?
2

Mumbai CNG Price: CNG दरवाढीने मुंबईकरांच्या खिशाला कात्री! आता रिक्षाने प्रवास करणंही महागणार?

मुंबईच्या समुद्रात राष्ट्रीय यॉटिंग स्पर्धेचा थरार! १७ क्लब, १२१ नौकानयनपटू सहभागी; विविध प्रकारांत इतरांनीही पटकावली विजेतेपदे
3

मुंबईच्या समुद्रात राष्ट्रीय यॉटिंग स्पर्धेचा थरार! १७ क्लब, १२१ नौकानयनपटू सहभागी; विविध प्रकारांत इतरांनीही पटकावली विजेतेपदे

Kurla Garden Incident : कुर्ला मारहाण प्रकरणात मोठी अपडेट! तरुण-तरुणीला मारणाऱ्या ६ अल्पवयीन मुलांबाबत कोर्टाचा निर्णय
4

Kurla Garden Incident : कुर्ला मारहाण प्रकरणात मोठी अपडेट! तरुण-तरुणीला मारणाऱ्या ६ अल्पवयीन मुलांबाबत कोर्टाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.