मध्यवर्ती कारागृहात क्षमता फक्त 1800,(File Photo : Jail)
मुंबईतील भांडूपमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इमारतीत जाण्यास नकार दिल्याने जीम ट्रेनरने सुरक्षकाला बेदम मारहाण करत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी जीम ट्रेनरला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. विशाल गावडे असं अटक करण्यात आलेल्या जीम ट्रेनरचं नाव आहे. तर शिवाजी बर्वे (वय ६० वर्षे) असे सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.
हेदेखील वाचा- मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया पुढील आदेशापर्यंत राहणार बंद! काय आहे कारण, वाचा
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, एका सोसायटीत ड्युटीवर असलेल्या सुरक्षा रक्षकाने जिम ट्रेनरला आत जाण्यास नकार दिला. या रागातून जिम ट्रेनरने सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली. या घटनेत सुरक्षा रक्षक शिवाजी बर्वे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी जीम ट्रेनर विशाल गावडे विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी बर्वे हे भांडुपच्या ड्रीम सोसायटीमध्ये गेल्या पाच वर्षांपासून सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. विशाल गावडे हा देखील याच सोसायटीत काही वर्षांपासून जिम ट्रेनर आहे. विशाल गावडे रात्री सोसायटीत आला असता सुरक्षारक्षक शिवाजी बर्वे यांनी त्याला आत जाण्यापासून रोखले. याच गोष्टीचा राग मनात ठेऊन जिम ट्रेनर विशाल गावडे याने सुरक्षा रक्षक शिवाजी बर्वे यांना मारहाण केली. या हल्ल्यानंतर शिवाजी बर्वे यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. यानंतर तेथे उपस्थित इतर लोकांनी गंभीर जखमी झालेल्या शिवाजी बर्वे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी जीम ट्रेनर विशाल गावडे विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा- संधी सुदैवाने मिळते, मिळालेल्या संधीतून उत्तमोत्तम कार्य करावं; आमदार प्रशांत ठाकूरांचं वक्तव्य
घाटकोपर परिसरात ओला कॅब ड्रायव्हर आणि ऑडी कारची धडक झाली. त्यामुळे रागात असलेल्या ऑडी कारच्या मालकाने ओला कॅब ड्रायव्हरला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कयामुद्दीन मैनुद्दीन कुरेशी (वय २४) असं मारहाण करण्यात आलेल्या ओला कॅब ड्रायव्हरचं नाव आहे. तर ऋषभ चक्रवर्ती असं कॅब ड्रायव्हरला मारहाण करणाऱ्या ऑडी कार मालकाचं नाव आहे.
या घटनेत ओला कॅब ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे. ओला कॅब चालक नवी मुंबईतील उलवेच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. ही संपूर्ण घटना सिसिटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ऑडी कार मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.