
CSMT-Panvel लोकल प्रवास होणार गारेगार, 'या' तारखेपासून हार्बर मार्गावर धावणार एसी लोकल
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या एसी लोकलसाठी काही साध्या लोकल फेऱ्या रद्द केल्या जाणार असल्याने सामान्य प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनापासून सीएसएमटी/वडाळा ते पनवेल मार्गावर १४ एसी लोकल फेऱ्या धावणार आहेत. पश्चिम रेल्वेवरही २६ जानेवारीपासून एसी लोकलच्या अतिरिक्त १२ फेऱ्या वाढणार आहेत. हार्बर मार्गावर १ डिसेंबर २०२१ रोजी सर्वप्रथम एसी लोकल सुरू करण्यात आली होती. सामान्य लोकलच्या तिकीट-पासच्या तुलनेत एसी लोकलच्या तिकोट-पासचे दर अधिक आहेत. यामुळे या एसी लोकलला कमी प्रतिसाद होता. सामान्य लोकलच्या फेऱ्या कमी झाल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. यामुळे हार्बर मार्गावरील एसी लोकल पूर्णपणे रद्द करण्यात आल्या होत्या.
नव्या नियोजनानुसार गर्दीच्या वेळेत धावणारी सकाळी ९.०९ पनवेल-सीएसएमटी आणि संध्याकाळी ५.३०ची वडाळा रोड-पनवेल, रात्री ८ वाजताची सीएसएमटी-पनवेल या तीन सामान्य लोकल फेऱ्या रद्द होणार असून, एसी लोकल धावणार आहे.
पहाटे ४.१५ वाशी-वडाळा रोड
सकाळी ६.१७ पनवेल-सीएसएमटी
सकाळी ९.०९ पनवेल-सीएसएमटी
दुपारी १२.०३ पनवेल-वडाळा रोड
दुपारी २.३१ पनवेल-सीएसएमटी
दुपारी ४.५५ वाशी-वहाळा रोड
संध्याकाळी ६.३७ पनवेल-सीएसएमटी
सकाळी ५.०६ वडाळा रोड-पनवेल
सकाळी ७.४० सीएसएमटी-पनवेल
सकाळी १०.३४ सीएसएमटी-पनवेल
दुपारी १.१७ वडाळा रोड-पनवेल
दुपारी ३.५४ सीएसएमटी-वाशी
संध्याकाळी ५.३० वडाळा रोडा-पनवेल
रात्री ८ सीएमएमटी-पनवेल
पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. या मार्गावरील एसी लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी वाढल्याने जादा लोकलची मागणी प्रवाशांकडून केली जात होती. त्यामुळे आता २६ जानेवारीपासून पश्चिम रेल्वेवर १२ एसी लोकल फेऱ्या वाढणार आहेत. सध्या पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या १०९ फेऱ्या सावत असून, यात वाढ होऊन १२१ फेऱ्या होणार आहेत. या वाढीव १२ एसी लोकल फेन्यांपैकी ६ फेऱ्या अप मार्गावर आणि ६ डाऊन मार्गावर धावतील, त्यात ४ सकाळी गर्दीच्या वेळी आणि ८ संध्याकाळी गर्दीच्या वेळी धावतील.