Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

न्यायालयात सादर केलं लिव-इन रिलेशनशिप अ‍ॅग्रीमेंट आणि मिळाला जामीन; काय आहे प्रकरण

मुंबई सत्र न्ययालयात एका याचिकेवरील सुनावणी पार पडली. या याचिकेत लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेने आपल्या जोडीदाराविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. या याचिकेवरील सुनावणीवेळी आरोपीने न्यायालयात लिव-इन रिलेशनशिप अ‍ॅग्रीमेंट सादर केलं आणि या करारा नुसार न्यायालयाने आरोपीला अटकपूर्व जामिन मंजूर केला.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 05, 2024 | 10:49 AM
न्यायालयात सादर केलं लिव-इन रिलेशनशिप अ‍ॅग्रीमेंट आणि मिळाला जामीन; काय आहे प्रकरण (फोटो सौजन्य - pinterest)

न्यायालयात सादर केलं लिव-इन रिलेशनशिप अ‍ॅग्रीमेंट आणि मिळाला जामीन; काय आहे प्रकरण (फोटो सौजन्य - pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही कधी लिव-इन रिलेशनशिप अ‍ॅग्रीमेंटबद्दल ऐकलं आहे का? लग्नापूर्वी अनेक जोडपी लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहतात. पण यासाठी ते अ‍ॅग्रीमेंट करतात का? मुंबईत अशी एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये जोडप्यांने लिव-इन रिलेशनशिप अ‍ॅग्रीमेंट तयार केलं आहे. या लिव-इन रिलेशनशिप अ‍ॅग्रीमेंटच्या मदतीने आरोपीला जामीन देखील मिळाला आहे. ही घटना ऐकूण सर्वांनाच धक्का बसला आहे.

हेदेखील वाचा- शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेतील आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला अखेर अटक; पोलिसांची मोठी कारवाई

मुंबईत लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका महिलेने तिच्या जोडीदाराविरोधात लैगिंक आत्याचाराचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली. या याचिकेवरील सुनावणीवेळी आरोपीने न्यायालयात लिव-इन रिलेशनशिप अ‍ॅग्रीमेंट सादर केलं. या अ‍ॅग्रीमेंटच्या मदतीने आरोपीला अटकपूर्व जामीन मिळाला. सुनावणीवेळी आरोपीने न्यायालयात सांगितलं आहे की, त्याने त्याच्या जोडीदारासोबत केलेल्या करारानुसार त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करता येणार नाही. लैगिंक आत्याचाराच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून सादर केलेलं हे अ‍ॅग्रीमेंट सर्वांनाच चकित करेल. मुंबईच्या सत्र न्यायालयात ही सुनावणी पार पडली.

कुलाबा परिसरात राहणाऱ्या एका 46 वर्षीय व्यक्तिवर 29 वर्षीय महिलेने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी आरोपीने न्यायालयात लिव-इन रिलेशनशिप अ‍ॅग्रीमेंट सादर केलं. या अ‍ॅग्रीमेंटमधील अटी ऐकूण नक्कीच तुम्हाला धक्का बसेल. 1 ऑगस्ट 2024 ते 30 जून 2025 पर्यंत पुरुष आणि महिला लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतील असे कराराच्या प्रतीमध्ये लिहिले आहे. या कालावधीत ते एकमेकांविरुद्ध लैंगिक छळाचा कोणताही गुन्हा दाखल करणार नाहीत आणि शांततेत वेळ घालवतील, अशी दुसरी अट आहे.

हेदेखील वाचा- कणकवली विधानसभेतील जलजीवन मिशनच्या कामांना गती मिळणार; उर्वरित रक्कम देण्याचे गुलाबराव पाटलांचे आदेश

या करारातील तिसरी अट अशी आहे की ती स्त्री पुरुषाच्या घरी राहणार आहे आणि जर तिला त्याचे वागणे आवडत नसेल तर एक महिन्याची नोटीस देऊन ते कधीही वेगळे होऊ शकतात. चौथ्या अटीत म्हटले आहे की, महिलेचे नातेवाईक तिच्यासोबत राहत असताना पुरूष तिच्या घरी येऊ शकत नाहीत. पाचव्या अटीनुसार, पुरुष स्त्रीला कोणत्याही प्रकारे मानसिक त्रास देणार नाही. सहाव्या अटीत म्हटले आहे की, जर स्त्री गर्भवती झाली तर पुरुषाला जबाबदार धरले जाणार नाही आणि त्याची जबाबदारी पूर्णपणे स्त्रीची असेल. सातव्या अटीनुसार छळामुळे पुरुषाला मानसिक आघात होत असेल, त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होत असेल, तर स्त्री जबाबदार असेल.

आरोपीने न्यायालयात हे अ‍ॅग्रीमेंट सादर केलं तेव्हा त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणाऱ्या २९ वर्षीय महिलेने कागदपत्रावरील स्वाक्षरी तिची नसल्याचे मुंबई न्यायालयात सांगितलं. मात्र आरोपीच्या वकीलांना न्यायालयात युक्तिवाद केला आहे की, माझ्या अशिलाला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले आहे, ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनीही रिलेशनशिपमध्ये राहण्यास होकार दिल्याचे या करारावरून स्पष्ट झाले आहे. वकिलांचा युक्तिवाद आणि लिव्ह-इन रिलेशनशिप ॲग्रीमेंटमुळे आरोपीला अटकपूर्वी जामीन मंजूर करण्यात आला.

Web Title: Accused get anticipatory bail after showing live in relationship agreement in mumbai court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2024 | 10:49 AM

Topics:  

  • Mumbai
  • Mumbai News

संबंधित बातम्या

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज
1

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज

शो मस्ट गो ऑन…! गोरेगावचा ओबेरॉय मॉल की स्विमिंग पूल…; मुसळधार पावसाचा मुंबईकरांनी लुटला आनंद, पाहा VIDEO
2

शो मस्ट गो ऑन…! गोरेगावचा ओबेरॉय मॉल की स्विमिंग पूल…; मुसळधार पावसाचा मुंबईकरांनी लुटला आनंद, पाहा VIDEO

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
3

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले
4

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.