कणकवली विधानसभेतील जलजीवन मिशनच्या कामांना गती मिळणार; उर्वरित रक्कम देण्याचे गुलाबराव पाटलांचे आदेश
कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील जल जीवन मिशन योजने अंतर्गत सुरु असणाऱ्या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. तर या बैठकीला स्थानिक आमदार नितेश राणे देखील उपस्थित होते. मुंबईत ही बैठक पार पडली. या बैठकीत पुन्हा अंदाजपत्रक सादर केलेली कामे मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी योजनेसाठी 38 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा- कोकणवासीयांच्या सुखकर प्रवासासाठी कणकवलीत प्रवासी संघातर्फे जनजागृती अभियान
मात्र या योजने अंतर्गत होणाऱ्या कामांसाठी अद्याप 17 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या योजनेतील उर्वरित रक्कम त्वरीत अदा करण्याचे आदेश मंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठकीत दिले आहेत. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत स्टाफ कमी असल्यामुळे बहुतेक कामं प्रलंबित आहेत. या कामांचा आढावा घेत लवकरात लवकर नव्याने स्टाफ भरून प्रलंबित कामं मार्गी लावावीत असे आदेश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत.
परिपूर्ण सर्वे झालेला नसल्याने जल जीवन मिशनच्या अनेक योजना अपुऱ्या व अर्धवट स्थितीत राहिल्या होत्या. यामुळे काही ठिकाणी अनेक वाड्या, वस्त्या या योजनेपासून वंचित राहत होत्या. त्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी याप्रकरणी विशेष लक्ष देण्याची मागणी गुलाबराव पाटील यांच्याकडे केली होती. त्यांच्या या मागणीला अखेर यश आले आहे. तसेच कणकवली मतदारसंघातील जलजीवन योजनेच्या कामांकरता 38 कोटीची आवश्यकता होती, त्याप्रमाणे निधी देखील मंजूर करण्यात आला होता. मात्र यातील 17 कोटी रक्कम प्राप्त झाली असून बाकी असलेली रक्कम देण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. त्याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ ही रक्कम देण्याचे आदेश दिले.
हेदेखील वाचा- पुन्हा हिट अँड रनचा थरार, भरधाव कारने महिलेला इतकं फरफटतं नेलं की…, मालाडमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबई येथे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला आमदार नितेश राणे यांच्यासह जलजीवन मिशनचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातील प्रलंबित कामांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी जल मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेला सूचनांमुळे प्रलंबित असलेली कामे अधिक गतिमान होणार आहेत.
बैठकीत कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील जल जीवन मिशन योजने अंतर्गत सुरु असाणाऱ्या कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी 38 कोटी या योजने अंतर्गत मंजूर असताना फक्त 17 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे उर्वरित रक्कम त्वरीत अदा करण्याचे आदेश मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.