ऐन दिवाळीत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, पाहा नेमकं कारण काय? (फोटो सौजन्य - X)
मुंबईतील जनजीवन जसं लोकल गाड्यांवर अवलंबून आहे, तसंच ते बेस्ट बसेसवरही विसंबून आहेत. मात्र उद्यापासून म्हणजेच भाऊबीजच्या मुहूर्तावर बेस्टचे कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामागचं कारण म्हणजे दिवाळी बोनस…
बेस्ट कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीच्या आदल्या दिवशी होणारा बोनस यावेळी मात्र झालेला नाही. त्यामुळे कर्मचारी संतप्त झाले. बेस्ट कर्मचाऱ्यांचा बोनस झाला नसल्याने उद्या (३ नोव्हेंबर) भाऊबीजेच्या दिवशीच कर्मचाऱ्यांनी पहाटे बेस्ट डेपोतून सोडणार नसल्याची माहिती मिळत आहे.
भाऊबीजीच्या दिवशी मुंबईकरांना तारावरची कसरत करावी लागणार आहे. बेस्ट कंपनीकडून बोनस देण्यासाठी बुधवारी दिवसभर निधी गोळा करणे चांगलेच होते आणि त्यासाठी बैठक घेण्यात आली. तरीही बोनस नाही.
तर दुसरीकडे आचारसंहितेमुळे बोनस दिला नसल्याचे महापालिकेने म्हटले आहे. मात्र कर्मचारी आंदोलनावर ठाम आहे. आज दिवसभरात बोनस जमा झाला नाही तर रविवारपासून कर्मचारी आंदोलन करणार आहेत.