Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BEST Bus Action: BEST बसचालकांसाठी नवा नियम; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशात अधिकारी ठेवणार पाळत

BEST Bus Action: मुंबईतील बेस्ट बसच्या वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. बस चालवताना मोबाईल फोनचा वापर करणाऱ्या चालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. विशेष तपासणीत नियम मोडताना चालक आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ आर्थिक दंड आकारला जाईल.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 24, 2026 | 06:51 PM
BEST Bus Action On Mobile Phone Driving News (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

BEST Bus Action On Mobile Phone Driving News (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • बस चालवताना मोबाईल वापरणाऱ्या BEST चालकांवर कठोर कारवाई होणार.
  • नियम मोडणाऱ्या चालकांवर तात्काळ आर्थिक दंड आकारला जाईल.
  • वारंवार उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर पावले उचलली जाणार.
  • वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची सुरक्षा वाढवण्यासाठी BESTची विशेष मोहीम सुरू.
BEST Bus Action On Mobile Phone Driving News: मुंबईकरांची दुसरी लाईफलाइनचा म्हटलं की आठवते ती म्हणजे बेस्टची बस. दररोज लाखो प्रवासी बेस्टने प्रवास करतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून बेस्टचे वांरवार अपघात होत आहे. त्यामुळे बेस्ट बस खरचं सुरक्षित आहे का असा प्रश्न सध्या प्रवाशांच्या मनात निर्माण होत आहे. याचसाठी बेस्ट बसने आता एक नवी मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेमध्ये वाहन चालवताना मोबाईल वापरणाऱ्या चालकांवर आता कोणतीही दया न दाखवता कारवाई केली जाणार आहे. नियम मोडताना कोणताही चालक आढळला तर त्याच्यावर तातडीने दंडात्मक कारवाई केली जाईल. मात्र दंडात्मक कारवाई करुन सुद्धा चालक पुन्हापुन्हा त्या चुका करत असेल तर, त्याच्यावर कायदेशीर कठोर पावले उचलली जातील.

वाहन चालवताना मोबाईल वापर केला कारवाई होणार….

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष तपासणीदरम्यान काही चालक बस चालवत असतानाच मोबाईलवर बोलताना किंवा फोन हाताळताना आढळले तर, चालकांवर आर्थिक दंड लावला जाईल, प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, प्रवासांच्या जीवाशी खेळणाऱ्या व्यक्तींचा कोणत्याही प्रकाराचा निष्काळजीपण अजिबात सहन केला जाणार नाही.

अधिकारी ‘या’ येणार  वेशात

या मोहिमेची खास गोष्ट सांगायची तर, अधिकारी हे सिव्हिल कपड्यांवर साधे प्रवाशी म्हणून प्रवास करतील. चालक वाहन चालवताना मोबाईलवर बोलतो का, इअरफोन लावतो का किंवा सुरक्षितपणे गाडी चालवतो का? यासर्व गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिले जाईल. चालकाला कोणतीही पूर्व माहिती नसताना त्यावर लक्ष दिले जाणार आहे.

नियम तोडल्यास कोणती कारवाई जाईल?

पुढे प्रशासनाने स्पष्ट केले की, पहिल्यांदा नियम तोडणाऱ्यांवर दंड आकारला जाईल. मात्र, तीच चूक पुन्हा घडली असता, दंडाची रक्कम वाढवली जाणार आहे. एखादा चालक वारंवार नियम मोडत असल्याचे आढळल्यास संबंधित खासगी बस ऑपरेटरविरोधातही शिस्तभंगाची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. त्यामुळे चालकांसोबतच बस चालवणाऱ्या कंपन्यांनाही जबाबदारीने काम करावे लागणार आहे.

चालकांच्या कामकाजावर सातत्याने लक्ष

ही मोहीम अचानक सुरू करण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी घडलेल्या गंभीर बस अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला होता. त्यानंतर बेस्ट प्रशासनाने सर्व डेपोंमध्ये तपासणी वाढवण्याचा निर्णय घेतला. आता शहरातील प्रत्येक डेपोमध्ये वेळोवेळी अचानक तपासण्या केल्या जाणार असून, चालकांच्या कामकाजावर सातत्याने लक्ष ठेवले जाणार आहे.

‘या’ तपासणीमध्ये चालकांच्या कोणत्या गोष्टी तपासला जातील…

तपासणी पथके केवळ मोबाईल वापरण्यावरच लक्ष देणार नाहीत, तर वाहन चालवताना चालकाचे वर्तन, वाहतूक नियमांचे पालन, प्रवाशांशी वागण्याची पद्धत आणि सुरक्षित ड्रायव्हिंगशी संबंधित इतर बाबींचीही नोंद ठेवतील. कोणतीही गंभीर त्रुटी आढळल्यास त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल आणि त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.

दरम्यान, मुंबईतील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी बेस्टकडून आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. काही वर्षांपासून रखडलेली इलेक्ट्रिक डबल डेकर बसांची योजना पुन्हा वेगाने पुढे नेण्याची तयारी सुरू झाली आहे. या नव्या बसेस सेवेत दाखल झाल्यानंतर पर्यावरणपूरक आणि आधुनिक सार्वजनिक वाहतुकीला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

प्रवाशांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी सुरक्षित सेवा देणे आवश्यक असल्याचे बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील काळात नियम मोडणाऱ्या चालकांवर अधिक कडक नजर ठेवली जाणार असून, निष्काळजीपणाला कोणतीही माफी मिळणार नाही. सुरक्षित प्रवासासाठी चालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे हीच काळाची गरज असल्याचे प्रशासनाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

Web Title: Best to take strict action against bus drivers using mobile phones

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 06:51 PM

Topics:  

  • best bus
  • Bus Driver
  • Mumbai News

संबंधित बातम्या

‘तुम्हीच आरोपींना फरार होण्याची संधी दिली’;रुग्णालयातील मारहाण प्रकरणी हायकोर्ट संतप्त, पोलिसांच्या दिरंगाईवर हायकोर्टाचे ताशेरे
1

‘तुम्हीच आरोपींना फरार होण्याची संधी दिली’;रुग्णालयातील मारहाण प्रकरणी हायकोर्ट संतप्त, पोलिसांच्या दिरंगाईवर हायकोर्टाचे ताशेरे

Mumbai News: प्रसूतीनंतर महिलेला चादरीतून रुग्णालयात नेण्याची वेळ! आरोग्य व्यवस्थेचे धक्कादायक वास्तव
2

Mumbai News: प्रसूतीनंतर महिलेला चादरीतून रुग्णालयात नेण्याची वेळ! आरोग्य व्यवस्थेचे धक्कादायक वास्तव

Health Update: एमआरआयच्या प्रतीक्षेला ऑक्टोबरमध्ये पूर्णविराम! नायर, सायन आणि कूपरमध्ये यंत्रे दाखल
3

Health Update: एमआरआयच्या प्रतीक्षेला ऑक्टोबरमध्ये पूर्णविराम! नायर, सायन आणि कूपरमध्ये यंत्रे दाखल

Maharashtra Breaking News Today 2026: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ९५ डॉलरच्या पार
4

Maharashtra Breaking News Today 2026: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ९५ डॉलरच्या पार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.