Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandup BEST Bus Accident : भांडुपमध्ये बेस्ट ई-बसचा भीषण अपघात; पादचारी गंभीर जखमी, अनेक वाहनांचे नुकसान

Bhandup BEST Bus Accident : मुंबईतील भांडुपच्या कोकण नगर परिसरात बेस्टच्या ई-बसचा भीषण अपघात झाला. अनियंत्रित झालेल्या बसने एका पादचाऱ्याला चिरडत अनेक वाहनांना धडक दिली. जखमी पादचाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 08, 2026 | 11:17 AM
भांडुपमध्ये बेस्ट ई-बसचा भीषण अपघात; पादचारी गंभीर जखमी, अनेक वाहनांचे नुकसान

भांडुपमध्ये बेस्ट ई-बसचा भीषण अपघात; पादचारी गंभीर जखमी, अनेक वाहनांचे नुकसान

Follow Us
Follow Us:
  • भांडुपमध्ये बेस्ट ई-बसचा भीषण अपघात
  • पादचारी गंभीर जखमी
  • अनेक वाहनांचे नुकसान
Bhandup BEST Bus Accident News Marathi : राज्यातील पावसाचा जोर कायम असून मुसळधार पावसाने अनेक भागांना झोडपून काढलं आहे. पावसामुळे पाणी साचणे, झाडं पडणं अशा अनेक दूर्घटनांमध्ये 10 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे मुंबईतील भांडुप परिसरातून बेस्ट बसचा विचित्र अपघात घडला आहे. भांडुपमधील कोकण नगर येथील क्रिटिकल रुग्णालय परिसरात भरधाव बेस्ट बसने एका पादचारीला जोरदार धडक दिली. या अपघातात पादचारी जखमी झाला असून त्याच्यांवर जवळील रुग्णालयातच उपचार सुरु आहेत.

सरकारने अखेर घोषणा केलीच ! ‘या’ वाहनांना नाही द्यावा लागणार आता टोल

मिळालेल्या माहितीनुसार, बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असावा अशी माहिती समोर येत आहे. बसने रस्ता ओलांडणाऱ्या एका पादचाऱ्याला थेट धडक दिली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर, स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी व्यक्तीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या विचित्र अपघातामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या काही वाहनांचेही मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे कोकण नगर परिसरात काही काळ गोंधळ आणि वाहतूक कोंडी झाली होती. प्राथमिक माहितीनुसार, बेस्ट बसच्या धडकेत तीन दुचाकी आणि एका ऑटो-रिक्षाचे नुकसान झाले आहे. बेस्ट अधिकारी आणि स्थानिक पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून चालकाचे नियंत्रण कसे सुटले, यासह सर्व बाबींचा तपास (Investigation) सुरू आहे.

दरम्यान, 8 जून 2026 रोजी मुंबईतील दादर प्लाझाजवळ बेस्ट बसचा भीषण अपघात झाला होता. दादर (पश्चिम) येथील प्लाझा सिनेमाजवळ बेस्ट बसची एका कार आणि दुचाकीला धडक बसली. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून तीन पादचारी जखमी झाले आहेत. दादरच्या प्लाझा परिसरात झालेल्या या अपघातामुळे या वर्दळीच्या परिसरात घबराट पसरली आहे. अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात सकाळी १०:४५ च्या सुमारास प्लाझा सिनेमाजवळील वीर कोतवाल गार्डनजवळ झाला. ४६३/३१ या मार्गावर धावणाऱ्या बेस्ट बसने आधी एका कारला आणि नंतर दुचाकीला धडक दिली, त्यानंतर जवळच्या पादचाऱ्यांनाही धडक दिली.

राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता डोमिसाईल नसेल तर लायसन्स नाहीच, 1 ऑगस्टपासून…

Web Title: Bhandup best e bus accident pedestrian injured kokan nagar mumbai news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 11:17 AM

Topics:  

  • Accident
  • best bus
  • Mumbai

संबंधित बातम्या

BMC News: उत्सव मंडपांवर आता प्रशासनाची करडी नजर; उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार BMC कडून तपासणी समिती
1

BMC News: उत्सव मंडपांवर आता प्रशासनाची करडी नजर; उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार BMC कडून तपासणी समिती

Dahisar Accident: शाळेतून वडिलांसोबत घरी निघाला अन् काळाचा घाला! सिमेंट मिक्सरच्या धडकेत १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू
2

Dahisar Accident: शाळेतून वडिलांसोबत घरी निघाला अन् काळाचा घाला! सिमेंट मिक्सरच्या धडकेत १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

Bhuleshwar Raja Accident : ‘अर्धवट सुकलेली मूर्ती, वेल्डिंगचे कामही बाकी…’, ‘भुलेश्वरचा राजा’ दुर्घटनेमागे धक्कादायक कारण समोर
3

Bhuleshwar Raja Accident : ‘अर्धवट सुकलेली मूर्ती, वेल्डिंगचे कामही बाकी…’, ‘भुलेश्वरचा राजा’ दुर्घटनेमागे धक्कादायक कारण समोर

Ganeshotsav 2026: अरे चाललंय तरी काय? बाप्पाच्या आगमन मिरवणुकीवर इमारतीतून अंडी फेकली? माझगावमध्ये दोन गटांत बाचाबाची
4

Ganeshotsav 2026: अरे चाललंय तरी काय? बाप्पाच्या आगमन मिरवणुकीवर इमारतीतून अंडी फेकली? माझगावमध्ये दोन गटांत बाचाबाची

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.